मुंबई कट्टा

वेदश्री

मजकूर

परवा मकीशी बोलताना मी सहज बोलून गेले, "पुढच्या महिन्यात २० किंवा २७ला मी मुंबईला येतेय. भेटूया का?" आमचे बोलणे इथून सुरू होऊन मग एक छोटा कट्टाच करुया का? इथेपर्यंत येऊन पोहोचले. तोच धागा पकडून मी इथे सर्वांनाच विचारू इच्छिते की मुंबईला असा कट्टा ठरवल्यास कोण कोण येऊ शकेल/येईल?

अभिप्राय

ऋषिकेश

ऋषिकेश · Mon, 18 Oct 2010 - 10:06

२३ च्या विकांताला मी भेटु शकेन. गौरीला (बायको) विचारून ( तिच्या उपस्थितीबद्द्ल )सांगतो

वेदश्री

वेदश्री · Mon, 18 Oct 2010 - 10:09 · उत्तर

२३च्या विकांताला? ऑक्टोबर की नोव्हेंबर? आणि मुंबईत की पुण्यात?

ऋषिकेश

ऋषिकेश · Mon, 18 Oct 2010 - 10:21 · उत्तर

ओह्ह मी धागा नीट वाचलाच नाही :)
मला वाटलं या महिन्यात. २० नोव्हें ला मी पुण्यात असेन

वेदश्री

वेदश्री · Mon, 18 Oct 2010 - 10:40 · उत्तर

आपण पुण्यातले लोक कधीही भेटू शकतो की. परवा मी यशोधराला आणि अदितीला भेटले तसे. ठरवुयात तसे आपण. गौरीला सांगून ठेव तसे.

यशोधरा

यशोधरा · Mon, 18 Oct 2010 - 12:28

ऋ, भेटूयात की कधीही :) फक्त आधी सांगा हां! :D
पुण्यात भेटणार असलात तर - माझ्याकडे इरावती कर्वेंच्या भोवरा पुस्तकाच्या २ प्रती झाल्यात. कोणाला हवी असल्यास मी आणू शकेन.

सागर

सागर · Mon, 18 Oct 2010 - 12:35 · उत्तर

यशोधरा,

भोवराबद्दल थोडेसे लिहिलेत तर कल्पना येईल नक्की कशावर आहे पुस्तक याची.
मग त्यात रस असणार्‍याला नक्की भोवरा घ्यावेसे वाटेल.

इरावतीबाईंचे माझ्याकडे युगान्त आहे. हे ही असेच आहे की दुसर्‍या विषयावर आहे?

यशोधरा

यशोधरा · Mon, 18 Oct 2010 - 12:45 · उत्तर

नाही. भोवरा वेगळे आहे युगांतपे़क्षा.

मस्त कलंदर

मस्त कलंदर · Mon, 18 Oct 2010 - 19:53

मी धागा टाकेन म्हटलं आणि नंतर माझ्या प्रेझेंटेशनच्या गडबडीत राहून गेलं. आता तेच काम करायला आले तोवर तुझाच धागा दिसला. सॉरी.... :(
मी कट्ट्याला आहेच. रोचीन पण मुंबईत राहाते ना??? आणि ऋ प्लॅन ऐनवेळी बदलला आणि तो मुंबईत असेल सहकुटुंब येईलच.. ना?

रोचीन

रोचीन · Tue, 19 Oct 2010 - 09:02

फक्त रविवारीच जमेल. शनिवारी पुर्ण दिवस ऑफिस असतं :(
रजा घेउ शकणार नाही.

निखिल देशपांडे

निखिल देशपांडे · Wed, 20 Oct 2010 - 07:23

मी बहुदा असेनच

मस्त कलंदर

मस्त कलंदर · Tue, 16 Nov 2010 - 07:38

वेदश्रीशी आताच बोलले. आता २० की २७ हा घोळ नाहीय. ती २१ तारखेलाच(रविवारी) येतेय आणि साधारण ११ च्या सुमारास दादर-प्रभादेवीला असेल. तेव्हा,
१. त्यादिवशी कोण कोण मुंबईत असण्याची शक्यता आहे? (पक्षी: कट्ट्यासाठी कोण कोण येणार आहे?)
२. सगळ्यांची राहती ठिकाणी विचारात घेऊन कुठे भेटणं सोयिस्कर पडेल? इथे उपनगर्+नक्की जागा (एखादे फूड कोर्ट/घर) असे पर्याय सुचवा.

