- Log in to post comments
संकेत १: प्रस्तुत पुस्तकाचे लेखक हे एक नामवंत पत्रकार आहेत.
संकेत २: हे लेखकाचे स्वतंत्र पुस्तक आहे. अनुवाद नाही
संकेत ३: सदरचे पुस्तक एका वर्तमानपत्रात 'युद्धाच्या छायेत' ही लेखमाला म्हणून प्रसिद्ध झाले होते त्याचेच हे पुस्तक प्रकाशित झाले आहे
ठीक आहे शेवटचा आणि संकेत क्रमांक ४ देत आहे. त्यावरुन ओळखणे अवघड नाही पडणार :)
संकेत ४: या लेखकाचे 'सत्तांतर' नावाचे तीन खंड खूप गाजलेले आहेत. आणि हे लेखक महाराष्ट्र टाईम्स मध्ये २७ वर्षे संपादक होते.
आता बोला मंडळी ... उत्तर येईल असे वाटते आहे :)
पुस्तकाचे नावः अग्निकांड
लेखक : गोविंद तळवलकर
लेखकाचे नाव रोचीन आणि वल्ली यांनी ओळखले. पण सत्तांतर या गाजलेल्या पुस्तकाचा संकेत दिल्यानंतर.
अनेकांनी वाचलेले नसल्यामुळे पुस्तकाचे नाव देत आहे.
वेचा:
---------------------------------------------
आक्रमणः
११ सप्टेंबर २००१ रोजी न्यूयॉर्क येथील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारतींवर दोन विमानांनी धडक दिली आणि त्याच सुमारास वॉशिंग्टन इथल्या संरक्षण खात्याच्या (पेन्टॅगॉन) इमारतीवरही आणखी एक विमान कोसळले. तेव्हापासून बिन लादेन व मुल्ला महंमद ओमार, तसेच तालिबान व अल् काईदा यांचा उल्लेख जगभरची वृत्तपत्रे आणि प्रसारमाध्यमे रोजच्या रोज करत आली आहेत. बिन लादेन याने या सर्व विध्वंसक घटनांना प्रेरणा दिली असून ओमार हा अफगाणी मुल्ला बिन लादेनचा साथीदार आहे. त्यांच्यासंबंधी व तालिबान व अल् काईदा या संघटनांविषयी ११ सप्टेंबरपूर्वी मर्यादित वर्तुळात व मर्यादित प्रमाणात चर्चा होत होती. ११ सप्टेंबरच्या दुर्घटनेनंतर ती जगभर होऊ लागली. यापूर्वी केनिया आणि तान्झानियामधील अमेरिकन वकिलातींवर बॉम्बहल्ला झाला होता आणि अमेरिकन नौदलाच्या बोटींवरही झाला. या सर्व हल्ल्यांत अमेरिकन व स्थानिक लोक बळी पडले होते. त्यांमागे बिन लादेनचा हात असल्याचा अमेरिकेचा ग्रह असल्यामुळे बिन लादेन याच्या सुदानमधील कारखान्यावर क्षेपणास्त्र धाडून तो नष्ट करण्यात आला. तसेच अफगणिस्तानात बिन लादेनचा जिथे मुक्काम असल्याची अमेरिकेकडे माहिती होती त्या ठिकाणीही बॉम्बहल्ला करण्यात आला. पण बिन लादेन यास याची सूचना अगोदरच मिळाली असल्यामुळे तो निसटला आणि त्याच्या हस्तकांनी ११ सप्टेंबर रोजी न्यूयॉर्क आणि वॉशिंग्टन इथेच विमानांची धडक देऊन दहशतवादाचा एक नवा आणि भयानक प्रकार जगास दाखवून दिला. असा हा बिन लादेन कोण आहे; तो इतका प्रबळ कसा झाला; त्याला मदत करणारा मुल्ला ओमार याची पूर्वपिठीका काय; या दोघांच्या संघटनांची शक्ती वाढली कशी, इत्यादीची माहिती करुन घ्यायची तर सोव्हिएत युनियनने अफगणिस्तानावर केलेल्या लष्करी आक्रमणाचा इतिहास लक्षात घेणे आवश्यक आहे. कारण बिन लादेन हा या आक्रमणाच्या काळात पुढे आला आणि त्याहीपेक्षा सोव्हिएत युनियनने अफगणिस्तानमधून माघार घेतल्यानंतर त्याचे नेतृत्त्व प्रस्थापित झाले. एक नवा दहशतवादी पंथ त्याने वाढवला. ....
