- Log in to post comments
वेचा अगदीच सोपा आहे, ज्याने पुस्तक वाचलंय तो हे नक्की ओळखणार. मी वेचा मुद्दाम असा निवडला आहे की तो मुख्य गोष्ट सांगत नाही, पण दुसरा कळीचा आणि अतिमहत्वाचा मुद्दा सांगून जातो. तीन संकेत वेच्यातच आहेत. गरज पडल्यास आणखी फक्त एकाच संकेताची गरज पडेल. लेखक-लेखनप्रकार-नायक(हा नायक/नायिका या अर्थाने घेतला आहे) यातले काहीही एक सांगितले तरी तेवढं पुस्तक ओळखायला पुरेसं आहे. हे तसं या लेखकाच्या अनेक पुस्तकांपैकी त्यातल्या त्यात कमी गाजलेलं पुस्तक आहे.
संकेतः एका महान भारतीय प्रभूतींवर लिहिलेले चरित्रात्मक पुस्तक आहे. चरित्मातक यासाठी, की लेखकाने त्यांच्याबाबत बरेच संशोधन केले असले तरी, पुस्तकात काही नाट्यमय प्रसंगही असल्याचे लेखकाने प्रस्तावनेतच लिहिलेय. ही प्रभूती त्यांच्या क्षेत्रात सर्वश्रेष्ठ मानली जाते.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
“बाकाबाई, काय चाललंय?”
“पोरींचे गजरे करून ठेवले” म्हणत बाकाबाईनं पानाचा डबा रघू गुरवासमोर सरकवला. तो डबा उघडत असताना बाकाबाईनं विचारलं,
“सकाळीच बरं सवड झाली?”
“सकाळ केव्हाच सरली, आज शनवार ना! दुकान बंद, सकाळी केस कापून घेतले, स्नान केलं, म्हटलं तुम्हाला भेटून जावं”
“आणि हातातून काय आणलंस?” रघूच्या हातातल्या दोन सुरळ्यांकडे पाहात बाकाबाईनं विचारलं.
“काही नाही. पण बाकाबाई, तुमच्या पोरींनी नाव काढलं हो!”
“नांव?”
“तर काय? आज सुगंधा, कमला घरोघर पोचल्या”
बाकाबाईनं विचारलं, “काय बोलतोस रघू??”
“मी कशाला बोलू? हे बघ ना!” आणि एवढं बोलून त्यानं हातातल्या दोन्ही सुरळ्या बाकाबाईसमोर ठेवल्या. बाकाबाईनं गडबडीनं आपल्या अंगठ्याचा दोरा सोडला. तो समोरच्या तबकात टाकून तिनं कागदाच्या सुरळ्या उचलल्या. त्या उलगडून ती चित्रं पाहात होती. पहिलं चित्र शंतनु-मत्स्यगंधेचं होतं. आणि दुसरं चित्र उर्वशी-पुरूरव्याचं.
अभिप्राय
रोचीन
रोचीन · Sat, 25 Sep 2010 - 13:05
व्य. नि. पाठवला आहे!!
मस्त कलंदर
मस्त कलंदर · Sat, 25 Sep 2010 - 13:13 · उत्तर
वेचा अगदीच फुलटॉस होता. पहिल्याच प्रयत्नात आणि प्रतिसादात उत्तर ओळखले गेलेय. अभिनंदन गं रोचिन. (माझ्यामते तू मुलगी आहेस म्हणून गं. नाहीतर रे!!!)
श्रावण मोडक
श्रावण मोडक · Sat, 25 Sep 2010 - 15:48
पास. पुस्तक वाचलेले नाही.
पण पुस्तक ओळखले. कसे ते नंतर मस्त कलंदर सांगेलच. :)
सागर
सागर · Sat, 25 Sep 2010 - 18:33
वाचलेले नाही त्यामुळे पास
ऋषिकेश
ऋषिकेश · Sun, 26 Sep 2010 - 05:16
पास..
छॅ हे नेहमी पास देण्यापेक्षा स्वतःच कोडे घालणे बरे असते ;)
वल्ली
वल्ली · Mon, 27 Sep 2010 - 05:23
त्यामुळे माझाही पास. एखादा संकेत आला तर त्या दिशेने प्रयत्न करता येतीलच.
