- Log in to post comments
कादंबरी: रीटा वेलिणकर
लेखिका: शांता गोखले
विजेता क्र. १: देवेन्द्र प्रभुणे आणि विजेता क्र. २ मणिकर्णिका हार्दिक अभिनंदन!!!!!!!!!
"....अशी वागेल असं मला कधीच वाटलं नव्हतं! म्हणजे ताळतंत्र सोडून, मोकाट सुटल्यासारखी. अठराव्या वर्षी ती जितकी mature होती तितकीच पस्तिसाव्या वर्षी immature झाली होती. अचानक एके दिवशी मला फ्लॅटवर घेऊन गेली आणि म्हणाली, ‘ हे आपलं घर. मला ह्या सात वर्षांच्या लपाछपीचा कंटाळा आलाय. मी माझ्या आई-वडिलांना आपलं नातं सांगते, तू तुझ्या बायको-मुलांना सांग, आणि आपण इथं राहू या. लग्नही करायची गरज नाही. तसेच राहू या.’ मी तर थक्कच झालो. हिला आता वेड लागलंय असंच मला वाटलं. मी तिला खूप समजावून सांगायचा प्रयत्न केला. मला काय त्रास होईल ते सोड म्हटलं. पण तुला कोणत्या गोष्टींना तोंड द्यावं लागेल ह्याची कल्पना आहे का तुला? आपला समाज अजून इतका बदललेला नाही की बिनविवाहित जोडप्यांना सामावून घेईल. तर ती असंबध्दपणे म्हणाली, ‘आपला समाज म्हणजे नेमका कोणता समाज? मी तर जन्मल्या दिवसापासून तु्झ्या समाजाच्या बाहेरची आहे. मला मामाच्या घरीसुध्दा दुसर्या पंगतीला जेवायला बसवायचे. माझ्या कुटुंबाला ना जात ना प्रतिष्ठा. मग त्याचाच फायदा घेऊन निदान आपल्या मतांप्रमाणं तरी मी का नाही जगू?’ आता खरं सांगतो, मी हिच्या जातीविषयी अशा प्रकारे कधीच विचार केला नव्हता..."
संकेत क्र.१:
वाचता-वाचता एकीकडे विचारात पाडणार्या एका कादंबरीतील हा वेचा आहे. ज्यांनी हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच परंतु लक्षणीय पुस्तके लिहिली अशा स्त्री-लेखिकेची ही कादंबरी आहे.....
जास्तीचे काही संकेत -----
ह्या पुस्तकाचे मुखपृष्ठ वैशिष्ठ्यपूर्ण आहे. ह्या कादंबरीतील व्यक्तिरेखांचे पोर्टेट्रच जणू! एकमेकांना बळकट-कोमल शक्तीने सांभाळणार्या ह्या व्यक्तिरेखा आहेत. चित्रकाराच्या ह्या चित्राचे नाव ‘काँग्रेच्युलेशन्स’ असे आहे. पण कादंबरीला साजेसे ते ‘कॉन्सोलेशन’ही असू शकेल.
शेवटचा संकेत.....
ह्या कादंबरीवर आधारित सिनेमा लेखिकेच्या मुलीने काढला. पण कादंबरीची सर त्याला अर्थातच नाही.....
.....पुवि-मित्रहो, आता तर उत्तर नक्की ओळ्खता येईल ना?
अभिप्राय
वल्ली
वल्ली · Fri, 4 Mar 2011 - 12:46
व्यनि केला आहे. अंदाज चुकलेला असायचीच जास्त शक्यता आहे. पुस्तक वाचलेले नाही हे निश्चितच.
इंद्रराज पवार
इंद्रराज पवार · Sat, 5 Mar 2011 - 06:40
व्वा...! श्री.देवेन्द्र यानी (मला वाटते) प्रथमच कोडे प्रकारात भाग घेतला आणि थेट केव्हिन ओब्रायन स्टाईलमध्ये सिक्सर !
चित्राकडून अभिनंदन झालेच आहे....पण एक वाचनप्रेमी म्हणून मीही तुमचे हार्दिक अभिनंदन करतो, देवेन्द्र. तुम्ही स्वतःही या धागा-प्रकारात सामील व्हा.
इन्द्रा
वल्ली
वल्ली · Sun, 6 Mar 2011 - 04:31
विजेत्यांचे अभिनंदनच, पण आमच्यासाठी अजून एखादा संकेत हवाच. :)
वल्ली
वल्ली · Fri, 11 Mar 2011 - 02:17
इतके संकेत मिळूनही काही ध्यानात येत आही. आता उत्तर जाहीर करून टाका.
सागर
सागर · Fri, 11 Mar 2011 - 04:49 · उत्तर
वल्ली मित्रा, हे पुस्तक अनोळखी नक्कीच नाहीये.
पण मलाही क्लिक होत नाहिये की हे कोणते पुस्तक आहे ते.
पुस्तक वाचले आहे हे नक्की आणि बरेच गाजलेले पण आहे.
इरावती कर्वे यांचे आहे की काय अशी शंका येते आहे.
पण ते कदाचित नसावे.
मी पण उत्तराची वाट बघतो आहे
चित्राजी उत्तर जाहीर करा :)
वल्ली
वल्ली · Fri, 11 Mar 2011 - 17:41
शेवटचा संकेत इतका ठळक होता की पुस्तक मग न ओळखता येणे फारसे ठळक नव्हते. तरी वेच्याने बरेच झुलवले.
वेच्यानी निवड उत्तम.
चित्रा राजेन्द्र जोशी
चित्रा राजेन्द… · Fri, 11 Mar 2011 - 17:42
मी आधी सिनेमा बघितला, केवळ पल्लवी जोशी आणि रेणुका शहाणे ह्या दोन आवडत्या कलाकारांसाठी. दोघींचाही अभिनय आवडला. मोहन आगाशे, सुहासिनी मुळे ह्यांच्याबद्दल तर काय लिहिणार? कसलेले कलाकारच ते!
पण कादंबरी वाचली, एकदा नव्हे, पुन्हा-पुन्हा.... तेव्हा रीटा काळजात अशी काही रुतून बसली............
सिनेमातली रीटा पार पुसलीच गेली!!!!
सागर
सागर · Fri, 11 Mar 2011 - 17:47 · उत्तर
चित्राला विरोपवले होते उत्तर पण उत्तर बरोबर ओळखूनही मी विजेता नाही होऊ शकलो या कोड्याचा :(
देर आये दुरुस्त आये असे झाले माझे. :)
पुस्तक ओळखले (खरंतर आठवले) यातच समाधान
वल्ली
वल्ली · Fri, 11 Mar 2011 - 17:49 · उत्तर
हेच म्हणतोय. :)