- Log in to post comments
जिराईतातील बाजरी हळूहळू वाढली. पोटरीतून लांब दांड्यांची शेलाटी कणसे बाहेर पडली. हिरव्या ताटांवर तपकिरी रंगांची कणसे सर्वत्र डुलू लागली आणि लवकरच जांभळ्या फुलोर्यांनी फुलून गेली. तो नाजूक फुलोरा डवरला आणि लहान मुंग्या कणसांवर चढू लागल्या. मधमाशा कणसांभोवती फिरू लागल्या. पिवळ्या रंगाची लहान फुलपाखरे जोडीजोडीने तरंगत येऊन बसू लागली. कधी धिंगाणा घालणार्या वार्यावर फुलोरा उडू लागला आणि कणसे उघडी पडू लागली. बाजरीच्या बरोबरीने, आत टाकलेले कडधान्याचे वेल पसरू लागले. मटकीच्या शेंगांचे झुपके कुठकुठे दिसू लागले. हुलग्याला जोम आला. तुरीच्या उभार झाडांवर सावळ्या शेंगा दाण्यांनी भरू लागल्या. भुईमुगाच्या मुळ्या अंडी धरू लागल्या. बांधाबांधावर उगवलेले कुर्डूचे पांढरे-जांभळे तुरे लागले. आणि लवकरच फुलोर्यांनी डवरलेली कणसे बाजरीच्या चमकदार दाण्यांनी टचटचली. चिवळांचे थवे भरात येऊन ते दुधाने भरलेले दाणे खाऊ लागले.
दुवा १: हे पुस्तक अनेकांना वेडं करतं. त्याच्या २००६ पर्यंत एकोणीस आवृत्त्या झाल्या.
दुवा २: एक चित्रपटही या पुस्तकाशी नातं सांगतो.
कोडं येथेही सुटलं नाही तर
दुवा ३: मंगळवारी संध्याकाळी दिला जाईल.
दुवा ४: बुधवारी संध्याकाळी दिला जाईल.
दुवा ५: गुरूवारी संध्याकाळी दिला जाईल.
चला लागा कामाला.
अभिप्राय
वेदश्री
वेदश्री · Tue, 27 Jul 2010 - 10:06
माझा सपशेल पास आहे अजुनतरी.
दिगम्भांचे म्हणणे आहे की हे आनंद यादवांचे लेखन असणार. बहुतेक करून गोतावळा आणि ते नसेलच तर मग झोंबी. बरोबर आहे का?
फुलपाखरांचे जोडीजोडीने तरंगणे, धिंगाणा घालणारा वारा, अंडी धरू लागणार्या भुईमुगाच्या शेंगांची मुळे या कल्पना तर खूपच आवडल्या पण त्यातही तुरीच्या उभार झाडांवर सावळ्या शेंगा दाण्यांनी भरू लागल्या हे वाक्य खासच!
श्रावण मोडक
श्रावण मोडक · Tue, 27 Jul 2010 - 10:18 · उत्तर
नाही. यादवांचा सुतरामही संबंध नाही.
'गोतावळा' आणि 'झोंबी'शी संबंधित चित्रपट? मला नाही माहिती. आणि त्या पुस्तकांच्या इतक्या आवृत्त्या?
या एकूण लेखनाची भाषा नागर आहे, पण त्यात टिपलेले सारे काही अस्सल गावरान आहे. हा खरं तर एक क्ल्यूच देतोय.
वेदश्री
वेदश्री · Tue, 27 Jul 2010 - 11:04
मग गोनीदांचे पवनाकाठचा धोंडी? आवृत्ती कळली नाही पण याच नावाच्या चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळालाय १९६७ साली! माचीवरला बुधा त्याची आत्ताशी ७वी आवृत्ती निघालेली असल्याने कटाप केले. - दिगम्भा!
स्वगतः मला आता गेसलेस झाल्याबद्दल माझीच किती लाज वाटतेय याची काही सीमाच नाही. स्मायलीदेखील थिटे पडलेत आता!
श्रावण मोडक
श्रावण मोडक · Tue, 27 Jul 2010 - 11:23 · उत्तर
नाही. या पुस्तकावरील चित्रपट अलीकडच्या काळातील आहे. आणि या चित्रपटाने राज्य सरकारचा उत्कृष्ट चित्रपटाचा तर राष्ट्रीय स्तरावर मराठीतील उत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळवला आहे.
