नवे वर्ष.. नवा संकल्प -- नव्या रुपातली जुनी पुस्तके

ऋषिकेश

मजकूर

नमस्कार मित्रहो.. २०१० सरलं.. २०११चे वेध लागले आहेत. नववर्ष म्हणजे एका अर्थी एक दिवस मावळला.. एक उगवला.. तसा फरक काहिच नाहि.. पण तरीही आपण ह्या दिवसाकडे मैलाचा दगड म्हणून पाहतो.
गेल्या वर्षातील 'पुस्तकविश्व'चे आगमन ही माझ्यासारख्या पुस्तकप्रेमींच्या जगातली एक महत्त्वपूर्ण घडामोड ठरली. मराठी जालावर असे संस्थळ येणे आणि ते इतक्या कमी वेळात बहरणे ही आनंददायक घडामोड या वर्षी घडली.

ह्या मैलाच्या थांब्यावर पुस्तकविश्व यावर्षात केवळ तांत्रिक क्षेत्रात, दिवाळी अंकात किंवा जालावरील घटनांमधेच नाहि तर एक वाचक म्हणून माझ्यातही (व खात्री आहे तुमच्यातही) बदल घडवले. अनेक नव्या पुस्तकांची ओळख झाली. आपल्यासारखे वाचनवेडे भेटल्याने वाचायला, त्यावर लिहायला हुरूप आला. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांच्या तुलनेत गेल्या काहि महिन्यातच मी वाचलेली पुस्तके जास्त भरावीत.

नव्या वर्षाच्या सुरवातीला अनेक जण संकल्प करतात. पुस्तकविश्वचा सभासद म्हणून आपल्याला असा सामुदायिक संकल्प सोडता येईल का? मागे मेघनाने पुस्तके/जुनी मासिके डिजिटल रुपात आणण्याचे आपले मानस इथे बोलून दाखवले होते. तीच योजना यावर्षी मूर्त रूपात यावी असे मला वाटते. तुम्हाला काय वाटते?
या वर्षात किमान ५० पुस्तके स्क्यान करून डिजीटल रुपात वाचायला ठेवायचा सामुदायिक संकल्प करवा असे मला वाटते व त्यासाठी लागणारी हरप्रकारची मदत करायला मी तयार आहे.

ही चर्चा याचसाठी आहे
१. तुम्हाला हा संकल्प योग्य वाटतो का? असल्यास तुम्ही सहभागी होऊ शकाल का?
२. अश्या प्रकल्पाची रुपरेखा कशी असावी? सभासदांना त्यात कसे सहभागी होता येईल?
३. प्रताधिकार वगैरे लक्षात घेऊन कोणती पुस्तके स्क्यान करता यावीत?
४. स्क्यान पुस्तके वाचकांना उपलब्ध करून देण्यासाठी तांत्रिक बाजु सांभाळणे शक्य आहे का?
५. इतर प्रश्न/पुरवणी विषय

सर्वाना येत्या २०११ मधे भरपूर पुस्तक खरेदी आणि वाचन होवो हीच नववर्षाची हार्दिक शुभेच्छा!

अभिप्राय

यशोधरा

यशोधरा · Fri, 31 Dec 2010 - 08:07

सर्वाना येत्या २०११ मधे भरपूर पुस्तक खरेदी आणि वाचन होवो हीच नववर्षाची हार्दिक शुभेच्छा!

आमेन!

सागर

सागर · Fri, 31 Dec 2010 - 08:11

एवढा छान धागा सुरु केल्याबद्दल धन्यवाद ऋ

पुस्तकविश्व मुळे एक वाचक म्हणून माझ्यातही बराच मोठा बदल झाला असे म्हणता येईल
पुस्तकविश्व मुळे अनेक नवनवीन (माझ्यासाठी अज्ञात) पुस्तकांची ओळख झाली.
पुस्तकांचा संग्रह करण्याची आवड माझी आधीपासूनच होती. पण या वर्षी मी जेवढी पुस्तके खरेदी केली तेवढी यापूर्वीची सगळी पुस्तके मिळूनही कधी एवढी खरेदी झाली नव्हती. हे घडले ते पुवि मुळे हे प्रामाणिकपणे सांगू शकतो. माझा ग्रंथसंग्रह समृद्ध होण्यात पुविचा मोठा सहभाग आहे.

कॉपीराईट अ‍ॅक्टनुसार बहुतेक ५० वर्षांपूर्वीची पुस्तके यात येत नाहीत तेव्हा अशी जुनी पुस्तके स्कॅन करता येतील.

