- Log in to post comments
ट्रॅफिकचा दिवा हिरवा होतो न होतो तोच रांगेतील सर्वात पुढची मोटार उजवीकडे वळून गेलीसुद्धा. समोरून येणार्या मोटारी पाहतच राहिल्या - जणू काय त्या गाडीच्या वेगाने आणि वेगाला साजेशा आवाजाने त्यांना स्तंभित करून टाकले होते.
"क्या गा़डी है भाई! अपन तो चलाते है ये बैलगाडी - " जुनाट अॅम्बॅसेडरला वेग देत समोरच्या रांगेतला टॅक्सीवाला म्हणाला.
"होगी किसी फारिनवालेकी." टॅक्सीतला प्रवासी म्हणाला.
"माल तो फारिन का है लेकिन मालिक यहीं का है. इस गाडी को तो सब दिल्लीवाले पहचानते है - पिछले पॉँच महिनोंसे ये दौडती है यहाँकी सडकों पर." टॅक्सीवाले सरदारजी दाढी कुरवाळत म्हणाले.
अरुबिंदो मार्गावरून रिंग रोडवर वळलेली ती अल्फा रोमिओ गाडी लवकरच डावीकडे वळून वसंतविहार वसाहतीकडे गेली. तिच्या चालकाला साहजिकच आपल्या गाडीचा अभिमान होता. लहानपणापासून नवीनचंद्र पांडेला वेगवान गाड्यांचं आकर्षण होते. पुढे त्या आकर्षणाचे महत्त्वाकांक्षेत रूपांतर झाले. काहींना रोल्स राईस सर्वश्रेष्ठ वाटते, काही कॅडलिकच्या मागे धावतात तर काहींची महत्त्वाकांक्षा मर्सिडीज बेंझचा मालक व्हायची असते. नवीनला त्या डौलदार गाड्या नको होत्या. युरोपातील वास्तव्यात अनेक स्पोर्ट्सकार पाहून त्याने अल्फा रोमिओ निवडली, आणि जबरदस्त ड्यूटी भरून भारतात आणली. आल्यानंतर काही दिवसांतच ती लालभडक मोटार दिल्लीकरांच्या चर्चेचा आणि असूयेचा विषय बनली.
दुवे -
१. नवीनचंद्र पांडे.
२. अल्फा रोमिओ गाडी.
३. कादंबरिका.
४. लेखक भारतातील एक मोठा माणूस. म्हणजे ज्याची व्यक्तिमत्वीय व्याप्ती मराठीच्याही पल्याड जाते.
या दुव्यांवरही कोडे सुटले नाही, तर मात्र सोमवारी आणखी एक दुवा देतो. तो अंतिम दुवा असेल. त्यानंतर मला कोड्याचे उत्तर द्यावे लागेल. :)
हा शेवटचा दुवा -
५. विज्ञान!
अभिप्राय
मस्त कलंदर
मस्त कलंदर · Fri, 23 Jul 2010 - 19:41
नाही ओळखत कुठल्या पुस्तकातला वेचा आहे ते!!!
श्रावण मोडक
श्रावण मोडक · Fri, 23 Jul 2010 - 20:52 · उत्तर
अरे, हा भाग या पुस्तकातील लक्षात राहण्याजोगा आहे. त्यात दोन सूचक गोष्टी आहेत. नवीनचंद्र पांडे आणि अल्फा रोमिओ...
वेदश्री
वेदश्री · Sun, 25 Jul 2010 - 14:46
नाही सापडतेय रे उत्तर! आता पुन्हा म्हणशील ना की 'किती सोप्पं उत्तर होतं असं म्हणशील उत्तर कळाल्यावर!' तर याद राख!! उत्तर काय असेल याचा विचार करकरुन डोक्याचं दही झालंय एव्हाना!!!
स्वगतः हे पुस्तक मी वाचलेल्यातलं निघालं तर??!!! रामाकृष्णागोविंदा, वाचव रे देवा.. पारायण करते हवे तर पण शिक्षा म्हणून नको! :(
वेदश्री
वेदश्री · Mon, 26 Jul 2010 - 11:27
एक मिनिट एक मिनिट.. विज्ञान कादंबरीकेवरून आठवले. जयंतमामाचे पुस्तक आहे हे! वामन परत न आला हेच आहे ते! आईकडून कन्फर्म करून घेतले आत्ताच. नविनचंद्र पांडे हे नाव कुठेतरी स्वार्थीपणाशी मॅप होत होते आधी डोक्यात पण नक्की लिंक लागत नसल्याने डोक्याची मंडई झाली होती. आता अगदी निवांत वाटते आहे. उत्तर शोधलेय तरीही ५ क्ल्यू दिले जावे लागले त्यामुळे आनंदाने पारायण करणार आता वामनाचे! :)
ऋषिकेश
ऋषिकेश · Mon, 26 Jul 2010 - 11:31 · उत्तर
हो बहुतेक मलाही तसेच वाटतेय जयंत नारळीकरच असावेतसं.. फक्त "वामन परत न आला" की "प्रेषित" हे आठवत नाहिये (प्रेषितचा हिरो बहुतेक "आलोक" होता.. पण त्याचे वडीत नवीनचंद्र पांडे असु शकतात म्हणून तो ही ऑप्शन ओपन ठेवतोअय :प)
वेदश्री
वेदश्री · Mon, 26 Jul 2010 - 11:48 · उत्तर
>(प्रेषितचा हिरो बहुतेक "आलोक" होता.. पण त्याचे वडीत नवीनचंद्र पांडे असु शकतात म्हणून तो ही ऑप्शन ओपन ठेवतोअय :प)
ऋ, हातात घेतले असशील ते पुस्तक वाचून झाले की गपगुमान वामनचेच नाही तर प्रेषितचेही पारायण कर. अलोकचे वडील नविनचंद्र पांडे असा क्षुद्र विचार येतोच कसा म्हणते मी तुझ्या डोक्यात?! :P कैच्याकैच!
ऋषिकेश
ऋषिकेश · Mon, 26 Jul 2010 - 13:45 · उत्तर
वा वा! इतकी छान हवीहवीशी शिक्षा कधी मिळालीच नव्हती ;)
फक्त माझं प्रेषित एकाने नेलंय ते आजतागायत परत आलेलं नाहि :( आता ग्रंथालयात शोधतो :(
सागर
सागर · Fri, 30 Jul 2010 - 15:45 · उत्तर
ऋषिकेशा
बंगळुरात असलास तर माझ्याकडून केव्हाही प्रेषित घेऊन जा. जयंत नारळीकरांची बहुतेक सगळी मराठी पुस्तके माझ्या संग्रही आहेत :)
नारळीकरांची पुस्तके म्हणजे विज्ञानप्रेमींसाठी मेवाच :)
श्रावण मोडक
श्रावण मोडक · Mon, 26 Jul 2010 - 11:46
हो. वामन परत न आला... वेदश्रीचं उत्तर बरोबर आहे. पुढचे कोडे आज रात्री.
वेदश्री
वेदश्री · Mon, 26 Jul 2010 - 11:58 · उत्तर
>पुढचे कोडे आज रात्री.
ग्रेट! ये हुई ना बात! वाट बघतेय पुढच्या कोड्याची. मजा येतेय हेवेसांनलगे! आणि हो क्ल्यू देण्याची कल्पना खूपच आवडली. का तेही वेसांनलगे! ;-)