वेदश्री
वेदश्री · Tue, 27 Jul 2010 - 11:47 · उत्तर
बनगरवाडी - व्यंकटेश माडगूळकर
राज्य सरकारतर्फे उत्कृष्ट चित्रपट पुरस्कार (१९९४)
उत्कृष्ट चित्रपट - राष्ट्रीय पुरस्कार (१९९५)
फिल्मफेअर उत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार (१९९७)
- अर्थातच दिगम्भा!
श्रावण मोडक
श्रावण मोडक · Tue, 27 Jul 2010 - 12:38 · उत्तर
हाहाहाहा... दिगम्भा? नाही चालणार!
वेदश्री
वेदश्री · Tue, 27 Jul 2010 - 12:56 · उत्तर
>हाहाहाहा...
काय झालं रे इतकं छद्मी हसायला?
>दिगम्भा? नाही चालणार!
का? आणि चालेल की नाही ते नंतर बघू, आधी उत्तर बरोबर आहे की नाही ते सांग! मी दिगम्भांचं नाव न टाकता माझ्या नावानेही त्यांची उत्तरे ठोकू शकले असते पण.... घोर कलियुग आलंय म्हणतात ते काही खोटं नाहीच! :-(
ऋषिकेश
ऋषिकेश · Tue, 27 Jul 2010 - 13:24
नटरंग?
असाच एक वाईल्ड गेस.
नाहितर चित्रपट जोगवा
पुस्तक डॉ. राजन गावस यांचे भंडारभोग
श्रावण मोडक
श्रावण मोडक · Tue, 27 Jul 2010 - 19:29
वेदश्रीचे अभिनंदन. तिने दिगम्भांची मदत घेत, आणि ती निखळपणे मान्य करत, बरोबर उत्तर दिलं.
पण...
पूर्वी एकदा वेदश्रीनेच या कोड्यांसाठी येणारी उत्तरे झाकलेली राहतील, ती फक्त इथले संपादक आणि कोडे टाकणाऱ्याला दिसेल अशी सोय देण्याची सूचना केली होती. त्या सूचनेला पूर्ण पाठिंबा. त्यावेळीही होता, आज तो मांडतोय.
नीलकांत आणि सहकारी, कृपया या उपक्रमाचा विचार करून ती सोय लवकरात लवकर द्यावी.
वेदश्री
वेदश्री · Tue, 27 Jul 2010 - 20:15 · उत्तर
मी काय मदत घेतली दिगम्भांची? अख्खे उत्तरच त्यांनी दिलेय दरवेळी!!! मी टंकलेल्या वरच्या एकाही पुस्तकाचे वाचन करणे तर दूरच राहिले मला साधे नावदेखील माहिती नव्हते दिगम्भांनी ते सांगायच्या आधी!!! माझे कसले अभिनंदन करतोयस मग???!!! आत्तापर्यंत नुसतीच लाज वाटत होती वाचनात दारिद्र्यरेषेखाली असल्याबद्दल पण आता अक्षरश: माझ्यापुरती धरणी दुभंगावी आणि तिच्यात मी गडप व्हावेसे वाटायला लागले आहे मला!
झाकलेल्या प्रतिसादांच्या सोयीच्या नितांत गरजेबद्दल.. +++...१०००...
निखिल देशपांडे
निखिल देशपांडे · Wed, 28 Jul 2010 - 07:36 · उत्तर
खरयं..
एकानेच इतके वेगवेगळे केलेले प्रयत्न बघुन डोके भंजाळते..
त्यामुळे कोड्याचे प्रतिसाद बंदच असावेत
ऋषिकेश
ऋषिकेश · Tue, 27 Jul 2010 - 19:46
अरेरे इतकं सोपं नसावं असं समजून मी नाव लिहिता लिहिता थांबलो
खरंतर मिपावरचे श्री.प्रदिप मला भेटले होते तेव्हा त्यांनी हे पुस्तक मला भेट दिले होते.. आणि की ते एकदा वाचून ठेऊन दिले आहे.. काल जरा शंका आल्या आल्या उघडून बघितले असते तर! असो. वेदश्री आणि दिगम्भांचे अभिनंदन
वेदश्री
वेदश्री · Tue, 27 Jul 2010 - 21:02 · उत्तर
>काल जरा शंका आल्या आल्या उघडून बघितले असते तर!
तर आज धप्पा मिळाला नसता!!! सांघिक पारायण कुठे ठेवायचे सांग.. पुस्तक ठेवायला लाकडी तिकटीची व्यवस्था करणे माझ्याकडे लागले! ;-)
>वेदश्री.. अभिनंदन
ए, आता तू तरी जखमेवर मीठाचे पाणी ओतायचे काम करू नकोस! :,(