- Log in to post comments
एकदम उठून बसलो. कुठून तरी मंद सुवास येतो आहे- अगदी जवळून.
कसा?
ते कसं सांगू? पण एवढं जाणवतंय की तो अतिशय मऊ आहे, नाजूक आहे-कोवळा आहे.
कसला?
खरंच-कसला?
चिमणीचा उजेड माझ्या पायांपासून पलीकडे पडलेला होता. उठून चिमणी हातीं घेतली. पाहिलें- माझ्या उशाजवळ-एका कोवळ्या पळसाच्या पानावर-पाचसहा फुलं ठेवलेली होती--
मोगरीचीं!
तत्क्षणी सबंध अंगातून जशी वीज धावून पलीकडे गेली. सगळ्या अंगाला धक्के देत.
जणू सगळ्या शरीराला सुगंध घेण्याची शक्ती लाभली. सगळी काया थरथरत त्या मऊ सुगंधांत नहात्येय्--
तिनंच!
सात आहेत ती, सहा नाहीत, सात.
त्यांचे सुबक रचना तिच्या बुद्धीमत्तेचे कौतुक आहे, अन्-
तिनंच तर मग हे अंथरूण घातलं आहे!
तिनंच-आपल्या हातांनी!
*********************************************************************************************
पुस्तकाबद्दलचे संकेत कदाचित द्यावे लागणार नाहीत :-)
अभिप्राय
सागर
सागर · Sun, 8 Aug 2010 - 12:02
मी नक्कीच हे पुस्तक वाचलेले दिसत नाहिये. पण राहून राहून हा वेचा परिचयाचा वाटतो आहे.
'शितू' तर नव्हे?
एखादी प्रेमकथा वाटते आहे. किंवा बहुतेक वि.स.खांडेकरांच्या वा ना.सी.फडके यांच्या एखाद्या सुंदर पुस्तकातील वेचा असावा हा. स्पष्टच सांगतो. नाही येत :(
पण वेचा सुंदर आहे. वाचायची उत्सुकता नक्कीच निर्माण झाली आहे.
मस्त कलंदर
मस्त कलंदर · Sun, 8 Aug 2010 - 12:26
>>>एखादी प्रेमकथा वाटते आहे.
नाही हो... ही का ब्र्ह्मचार्याची कथा आहे..
>> बहुतेक वि.स.खांडेकरांच्या वा ना.सी.फडके यांच्या एखाद्या सुंदर पुस्तकातील वेचा असावा हा.
दोघांचाही वेचा नाही हा...
या पुस्तकाची प्रथमावृती १९५९ निघाली होती. खूप जुने आणि प्रसिद्ध असे हे पुस्तक आहे.
सागर
सागर · Sun, 8 Aug 2010 - 13:20
अच्छा
मग हे जीए कुलकर्णींच्या पठडीतले दिसते आहे. पिंगळावेळ?
व्यंकटेश माडगूळकरांचे घर-दार देखील असेच सुंदर पुस्तक १९५९ सालीच प्रकाशित झाले होते. पण ते पुस्तक नाही वाटत वरील वेच्यावरुन.
मस्त कलंदर
मस्त कलंदर · Sun, 8 Aug 2010 - 13:43
आज विकांत आहे. बरेच जण ऑनलाईन नाहीत. उद्यापासून गरज पडल्यास संकेत द्यायला सुरूवात करते.
श्रावण मोडक
श्रावण मोडक · Sun, 8 Aug 2010 - 14:45
भारीच वेचा आहे. त्रोटक आहे, पण इकडून-तिकडं फिरवणारा आहे. कारण, आहे त्या मजकुरावरच जे आडाखे बांधण्याचे प्रयत्न झाले त्यांची व्याप्तीच अफाट आहे. वर खांडेकर, फडके या दोघांचा उल्लेख झाला. शैली त्यांच्यासारखीच. पण ते नाहीत. माडगूळकरांकडं ही शैली (शैली म्हणण्यापेक्षा, भाषेची प्रकृती) आहे असं मला नाही वाटत. तेही नाहीत; पण त्यांचा उल्लेख झालाच. जीए नाहीतच. प्रश्नच नाहीतच, तरीही त्यांचाही उल्लेख झाला.
पुढचा संकेत १९५९ सालचं पुस्तक. गाजलेलं. ब्रह्मचाऱ्याची कथा. इथं लेखक ओळखला जाण्याची एक शक्यता आहे.
राहिलेल्या नावात कानेटकर, कुसुमाग्रज (जर त्यांचं काही गद्य असेल तर), देसाई वगैरे मुख्य धारेतले. त्यांच्यापैकी कोणी? विश्राम बेडेकर नाहीत हे नक्की. मग राहिलं कोण?
किती 'फिरवणार' हा वेचा असा?
मी ओळखलं पुस्तक. माझ्या या लिखाणात दोन संकेत आहेतच दिलेले. आता पुढं कोण ओळखेल हे पुस्तक?
माया ज्ञानेश
माया ज्ञानेश · Sun, 8 Aug 2010 - 18:52
स्मरणगाथा किंवा भ्रमणगाथा ? गोनिदा नक्की ! भ्रमणगाथेतलंच आहे. :)
सागर
सागर · Mon, 9 Aug 2010 - 11:10
हम्म,
भ्रमणगाथा वाचलेलं नाही मी अजून...दुर्दैवानं :(
वेदश्री
वेदश्री · Mon, 9 Aug 2010 - 14:35
पुस्तक मी वाचलेल्यातले वाटत नाही (नेहमीप्रमाणेच?!) त्यामुळे माझा पास!
>माझ्या उशाजवळ-एका कोवळ्या पळसाच्या पानावर-पाचसहा फुलं ठेवलेली होती--
>मोगरीचीं!
कलिजा खल्लास! उठवायचेच असेल तर ते अशाप्रकारे असावे!! पळसाच्या पानावर मोगरीची फुले.. किती मनमोहक सुगंधी योजना आहे ही उठवण्याची!!!
मस्त कलंदर
मस्त कलंदर · Wed, 11 Aug 2010 - 09:15
उत्तर बहुतेकांनी बरोब्बर ओळखलं. आणि काहींनी लेखक ओळखला पण नेमकं पुस्तक तेच त्यांना आठवले नाही.
पुस्तक ओळखणारे लोकः
निखिल, श्रामो, माया.
अदिती आणि सागर यांना शितू कदाचित गोनीदांच्या शैलीमुळे वाटले असावे.
सागर
सागर · Wed, 11 Aug 2010 - 10:47 · उत्तर
अदिती आणि सागर यांना शितू कदाचित गोनीदांच्या शैलीमुळे वाटले असावे.
हो बरोबर आहे. गोनीदांच्या शैलीमुळेच पहिल्यांदा शितूची आठवण झाली. पण दुर्दैवाने भ्रमणगाथा वाचले नसल्यामुळे मग पुढे गोंधळच उडाला.. :)
असो. भ्रमणगाथा नक्की वाचणार आहे आता
सागर
सागर · Mon, 16 Aug 2010 - 15:07 · उत्तर
भ्रमणगाथा मागवले होते. आजच मिळाले
आता अधाशासारखा तो वेचा त्या पुस्तकात शोधतो आहे :)
वेचा शोधून पुस्तक निवांत वाचेन... सध्या डिसेप्शन पॉईंट मधे मग्न आहे :)
अवांतरः वेचा संपादित करुन पुस्तकाचे नाव तेवढे जोडून टाका की मस्त कलंदर ... :)