- Log in to post comments
ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे ते... - १९
१. संकेत देण्याची आवश्यकता नाही.
२. १-२ दिवस वाट पाहून संकेत दिले जातील :) ( अर्थात त्याची वेळच येणार नाही याची खात्री वाटते)
(हा माझा गैरसमज होता)
आदितीने विरोपाद्वारे योग्य उत्तर दिलेले आहे. आदितीचे अभिनंदन :)
वेच्यात दिलेली परिस्थिती नारळीकरांनी जास्त वेळा त्यांच्या कथांमधून वापरली असल्यामुळे थोडासा गोंधळात टाकणारा वेचा होता खरा हा. पण म्हणूनच मी दिला होता :)
पुस्तकाचे नाव : अभयारण्य
लेखकः जयंत नारळीकर
प्रकरण क्रमांक १२
पृष्ठ क्रमांक : ५६
योग्य उत्तर देण्यासाठी
दृष्य प्रयत्न करणार्या वेदश्री, मस्त कलंदर, आदिती,ऋषि, वल्ली आणि श्रावण यांचे धन्यवाद.
तसेच
मनातल्या मनात उजळणी करुन उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणार्या अज्ञात वाचकांनाही धन्यवाद :)
वेचा क्रमांक १९:
==================================================
तो तिसरा पर्यायच अखेर मान्य झाला. पृथ्वीवर वसाहत उभारुन चरम-४ पुढचे अनेक प्रश्न सुटणार होते. नाही तरी बारमानवरचे उद्रेक वाढू लागल्यावर हा ग्रह केव्हा ना केव्हा तरी आपल्याला सोडावा लागणार आहे याची कल्पना चरम वासियांना आली होती. परंतु पर्यायी निवासस्थान कसे आणि कुठे असावे याबद्दल निश्चित काहीच झाले नव्हते. नैसर्गिक ग्रह शोधून तिकडे वास्तव्यासाठी परत जाणे यात पुष्कळ कालावधी लागणार, उर्जा लागणार. त्यापेक्षा बारमानभोवतीच आणखी लांब अंतरावर कृत्रिम वसाहत का उभारु नये? तशा चरम - ४ भोवती काही वसाहती घिरट्या घालत होत्याच. तसाच, पण प्रचंड प्रमाणावर मोठा प्रकल्प साकार करणे चरमकरांना अशक्य नव्हते. फक्त अशी वसाहत चरमभोवती नव्हे तर बारमानभोवती कृत्रिम ग्रह म्हणून फिरत राहणार.
पण आता ही पृथ्वीबद्दलची माहिती अनायासे हाती आल्याने सर्व समीकरण बदलून गेले होते. शोधाकरता लागणारा वेळ आणि उर्जा दोन्हींची आता गरज नव्हती. फक्त पृथ्वीकडे जायची मोहीम आखणेच राहिले होते. त्यासाठी पाच कलमी कार्यक्रम आखण्यात आला.
==================================================
अभिप्राय
मस्त कलंदर
मस्त कलंदर · गुरुवार, 12 Aug 2010 - 16:38
नारळीकरांचे पुस्तक असावे असे वाटतेय. पण वाचले नाहीए अजून...
आपल्याकडे असे काही वैज्ञानिक वाचले की लगेच नारळीकरच वाटतात नै???
सागर
सागर · Fri, 13 Aug 2010 - 08:20 · उत्तर
>>आपल्याकडे असे काही वैज्ञानिक वाचले की लगेच नारळीकरच वाटतात नै???
अगदी सहमत आहे. दुसरे लेखक नारळीकरांसारखे लिहूच शकत नाही असे चित्र आहे खरे या क्षेत्रात. पण ते तितकेसे बरोबर नाहिये. बरेच दुसरे जुने आणि नवीन नवीन लेखक आहेत...येत आहेत. :)
प्रयत्न करा जमेल उत्तर
वल्ली
वल्ली · Fri, 13 Aug 2010 - 08:31 · उत्तर
नारळींकरांचेच असेल तर मग अंतराळातील भस्मासुर किंवा यक्षांची देणगी असे यांपैकीच असले पाहीजे.
दुसरे लेखक असतील तर मात्र ल़क्ष्मण लोंढे असावेत.
काही वेचे सोपे-सोपे असे वाटतानाही अवघड भासतात यांपैकीच हा एक वेचा आहे.
सागर
सागर · Fri, 13 Aug 2010 - 10:53 · उत्तर
अंतराळातील भस्मासुर किंवा यक्षांची देणगी यापैकीही नाहिये. :)
>> काही वेचे सोपे-सोपे असे वाटतानाही अवघड भासतात यांपैकीच हा एक वेचा आहे
हे मात्र अगदी खरे :)
ऋषिकेश
ऋषिकेश · Fri, 13 Aug 2010 - 19:40
ए काहिहि काय सांगतो! मला नाहि माहित उत्तर :P
असाच एक अंदाज करतो.. सूर्याचा प्रकोप आहे का? :)
नाहितर मग मोहन आपट्यांचं एखादं पुस्तक?
श्रावण मोडक
श्रावण मोडक · Sat, 14 Aug 2010 - 18:34
व्हायरस, वामन, प्रेषीत वगैरेत हे नाही. नारळीकरांचं आणखी कोणतं पुस्तक असावं? भारी आहे कोडं.
सागर
सागर · Sun, 15 Aug 2010 - 12:34
वर उल्लेखिलेल्या पैंकी कोणतेही पुस्तक नाहिये. :)
विकएन्ड साठी मोठा क्लू देतो.
माझ्या वरील प्रतिक्रियांपैकी एका प्रतिक्रियेत लेखकाचे नाव आले आहे :D
प्रकरण १२ व्याच्या सुरुवातीचा वेचा आहे
कोणी उत्तर नाही दिले तर उद्या सोमवारी उत्तर देईन :)