अभिप्राय
ऋषिकेश
ऋषिकेश · गुरुवार, 9 Sep 2010 - 10:01
नाही वाचलेले.. पास
वेदश्री
वेदश्री · गुरुवार, 9 Sep 2010 - 10:26 · उत्तर
+१
मस्त कलंदर
मस्त कलंदर · Fri, 10 Sep 2010 - 06:04 · उत्तर
मी पण वाचलेले नाहीय.
दिगम्भा
दिगम्भा · Fri, 10 Sep 2010 - 08:24 · उत्तर
+३
पास.
निखिल देशपांडे
निखिल देशपांडे · Fri, 10 Sep 2010 - 09:21 · उत्तर
आपला पण पास
वल्ली
वल्ली · गुरुवार, 9 Sep 2010 - 11:51
अनुवादित आहे किंवा अस्सल मराठी हे कळायला हवे. आंतरराष्ट्रीय राजकारणावरची पुस्तके बव्हंशी अनुवादितच असतात. त्यात नामवंत पत्रकार म्हणजे बहुतेक अनुवादितच असावे.
श्रावण मोडक
श्रावण मोडक · गुरुवार, 9 Sep 2010 - 13:07
केवळ अंदाज असल्याने इथे लिहितो -
अवघड अफगाणिस्तान.
निळू दामले.
हे पुस्तक मी वाचलेले नाही. अफगाणिस्तान आणि ज्येष्ठ पत्रकार या दोन संदर्भांवरून हा अंदाज केला.
बाकी निळू दामले आजकाल आपण लेखक आहोत इतकाच दावा करतात हे ऐकलं आहे. ;)
वाचक
वाचक · गुरुवार, 9 Sep 2010 - 13:55
अफगाण डायरी (असे वाटते आहे)
सागर
सागर · गुरुवार, 9 Sep 2010 - 14:03
हे प्रतिभावान लेखक शक्यतो अनुवादाच्या भानगडीत न पडता स्वतः लेखन करण्यावर जास्त भर देतात.
हे पुस्तक स्वलिखितच आहे. अजून एक संकेत वर देत आहे. तो पहा काही उलगडते का :)
रोचीन
रोचीन · Fri, 10 Sep 2010 - 10:18
गोविंद तळवलकर -- अफगाणिस्तान का??
सागर
सागर · Fri, 10 Sep 2010 - 11:49 · उत्तर
रोचीन,
प्रयत्न छान होता. लेखक बरोबर ओळखला तुम्ही. पुस्तक हे नव्हे.
पुस्तक अनेकांनी वाचले नसल्याचे जाणवते आहे त्यामुळे उत्तर देतो आहे.
एक नक्की की हे पुस्तक सर्वांनी नक्की वाचले पाहिजे, आंतरराष्ट्रीय राजकारण (त्यातही अमेरिकेचे) ढवळून टाकणार्या अल् काईदा ची निर्मिती कशी झाली व त्याची मुळे कुठे रुजली आहेत हे तळवलकरांसारख्या चतुरस्त्र बुद्धीच्या पत्रकाराकडूनच माहिती करुन घ्यावे :)
वल्ली
वल्ली · Fri, 10 Sep 2010 - 11:02
म्हणजे गोविंद तळवलकरच असणार. पण पुस्तक कुठले ते माहीत नाही.
सागरराव, तुम्ही फार अवघड वेचे घालता ब्वॉ. पुस्तके जास्त प्रचलित नसल्याने तसेच लेखनशैलीही वेगवेगळी असल्याने ओळखायला अवघड जाते.
अवांतरः तुमच्याकडे सुहास शिरवळकरांची इतकी पुस्तके आहेत. त्यातीलच एखादा वेचा द्या ना कधी. ओळखायला मजा येइल. :)
सागर
सागर · Fri, 10 Sep 2010 - 11:50 · उत्तर
उत्तर देतो आहे
शिरवळकरांचा वेचा लवकरच देईन. पण सध्या मी ब्रेक घेतो आहे. एवढ्यात मी बरेच वेचे दिले आहेत.
आता थोडा वाचनाचा आनंद घेईन म्हणतो :)
रोचीन
रोचीन · Fri, 10 Sep 2010 - 11:15
@ वाचकः
अफगाण डायरी हे प्रतिभा रानडे यांनी लिहिलेले आहे. निळू दामले यांनी नाही!!!प्रतिभा रानडे या पत्रकार नाहीत!!
वाचक
वाचक · Fri, 10 Sep 2010 - 22:33 · उत्तर
'पत्रकार' ह्या संकेतामुळे आणि एका दिवाळी अंकात वाचलेल्या दामल्यांच्या अफगाणिस्तान विषयक लेखामुळे गल्लत झाली.