या संकेतस्थळाच्या संचालकांनी ऋ च्या प्रस्तावावर नक्की विचार करावा ही विनंती. माझे ऋ ला अनुमोदन आहे.

सर्वांना येणारे २०११ हे नवीन वर्ष भरपूर वाचनाचे आणि आवडीच्या पुस्तकांच्या खरेदीचे जावो हिच इच्छा :)

आनंदयात्री

आनंदयात्री · Fri, 31 Dec 2010 - 18:15 · उत्तर

उत्तम. पुस्तकविश्वकडुन हवी ती तांत्रिक मदत होईलच.
याच बरोबर मदतनीस एक नवीन प्रकल्प घेउन लवकरच येत आहे :)

नववर्षाच्या अनेकोत्तम शुभेच्छा, येणारे वर्ष सर्व पुस्तकवेड्यांना आनंदाचे जावो.

ऋषिकेश

ऋषिकेश · Sat, 1 Jan 2011 - 07:01 · उत्तर

आभार! मदतनीसाचा प्रकल्प ऐकण्यास उत्सूक आहे. हे सारे प्रकल्प एकत्र करून एक चांगला प्रकल्प सुरू होईल अशी अपेक्षा.

आरागॉर्न

आरागॉर्न · Fri, 31 Dec 2010 - 08:14

२०११ मध्ये सर्वांचे भरपूर वाचन घडो हीच शुभेच्छा. :)

प्रस्तावाला अनुमोदन. सागरशी सहमत आहे. प्रताधिकारमुक्त पुस्तके साठवता आली तर फारच छान.

अदिती

अदिती · Fri, 31 Dec 2010 - 12:05

स्वयंसेवक होण्यास तयार आहे. प्रकल्प सुंदर आहे. यथाशक्ती मदत करायला आवडेल.

मृदुला

मृदुला · Fri, 31 Dec 2010 - 16:39

मलाही या प्रकल्पास हातभार लावायला आवडेल.

नंदन

नंदन · Sat, 1 Jan 2011 - 01:29

प्रकल्प. एक-दोन वर्षांपूर्वी काही जुनी पुस्तकं (उदा. दिवाकरांच्या नाट्यछटा) स्कॅन करून त्यांच्यातला मजकूर युनिकोडमध्ये टंकण्याच्या एका प्रकल्पात सहभागी झालो होतो. या प्रकल्पाला वेग आल्यावर ऑलरेडी झालेलं हे काम त्यात जोडता येईल.

या प्रकल्पाचा दुसरा फायदा म्हणजे सध्या देवनागरी/युनिकोडसाठी ऑप्टिकल कॅरॅक्टर रिकग्निशन ही सुविधा 'सी-डॅक'मार्फत विकसित केली जात आहे. (दुवा) तिला पूर्णत्व आल्यावर अशी स्कॅन केलेली पुस्तकं हा निव्वळ वाचकांसाठीच नव्हे तर संशोधकांसाठीही एक मोठा खजिना ठरेल.

उदा. गूगलने अलीकडेच जाहीर केलेली शब्दांचा शोध घेणारी सुविधा. ह्या उदाहरणात दाखवल्याप्रमाणे १८०० ते २००० या काळात प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांत men आणि women ह्या शब्दांची वारंवारिता किती होती आणि बदलत्या काळाप्रमाणे त्यांचं गुणोत्तर कसं बदलत गेलं याचा आलेख काढणं सहज शक्य आहे.

आनंदयात्री

आनंदयात्री · Sat, 1 Jan 2011 - 04:31 · उत्तर

उत्तम !!

आरागॉर्न

आरागॉर्न · Sat, 1 Jan 2011 - 06:09 · उत्तर

उदा. गूगलने अलीकडेच जाहीर केलेली शब्दांचा शोध घेणारी सुविधा. ह्या उदाहरणात दाखवल्याप्रमाणे १८०० ते २००० या काळात प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांत men आणि women ह्या शब्दांची वारंवारिता किती होती आणि बदलत्या काळाप्रमाणे त्यांचं गुणोत्तर कसं बदलत गेलं याचा आलेख काढणं सहज शक्य आहे.

सध्या ही सुविधा हॉट आहे. भाषाशास्त्रज्ञ स्टिफन पिंकर यांनी इतर संशोधकांबरोबर नुकतेच या संदर्भातील संशोधन सादर केले. त्यांच्या म्हणण्यानुसार इतिहास, संस्कृती इंच्या संशोधनासाठी हे एक नवीन हत्यार आहे.