माझ्यापुरतं बोलायचं तर मी चेंबूरला राहते आणि मला कुठेही यायला काही अडचण नाही. वेदश्रीसाठी पूर्ण दिवस राखून ठेवलाय.

वेदश्री

वेदश्री · Tue, 16 Nov 2010 - 08:19 · उत्तर

'लोकला'इज्ड असल्याने मलाही कुठल्याही नगरा-उपनगरात यायला अडचण नाही कट्ट्यासाठी.

३_१४ अदिती

३_१४ अदिती · Tue, 16 Nov 2010 - 11:02 · उत्तर

विद्यापीठ? ;-)

रोचीन

रोचीन · Tue, 16 Nov 2010 - 07:51

येणार आहे! ठाणे सोयीचं आहे का??

निखिल देशपांडे

निखिल देशपांडे · Tue, 16 Nov 2010 - 09:21

मला कुठेही हरकत नाही.
ठाणे असेल तर चालेलच.

ऋषिकेश

ऋषिकेश · Tue, 16 Nov 2010 - 10:28

पुणेकरांनु, तुमी कधी भेटतायसा?

मस्त कलंदर

मस्त कलंदर · Tue, 16 Nov 2010 - 10:36 · उत्तर

तू आहेस का म्हमईत ते सांग आधी!!!!

ऋषिकेश

ऋषिकेश · Wed, 17 Nov 2010 - 06:30 · उत्तर

नाही! :(
मी पुण्यात आल्यावर तुम्ही मुंबईत भेटता.. मी मुंबईला असताना सगळे कट्टे पुण्यात.. :( :( ये नाइंसाफी नही चलेगी ;)

मनिष

मनिष · Sun, 21 Nov 2010 - 07:26 · उत्तर

पुण्यात माझ्या घरी भेटायचे का? कोण, कोण येते आहे ठरवा आणि भेटू लवकरच! :)

मस्त कलंदर

मस्त कलंदर · Tue, 16 Nov 2010 - 10:38 · उत्तर

प्रकाटाआ

मस्त कलंदर

मस्त कलंदर · Fri, 19 Nov 2010 - 06:53

उपलब्ध माहितीनुसार मी, निखिल, वेदश्री, रोचिन आणि दिगम्भा एवढेच लोक येत आहेत. तेव्हा कट्टा माझ्या घरी होईल असं ठरतंय. व्यनीमधून पत्ता आणि कसं यायचं ते कळवते. आणखी कुणी येत असेल तर तसेही कृपया या धाग्यावर किंवा खरड/व्यनितून कळवा...

आनंदयात्री

आनंदयात्री · Fri, 19 Nov 2010 - 16:34 · उत्तर

बेश्ट. काय पाककृती करणार मग ??
आम्ही दुरभाषावर संपर्क साधुच :)

श्रावण मोडक

श्रावण मोडक · Fri, 19 Nov 2010 - 16:50 · उत्तर

व्यनि ­आलेला नाही. त्यामु­ळं तप­शील क­ळू ­शकत नाहीये... ;­)

वेदश्री

वेदश्री · Fri, 19 Nov 2010 - 17:30

कट्ट्याचे ठिकाण - मस्त कलंदरचे घर
कट्ट्याची वेळ - सकाळी ११ ते दुपारी ४ (दुपारी २च्या अगोदर सुटका नाही, हे लक्षात घेणे!)
कट्ट्याची रूपरेषा - प्रत्येकाने स्वत:ची ओळख करून द्यायची आहे - पुस्तकांच्या संदर्भाने! या ओळखपरेडीतून निघालेल्या संदर्भांवरून मुद्दे/गुद्दे निघतनिघत कट्टा आपोआपच बहरत जाईल याबद्दल शंका नाही... कोणास शंका येत असल्यास कट्ट्याला उपस्थित राहून निरसन करून घ्यावे ही नम्र विनंती! ;-)
कट्ट्याला येणार असलेल्यांची सद्ध्याची यादी - वेदश्री, मस्त कलंदर, निखिल देशपांडे, रोचिन, अश्विनी, दिगम्भा, दिनेश गुणे
अजून कोणाला कट्ट्याला येण्याची इच्छा असल्यास (आणि वरील येणार असलेल्यांच्या यादीतील कोणीच ओळखीचे नसल्यास) संपर्कासाठी लावायचा माझा भटक्याक्रमांक (थोडास्सा एन्क्रिप्टेड आहे, उशीर लावल्याबद्दल डिक्रीप्ट करण्याचे कष्ट तर घ्यावेच लागतील ना!) - औरामानकृष्णा इनरामातकृष्णा ओनरामादकृष्णा ओनरामादकृष्णा औरामानकृष्णा करामाएकृष्णा आचरामापकृष्णा औरामानकृष्णा इनरामातकृष्णा औरामानकृष्णा! :-)