रोचीन
रोचीन · Tue, 28 Sep 2010 - 08:33 · उत्तर
वेच्यातच आहेत.
मस्त कलंदर
मस्त कलंदर · Tue, 28 Sep 2010 - 09:47
ते पुस्तक राजा रविवर्मा आहे..
विजेते: रोचीन आणि दिगम्भा. बिपिन कार्यकर्ते यांनीही हे पुस्तक ओळखले.
संकेत असे होते: १. बाकाबाई गजरे बनवते आणि पानाचे विडे. यातून तिचे भावीण अथवा तत्सम असणं दिसतं.
२. सुगंधा. रविवर्म्याच्या बर्याचशा चित्रांची नायिका तीच होती
३. रविवर्म्याची प्रसिद्ध चित्रे: शंतनु-मत्स्यगंधा आणि उर्वशी-पुरूरवा. याच चित्रांसाठी देवादिकांना अर्धवस्त्रात दाखवले म्हणून रविवर्मांच्यावर खटला देखिल भरण्यात आला होता.
हे पुस्तक हिंदीत अनुवादित झाले आहे. पण ते शोधण्याचे श्रेय मोडकांचे. इथे पहा अगदी हाच वेचा तस्साच्या तस्सा फक्त अनुवादित स्वरूपात आहे.
थोडेसे पुस्तकाविषयी:
पुस्तक टिपिकल रणजित देसाई आहे. म्हणजे तेच ते शब्दालंकार, तीच ती उत्कट वर्णने. म्हणजे काही ठिकाणी रविवर्मा काढून माधवराव घातले तर स्वामीतला हळूवार प्रसंग म्हणून खपून जाईल असेही वाटले. त्यांनी या पुस्तकासाठी बरेच संशेधन केलेय म्हणे. खरे असेलही. पण ते स्वतःच प्रस्तावनेत सांगतात की थोडीशी त्यांनी लिबर्टी घेतलीय म्हणून. या पुस्तकाच्या प्रस्तावनेत एका ओळीत कर्तव्य म्हणून केल्यासारखा माधवी देसाईंचा उल्लेख वाचला, अर्पणपत्रिका "माझ्या मुलींना" अशी पाहिली.. आणि मग प्रत्येक ठिकाणी पुस्तक वाचताना नाच गं घुमा आठवत गेली.... असे करू नये, पण झाले खरे.
ठीक ठीक आणि एकदा वाचण्यासाठी- राजा रविवर्मा म्हणजे काय चीज होती हे जाणून घेण्यासाठी पुस्तक ठीक आहे. तेही उसने मिळाले तर बरे. नाहीतर विकत घेऊन वाचण्यासारखे निदान मला तरी वाटले नाही.
हा असा परिचय मुद्दाम अगदी थोडक्यात देतेय. जर कधी मनात आले आणि टंकाळा साथ सोडून गेला तर पुस्तकविश्वावर आणखी एका लेखाची भर पडण्याची शक्यता उगीच कशाला कमी करा???
वल्ली
वल्ली · Tue, 28 Sep 2010 - 11:05
हे लक्षातच आले नाही. एकतर पुस्तक वाचलेलेच नव्हते त्यात राजा रविवर्मा हा एक थोर चित्रकार होता व त्यांचा मळवली येथे शिळाप्रेस (लिथो स्टुडीओ) होता इतके सोडून इतर काहीही माहीत नव्हते.
मस्त कलंदर
मस्त कलंदर · Tue, 28 Sep 2010 - 12:40 · उत्तर
माझेही असेच झाले. त्यांच्या स्टुडिओबद्दलही माहिती नव्हती. इकडे तिकडे उचकपाचक करताना लोकसत्तातल्या एका लेखाची लिंक मिळाली. त्यात सुगंधा नक्की कोण होती, यावर शोध-निबंधाच्या पुस्तकाची माहिती होती. योगायोगाने त्याच आठवड्यात बिकांच्या घरी पुस्तक दिसले. :)