- Log in to post comments
वाचले असेल तर नक्की ओळखता येईल. वाचले नसेल तर संकेत देऊन काहीच उपयोग नाही :)
मुदतः ३ दिवस (सोमवारी संध्याकाळी उत्तर जाहीर करेन)
या वेच्यानंतर मी मोठा ब्रेक घेत आहे. यापुढे मी वेचे देईन असे मला वाटत नाही.
संकेत १: हे पुस्तक अनुवादीत नाहिये
संकेत २: हे मराठीतील एक अतिशय यशस्वी लेखक आहेत. वल्ली यांनी मला या लेखकाचा वेचा द्यायची इच्छा
मागच्या वेच्याच्या वेळी व्यक्त केली होती ( लेखक आहेत सुहास शिरवळकर... आता बोला :) )
म्हणुनच म्हटले होते की "वाचले नसेल तर संकेत देऊन काहीच उपयोग नाही ..." बघा प्रयत्न करुन ... :)
*** वल्ली यांचे अभिनंदन... फक्त त्यांनीच हे पुस्तक बरोबर ओळखले आहे ***
पुस्तकाचे नाव : गुणगुण
( यात ३ कथा आहेत... १- गुणगुण, २-पोकळी आणि ३ फक्त... यातील फक्त या कथेतील हा वेचा आहे.)
लेखक सुहास शिरवळकर...
कथानक अस्सल भारतीय आहे. निशी नावाच्या गोड मुलीच्या प्रेमात पडलेला एक बुद्धीमान तरूण शास्त्रज्ञ संचित एका गूढ शक्तीपायी कसा त्याच्या प्रेयसीला मुकतो आणि पुढे काय होते हे माहिती करुन घेण्यासाठी ही कथा वाचा
वेचा:
-----------------
"स्टॉप आला, रॉब उतर" कार्टर कुजबुजला तशी सॅबत्सेननं कुतूहलानं बँकेच्या प्रचंड ठोकळ्यांकडे नजर टाकली. त्याच्या चेहर्यावर आश्चर्याचे भाव पसरले. अशी एकही जागा नव्हती, जिथे पोलिस नव्हता! युनिफॉर्ममधले जितके पोलिस होते त्याच्या दुप्पट प्लेन ड्रेसमधले होते. त्यांनी कितीही लपण्याचा प्रयत्न केला तरी त्यांची उपस्थिती चांगलीच जाणवत होती. कोटाच्या फुगीर खिशामध्ये रिव्हॉल्व्हर्स दडलेली आहेत हे गनहिलच्या सराईत नजरांनी केव्हाच ओळखलं होतं.
आणि असा पहारा असताना गॅरीनं पूर्वसूचना देऊन बँक लुटण्याचा विडा उचलला होता. दोन गोष्टींची आवश्यकता. धाडस आणि .... जीवनाविषयीचा तटस्थ दृष्टीकोन!
मनातल्या मनात गॅरीचं कौतुक करत सॅबत्सेन कार्टरच्या मागोमाग समोरच्या हॉटेलात शिरला. गॅरीच्या चॅलेंजची बातमी बहुतेक गावभर पसरलेली असावी. तिथे बसण्याकरता सोडूनच द्या, पाऊल ठेवायला पण जागा नव्हती. कार्टरला याची कल्पना असावी. आज सकाळीच त्यानं पंचवीस डॉलर्स अॅडव्हान्स भरुन खिडकीजवळचं टेबल रिझर्व्ह केलं होतं.
दोघंही आपापल्या खुर्चीत मुक्यासारखे बसून होते. ज्याच्याकरता हा धाडसी दरोडा घालण्यात येत आहे तो आपल्यातच बसलाय हे जर लोकांना माहित असतं तर सॅबत्सेन नक्की त्यांच्या नजरांचा केंद्रबिंदू बनला असता.
जीनमध्ये लिंबू पिळत सॅबत्सेन बँकेच्या दरवाज्याकडे टक लावून पाहत होता. कार्टर मात्र शांतपणे चिरुटाचे झुरके मारत थंडीचा प्रतिकार करत होता. त्याला गॅरीबद्दल यत्किंचितही काळजी वाटत नसावी. आसपासचे लोक गॅरीच्या चॅलेंजवर चर्चा करत होते आणि त्यांनी तोडलेले अकलेचे तारे ऐकत तो गालातल्या गालात हसत होता. जिल्वारीन जिल्वर्सना अदृश्य स्वरुपात मदत करतो... या मतापासून थेट जिल्वर्स ही जमात म्हणजे मानव आणि पिशाच्च असं मिक्स्ड ब्रीड आहे पर्यंतची मतं त्यानं यापूर्वीही हजारदा ऐकली होती.