बिपिन कार्यकर्ते

बिपिन कार्यकर्ते · Fri, 19 Nov 2010 - 18:09

मकी आणि वेदश्री, आमंत्रण मिळाले, पण जमेल असे वाटत नाही. परत कधी तरी. बाकी कट्ट्याला जमणार्‍यांनी पोटदुखीचे औषध घेऊन जावे. :ड

परिकथेतील राजकुमार

परिकथेतील राजकुमार · Sat, 20 Nov 2010 - 06:25

चला मकीला पाककौशल्याचे प्रयोग दाखवायला गिनिपिग्स मिळाले ;)

मस्त कलंदर

मस्त कलंदर · Sat, 20 Nov 2010 - 07:04 · उत्तर

गिनिपिग!!! सध्या फक्त वेदश्रीवर प्रयोग करेन. इतरांच्या पोटावर प्रयोग करत बसले तर मला गप्पा मारता येणार नाहीत ना... आणि मौके और भी आयेगे ना.
तू बोल, येतोयस का उद्या? अगदी साग्रसंगीत स्वयंपाक करते तुझ्यासाठी. :-)

वेदश्री

वेदश्री · Sat, 20 Nov 2010 - 07:38 · उत्तर

>सध्या फक्त वेदश्रीवर प्रयोग करेन.

म्हणजे????!!!! मी काय गिनिपिग आहे का काय????????!!!!!!! :-)

टग्या

टग्या · Sat, 4 Dec 2010 - 03:55 · उत्तर

तेवढी 'गिनी'बद्दल शंका आहे खरी... ;-)

(सॉरी... मोह आवरला नाही.)

ऋषिकेश

ऋषिकेश · Sun, 21 Nov 2010 - 17:07

काय मग कसा झाला कट्टा? का चाललाय अजून?

वेदश्री

वेदश्री · Sun, 21 Nov 2010 - 17:36 · उत्तर

कट्टा एक्कद्दम झक्कास झाला. भिनलाय अगदी! :-) काही क्षणापूर्वीच पोहोचले घरी पुण्याला.

इंद्रराज पवार

इंद्रराज पवार · Mon, 22 Nov 2010 - 05:37 · उत्तर

"....कट्टा एक्कद्दम झक्कास झाला...."

~~ आजच्या महाराष्ट्र टाईम्सची हेड लाईन आहे : "विक्रोळीत उद्रेक" !
होप. तुमच्या कट्ट्याच्या दंग्यामुळे नसेल. इथे फोटो फीचर रीपोर्टिंग जरूर करा...कट्ट्याचे !!

इन्द्रा

वल्ली

वल्ली · Mon, 22 Nov 2010 - 04:26

कट्ट्याचे आता साद्यंत वर्णन येउ दे वेदश्री.

परिकथेतील राजकुमार

परिकथेतील राजकुमार · Mon, 22 Nov 2010 - 08:27

अरे निदान फोनवर तरी आम्हाला हजेरी लावुन द्यायचे होते :(

एक साधा फोन नाही करता आला तुम्हा लोकांना ? मिसकॉल तरी द्यायचा :p

असो.. समग्र वर्णन आणि फोटु द्या आता.

टारझन

टारझन · Tue, 23 Nov 2010 - 10:53

च्यायला ... हुकला कट्टा :)
फोटु कुठे आहेत ? :)

पुण्याचे पेशवे

पुण्याचे पेशवे · Fri, 3 Dec 2010 - 06:01 · उत्तर

आय्ला हा तोच आहे का? आणि तो अजूनही जालावर आहे का? :)

टारझन

टारझन · Fri, 3 Dec 2010 - 08:42 · उत्तर

खि खि खि ... आहे आहे ... तुमच्या सारख्या शुभचिंतकांमुळे आमचे अस्तिव मिटले गेले नाहीये अजुन :)

- टारुली

चर्चा प्रकार