लहान मुलांच्या जर्मन पुस्तकांतील चित्रांचे प्रदर्शन

चिंतातुर जंतू

मजकूर

Contemporary book illustration from Germany
सध्या पुण्यात पुस्तकांशी संबंधित एक गोड प्रदर्शन सुरू आहे. त्याविषयी माहिती देण्यासाठी हा धागा. शक्य असल्यास आपापल्या बच्चेमंडळीसह जरूर भेट द्यावी असं हे प्रदर्शन आहे. लहान मुलांच्या पुस्तकांत चित्रं हा फार महत्त्वाचा भाग असतो. मॅक्स म्युल्लर भवनातर्फे सध्या 'सुदर्शन कला दालन' शनिवार पेठ इथे आताच्या जर्मन बालपुस्तकांतल्या चित्रांचं प्रदर्शन भरलं आहे. इतक्या वेगवेगळ्या शैलीतली आणि इतकी देखणी चित्रं आहेत की मुलांचंच नव्हे तर मोठ्या माणसांचंही भान हरपून जावं. त्या सोबत चंद्रमोहन कुलकर्णी, राजू देशपांडे आणि माधुरी पुरंदरे यांनी काढलेली मराठी बालपुस्तकांतलीही काही देखणी चित्रं प्रदर्शनात आहेत.

त्या बरोबरच पुष्कळशी सचित्र जर्मन/इंग्रजी बालपुस्तकं सुध्दा ठेवलेली आहेत. मुलांना ती पाहायला आणि वाचायला नक्की आवडतील.
Jacky Gleich

स्थळः सुदर्शन कला दालन, अहिल्यादेवी शाळेजवळ, गाडगीळ पथ, ४२१ शनिवार पेठ
कालावधी: १० ऑक्टोबरपर्यंत, रोज सकाळी दहा ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत
संपर्क: २४४३ ०८०३

अधिक माहिती इथे मिळेल.

प्रदर्शनातली काही चित्रं इथे पाहायला मिळतील.

टीपः अशी माहिती नक्की कशात टाकायची ते समजले नाही म्हणून 'पुस्तकाबद्दल' मध्ये टाकली आहे. 'कार्यक्रमां'ची सुविधा दिली तर उत्तम होईल.

अभिप्राय

निखिल देशपांडे

निखिल देशपांडे · Fri, 8 Oct 2010 - 08:14

आपण एका चांगल्या प्रदर्शनाची माहिती करुन दिलेली आहे..
पुण्यातल्या काही मित्रांना सुचवेल.

अवांतरः खरे तर हा चर्चा विषय नाही, कार्यक्रम असा वेगळा विभाग बनविण्याची सुचना खरंच चांगली आहे. त्या सूचनेवर विचार होउन अंमलात येई पर्यंत सर्वांनी अशा प्रकारच्या माहितीसाठी चर्चा असा विभाग निवडावा अशी विनंती करतो.

वल्ली

वल्ली · Fri, 8 Oct 2010 - 08:55

धन्यवाद चिं. जं. छान माहिती दिलीत. उद्याच प्रदर्शनाला जाउन येइन.

चर्चा प्रकार