बँकेच्या इन्टेरिअरमध्ये अचानक गोंधळ झाला आणि कॅफेत शांतता पसरली. कान टवकारुन सगळे आवाज घ्यायला लागले. बँकेच्या मेनगेटमधून एक स्क्वॉड लीडर इतस्ततः धावत बाहेर आलेला सर्वांनी पाहिला. आसपासचे पोलिस त्याच्या दिशेने धावले. तो मोठ्ठाले डोळे करुन हातवारे करुन त्यांना जोरजोरात सूचना द्यायला लागला अन् ....
कार्टर उठला.
"चल रॉब! गॅरीनं कॅश पळवली!" कार्टर कुजबुजला आणि सॅबत्सेन अक्षरशः बधीर झाला. त्याला आणि आसपासच्या हजारो नजरांना गॅरीचं नखही दृष्टीस पडलं नव्हतं आणि गॅरी बँक लुटून गेला होता!
"कार्टर....काय चमत्कार आहे हा?" शुष्क ओठांवरुन जीभ फिरवत सॅबत्सेननं विचारलं.
"तुम्हा शहरी लोकांचा वनस्पतीच्या सामर्थ्यावर विश्वास नसतो रॉब!"
लांब लांब ढांगा टाकून फुटपाथ क्रॉस करत कार्टर म्हणाला आणि सॅबत्सेनच्या डोक्यामध्ये लाखो कँडल्सचा प्रकाश चमकला!
-----------------
अभिप्राय
मस्त कलंदर
मस्त कलंदर · Sat, 11 Sep 2010 - 11:22
पास!!!!
:(
श्रावण मोडक
श्रावण मोडक · Sat, 11 Sep 2010 - 18:48 · उत्तर
माझाही पास.
काही मूळचे इंग्रजी थ्रिलर असावे.
सागर
सागर · Sun, 12 Sep 2010 - 12:28 · उत्तर
नाही श्रामो,
हे इंग्रजी थ्रिलर नाहिये.
अस्सल मराठी लेखकाचे पुस्तक आहे :)
श्रावण मोडक
श्रावण मोडक · Sun, 12 Sep 2010 - 16:06 · उत्तर
ओह्ह... मग ठीके. कारण मी शिरवळकरांचे दुनियादारी सोडून काहीही वाचलेले नाही!
वल्ली
वल्ली · Mon, 13 Sep 2010 - 11:31 · उत्तर
मग इतरही वाचाच. बरसात चांदण्यांची, झूम तर जबरदस्तच आहेत.
निवांत पोपट
निवांत पोपट · Sun, 12 Sep 2010 - 05:31
जेम्स हॅडली चेस?
सागर
सागर · Sun, 12 Sep 2010 - 12:25 · उत्तर
नाही हे जेम्स हॅडली चेस नाहिये
वल्ली
वल्ली · Sun, 12 Sep 2010 - 05:56
>>>वाचले असेल तर नक्की ओळखता येईल.
पुस्तक वाचलेले नाही
>>>वाचले नसेल तर संकेत देऊन काहीच उपयोग नाही. :)
तरीही संकेत हवाच. निदान त्या दिशेने प्रयत्न तरी करता येतील. पुस्तक तर अनुवादित दिसत आहे.
सागर
सागर · Sun, 12 Sep 2010 - 12:25 · उत्तर
बर ठीक आहे वल्ली संकेत देत आहे
रोचीन
रोचीन · Mon, 13 Sep 2010 - 10:09 · उत्तर
...
रोचीन
रोचीन · Mon, 13 Sep 2010 - 10:08 · उत्तर
>>पुस्तक तर अनुवादित दिसत आहे.
हि शक्यता जवळ जवळ अशक्य आहे कारण सुशिंनी कधि कुठल्या पुस्तकाचा अनुवाद केला आहे असं ऐकिवात नाहि. त्यांच्यावर अनेक पाश्च्यात्त लेखकंचा प्रभाव जरूर होता. त्यांच्या अनेक पुस्तकांचि नावे ही ईंग्रजी असायची. त्यामुळे अनुवादाचा भास होण्याची शक्यता आहे.
पण वरील पुस्तक मी हि वाचलेले नाही त्त्यामुळे माझाही पास!!
आनंदयात्री
आनंदयात्री · Sun, 12 Sep 2010 - 10:42
>>या वेच्यानंतर मी मोठा ब्रेक घेत आहे. यापुढे मी वेचे देईन असे मला वाटत नाही.
असे का हो मालक ? ब्रेक घ्या पण पुन्हा वेचे टाका.
सागर
सागर · Sun, 12 Sep 2010 - 12:29 · उत्तर
हो आनंदयात्री,
वेचे देईन पण ब्रेकनंतर
ब्रेक किती मोठा असेन माहिती नाही :)
वेदश्री
वेदश्री · Mon, 13 Sep 2010 - 08:40
सुशिंचे लेखन मी अजुनतरी काहीच वाचलेले नाही त्यामुळे पास!
