'मराठी रियासत' बद्दल माहिती हवीय

वल्ली

मजकूर

रियासतकार गो.स. सरदेसाईंचे अनुपलब्ध असलेले 'मराठी रियासत' चे सर्व खंड पॉप्युलर प्रकाशनातर्फे पुनर्प्रकाशित होत आहे. सदर खंडांची एकत्रित किंमत सवलतीत ४००० रू. आहे. तरी सदर ग्रंथ कुणी वाचले आहेत का?
२५० वर्षांचा मराठेशाहीचा समग्र इतिहास असलेले हे खंड एव्हढी किंमत मोजून संग्रही ठेवण्यासारखे आहेत का? हे ग्रंथ फक्त इतिहासाच्या अभ्यासू वाचकांसाठीच आहेत का इतरही हे वाचू शकतील? मुख्य म्हणजे हे चरित्रग्रंथ आहेत का संदर्भग्रंथ?
जाणकारांनी अधिक माहिती द्यावी ही विनंती.

अभिप्राय

विष्णु वडेर

विष्णु वडेर · Fri, 24 Dec 2010 - 06:23

`मराठी रियसत' चरित्र ग्रंथ नसून संदर्भ ग्रंथ आहे. प्रामुख्याने हे खंड जरी इतिहासाच्या अभ्यासकांसाठी असले तरी प्रत्येक `मराठी' माणसाच्या घरी ते हवेतच, असे माझे प्रांजल मत आहे. आता प्रश्न आहे किंमतीचा...पण हे खंड संग्राह्य नक्कीच आहेत, यावर विश्वास टेवा!!

यशोधरा

यशोधरा · Fri, 24 Dec 2010 - 14:56

ह्म्म... एकदम असे खंड घेणे सद्ध्या तरी परवडणारे नाही हे तर खरेच. एकेक घेतल्यास काय किंमत पडते?

सागर

सागर · Sat, 25 Dec 2010 - 16:10

मराठी रियासत चे सर्व खंड केवळ अप्रतिम आहेत.
जरी संदर्भग्रंथ असले तरी (जर बजेट हा मुद्दा नसेन तर संग्रहात असावे असेच सर्व खंड आहेत)

तुला इतिहासात रस असेल तर प्रश्नच नाही ( तो तुला आहे हे माहिती आहे म्हणून सांगू शकतो :) )
वाचताना नक्कीच ज्ञानात भर तर पडेनच पण सगळे खंड अफलातून आहेत

खंड १ - शहाजीराजे भोसले, शककर्ता शिवाजी
खंड २ - उग्रप्रकृती संभाजी, स्थिरबुद्धी राजाराम
खंड ३ - पुण्यश्लोक शाहू, पेशवा बाळाजी विश्वनाथ, पेशवा बाजीराव
खंड ४ - पेशवा बाळाजीराव
खंड ५ - निग्राहक माधवराव, अपेशी नारायणराव, दुराग्रही रघुनाथराव
खंड ६ - छत्रपती रामराजा, छत्रपती धाकटे शाहूराजे, पेशवा सवाई माधवराव
खंड ७ - छत्रपती धाकटे शाहूराजे, पेशवा सवाई माधवराव
खंड ८ - पेशवा दुसरा बाजीराव

संपादक : रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई

यातील रियासतकार ही पदवी सरदेसाईंना या सर्व खंडांच्या दर्जामुळेच मिळालेली आहे :)

विष्णुपंत म्हणतात त्याप्रमाणेच सांगतो नक्की घे रे मित्रा.

आनंदयात्री

आनंदयात्री · Sat, 25 Dec 2010 - 18:54 · उत्तर

जबरदस्त आवाका आहे !! शिर्षके वाचुनच वाचनाचा मोह झालाय.

वल्ली

वल्ली · Sun, 26 Dec 2010 - 12:13 · उत्तर

धन्यवाद सागर, विष्णुपंत खूपच छान माहिती दिलीत. खंड घेण्याचा नक्कीच विचार करेन.

यशोधरा

यशोधरा · Tue, 28 Dec 2010 - 12:38 · उत्तर

धन्यवाद सागर. :) मस्त माहिती.

चर्चा प्रकार