ऋषिकेश

ऋषिकेश · Sat, 1 Jan 2011 - 06:56 · उत्तर

अरे वा! उत्तम सुविधा आहे.
मी गंमत म्हणून ख्रिस्त, राम, अल्लाह आणि बुद्धाची नावे घालून विदागार धुंडाळले तर हे काहिसे आश्चर्यकारक चित्र मिळाले.

सागर

सागर · Sun, 2 Jan 2011 - 08:53 · उत्तर

मी याच दुव्यावर फक्त कृष्ण हा शब्द अ‍ॅड केला आणि बाकीचे सगळे फ्लॅट झाले ;)

हे पहा

ऋषिकेश

ऋषिकेश · Mon, 3 Jan 2011 - 04:28 · उत्तर

हे केस स्पेसिफिकही दिसते आहे, krishna आणि Krishna चा निकाल वेगळा आहे

सागर

सागर · Mon, 3 Jan 2011 - 08:11 · उत्तर

हे तर मस्तच आहे. गूगल बग :)

इंद्रराज पवार

इंद्रराज पवार · Mon, 3 Jan 2011 - 05:54 · उत्तर

"...ख्रिस्त, राम, अल्लाह आणि बुद्धाची नावे...."

~ होय, ऋषिकेश, खरंच आश्चर्यकारक चित्र आहे. मी समजत होतो (बरेच समजत असतील) 'ख्रिस्त' टॉपर असेल, पण इथे तर बुद्धच प्रभावी वाटतात.

मग आता त्या दुव्यावर आहेच म्हणून सहज गंमत म्हणून मी टंकले "लता, आशा, रफी, किशोर..." आणि इथे मात्र मनी जे होते तेच आले...."लता" टॉपर, नॅचरली....इतक्या उंचावर की त्यांच्या आणि दुसर्‍या क्रमांकामध्ये महासागराइतका फरक. किशोर तर कसेबसे दिसतात.

क्वायेट इंटरेस्टिंग फॉर स्टडी परपजेस...!

इन्द्रा

इंद्रराज पवार

इंद्रराज पवार · Sat, 1 Jan 2011 - 07:30

सुंदर विचार. तसेच या निमित्ताने मीही हे मानतो की, "पुस्तकविश्व" चे नेट जगतातील आगमन ही माझ्यासारख्या एका वाचनप्रेमीसाठी 'पँडोरा बॉक्स' सिद्ध झाली. संस्थळावर मित्र असणे ही आता बिलकुल नाविन्याची बाब राहिलेली नाही, पण केवळ "पुस्तक" या प्रेमापोटी अगदी कालपर्यंत अपरिचित असलेली नावे आज एकदम खिशातच मुक्कामाला असल्यासारखी व्हावीत हे या संस्थळाचे आकर्षक असे फळ आहे.

मी स्वतःला बर्‍यापैकी पुस्तके वाचणारा आणि ती तशी स्वतःजवळ असावित असा अल्पशा ताकदीने का होईना, छंद जपणारा समजत होतो....पण इथे आल्यावर एकापेक्षा एक असे या क्षेत्रातील "सचिन तेंडुलकर" पाहिल्यानंतर समजून चुकले आणि मला या पंढरीत कुठे टाळ घेऊन तरी उभारायला जागा आहे की नाही हे अगोदर शोधायला हवे. २०१० साठीचा माझ्यासाठी हा फार मोठा लाभ होता.

२०११ देखील हेच पुन्हा सिद्ध करेलच. मी कॉम्प्युटर जगतातील तांत्रिक घडामोडीविषयी अनभिज्ञ असल्याने श्री.ऋषिकेश म्हणतात त्यातील त्या 'स्कॅन' संदर्भातील काहीशी त्रोटक स्वरूपातील (वेळोवेळी वाचनात आलेली) माहिती सोडता हा एकुणच प्रकल्प काय असेल याबाबत धुक्यातच आहे, पण तरीही वरील काही प्रतिसाद वाचल्यावर लक्षात येत आहे की जे काही पुढे मूर्त स्वरूपात येईल ते अभिनंदनीयच असेल.

इन्द्रा

निखिल देशपांडे

निखिल देशपांडे · Sat, 1 Jan 2011 - 17:10

सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा!!!
प्रकल्प उत्तम आहे. त्यात कोणत्या ना कोणत्या प्रकारे हातभार लावायला आवडेल.
प्रताधिकाराची आपल्या कडील मुदत काय आहे???
अशा पुस्तकाची यादी बनवता येईल का???

वेदश्री

वेदश्री · गुरुवार, 20 Jan 2011 - 09:59

मला या प्रकल्पात मदत करायला मनापासून आवडेल. काय ठरतेय ते कळवा.

चर्चा प्रकार