वल्ली
वल्ली · Mon, 13 Sep 2010 - 11:30 · उत्तर
एव्हढी पुस्तके वाचूनही तु अजुन शिरवळकर काहीच वाचले नाही. त्यांच्या जवळजवळ ३००/३५० कादंबर्यांपैकी जवळजवळ सर्वच ९०% पेक्षाही जास्त वाचनीय आहेतच.
सागर
सागर · Mon, 13 Sep 2010 - 12:05 · उत्तर
या लेखकाचे कोणतेही पुस्तक घ्यावे आणि निखळ आनंद लुटावा हे मात्र खरे आहे :)
ज्यांनी सुशि वाचला नाही त्यांनी काय गमावले आहे ते सांगणे अवघड आहे कारण चवच माहिती नाही तर त्या चवीचे कौतुक ऐकून काय कळणार ? :)
वेदश्री
वेदश्री · Mon, 13 Sep 2010 - 14:02 · उत्तर
>एव्हढी पुस्तके वाचूनही तु अजुन शिरवळकर काहीच वाचले नाही.
मी खूप काही पुस्तके वाचली आहेत अशातला काही भाग नाहीये आणि रागवू नकोस पण सुशि म्हणजे कॉलेजवयीन पोरांना आवडेलशा बेताने तडकीलं-भडकीलं वाचायला देणारे लेखक अशी वदंता किमान आमच्याकडे तरी मी ऐकून होते त्यामुळे नाही वाचलेले त्यांचे काही. आता वाचून तर पाहूया कसे वाटतेय ते म्हणून त्यांचे दुनियादारी घेतलेय वाचायला. निव्वळ मनोरंजनापलिकडे काही मिळाले तर मला ते हवे असते.. बघुया कसे काय वाटते दुनियादारी ते.
सागर
सागर · Mon, 13 Sep 2010 - 14:09 · उत्तर
चांगला वाईट कसाही. निव्वळ मनोरंजनापलिकडे नक्कीच मिळेल
वल्ली
वल्ली · Mon, 13 Sep 2010 - 14:49 · उत्तर
सुशि म्हणजे तर हमखास मनोरंजन तर आहेच. पण त्याशिवाय त्यांनी गंभीर विषयांवरही कादंबर्या लिहिलेल्या आहेतच. देवकी हा सरोगेट मदर वर आधारीत चित्रपट त्यांच्या ह्याच नावाच्या कादंबरीवर आधारलेला आहे. पटकथाही त्यांचीच, हृदयस्पर्श सारखी गंभीर कादंबरीही त्यांचीच.
दुनियादारी, बरसात चांदण्यांची ह्या कादंबर्यांत तसेच कथापौर्णिमा, इथून तिथून, जाता येता या कथासंग्रहात मनुष्यस्वभावाच्या सूक्ष्मनिरीक्षणातून आलेली विनोदबुद्धी दिसेल. शेडस, धुकं..धुकं, प्राक्तन हे वाचून हा लेखक भयकथाही तेव्ह्ड्याच ताकदीने लिहू शकतो हेही दिसेल. शिवाय अमर कथा वाचून कोर्टबाजीचा अनोखा पैलूच ध्यानी येइल. तर मंदार, बुलंद आणि फिरोज कथा एखाद्या वेगवान अॅक्शनपटाची अनूभूती देतील.
तर मुद्दा हा की सुशि जरूर वाच. अर्थात दुनियादारी वाचून संपवल्यावर तु सुशिप्रेमी होणार हे निश्चित. :)
वल्ली
वल्ली · Mon, 13 Sep 2010 - 11:27
गुणगुण किंवा प्राक्तन असू शकते. प्राक्तन मध्ये परदेशी पात्रे आहेतच. पण का कोण जाणे वेचा प्राक्तन मधील नसावा असे वाटतेय. त्यामुळे बहुधा गुणगुणच.
सागर
सागर · Mon, 13 Sep 2010 - 12:06 · उत्तर
वल्ली अभिनंदन
उत्तर बरोबर आहे.
वल्ली
वल्ली · Mon, 13 Sep 2010 - 13:18 · उत्तर
अर्थात लेखक सुहास शिरवळकर हा संकेत एव्हढा ठळक आहे की कुठल्याही सुशिप्रेमी वाचकाला वेचा ओळखायला अवघड जाउ नये. पण वेचा मात्र मंदार, अमर, फिरोज किंवा बुलंद कथांपैकी असता तर मात्र ती कादंबरी ओळखणे थोडेसे अवघडच गेले असते याचे कारण या पात्रांभोवती फिरणार्या असंख्य कादंबर्या. :)
सागर
सागर · Mon, 13 Sep 2010 - 13:53 · उत्तर
सिरियल कादंबर्यांतील वेचा ओळखता आला नसता. सुशि वाचणार्या वाचकाला इतर विषयांवरच्या कादंबर्या नक्की क्लिक होतात. अर्थात स्टोरी पण आठवायला हवी. तरच. नाहीतर गोंधळात गोंधळ :)