ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे ते.. - ३९

श्रावण मोडक

मजकूर

प्रचंड खपलेले, तसाच अनुवाद झालेले पुस्तक आहे.
आवश्यकतेनुसार संकेत देईन. तसे काही संकेत उतार्‍यातच आहेत.
वेच्यातील एक शब्द ठळक केला आहे. तो एक संकेतच आहे.
---
हे पुस्तक लिहिण्यातील हेतू - इतर पुस्तकांच्या प्रमाणेच - सर्वस्वी धार्मिक होता, आणि माझ्या दरेक कृत्यामध्ये आजही तोच हेतू असतो. त्यामुळे त्यातील काही विचारांचा मी सध्या अमल करू शकत नाही, याचा मला खेद वाटतो, शरम वाटते.
मला असा दृढ विश्वास वाटतो, की मनुष्य बालपणी आईचे दूध पितो, त्याव्यतिरिक्त इतर दुधाची त्याला आवश्यकता नाही. मनुष्याचा आहार सुकी व ताजी पक्व फळे हाच होय. बदामासारख्या बीजांपासून आणि द्राक्षासारख्या फळांमधून त्याच्या शरिराला व बुद्धीला भरपूर पोषण मिळू शकते. अशा तर्‍हेच्या आहारावर जो कोणी राहील त्याला ब्रह्मचर्यादि आत्मसंयमन फारच सोपे जाते. 'आहार तशी ढेकर', 'मनुष्य खातो तसा बनतो' या म्हणामध्ये पुष्कळ तथ्य आहे, असा माझा आणि माझ्या सोबत्यांचा अनुभव आहे.
याच विचारांचे विस्तृत समर्थन आरोग्यासंबंधीच्या सदर पुस्तकामध्ये केलेले आहे.
परंतु हिंदुस्थानात माझा प्रयोग संपूर्णतेला नेण्याचे माझ्या नशिबी नव्हते. खेडा जिल्ह्यात सैनिकभरतीचे काम करीत असता स्वतःच्याच चुकीमुळे मी मृत्यूशय्येवर पडलो. दुधावाचून जगण्याची मी खूप धडपड केली. ओळखीच्या सर्व वैद्य, डॉक्टर, रसायनशास्त्री यांची मदत मागितली. कोणी मुगाचे पाणी, कोणी मोहाचे तेल, कोणी बदामाचे दूध वगैरे सुचविली. या सर्व वस्तूंच्या प्रयोगांखाली मी शरिराच्या कष्टांची काही बाकी ठेविली नाही; तरीसुद्धा धरलेले अंथरूण सुटेना.

अभिप्राय

श्रावण मोडक

श्रावण मोडक · Mon, 4 Oct 2010 - 13:50

विक्रमी वेळेत दिगम्भांनी पुस्तक ओळखले आहे.
अर्थात, बाकीच्यांसाठी हा धागा खुला ठेवलेला आहे. संकेतही दिले जातील.

सागर

सागर · Mon, 4 Oct 2010 - 16:26

श्रामो,
छोटासाच असला तरी वेचा वाचनीय आहे त्यामुळे मला उत्सुकता आहे
मी पुस्तक वाचलेले नाहिये त्यामुळे माझा यावेळी पास. पण या धाग्यावर उत्तर कळेपर्यंत लक्ष ठेवून आहे :)

श्रावण मोडक

श्रावण मोडक · Mon, 4 Oct 2010 - 16:43 · उत्तर

वेचा वाचनीय आहेच. पण पुस्तकही वाचा नंतर. :) कारण तेही तसेच आहे.

सागर

सागर · Mon, 4 Oct 2010 - 16:48 · उत्तर

हो श्रामो नक्कीच वाचेन मी हे पुस्तक.
नाव तर आधी कळू दे ;)

सर्वसाधारणपणे तू येथे दिलेली पुस्तके (लेख व वेचा दोन्ही) मी वाचलेले नसल्यास वाचायचे आहे या यादीत टाकतोच आहे. चांगली चांगली पुस्तके माहिती होत आहेत या निमित्ताने एवढे नक्की :)

ऋषिकेश

ऋषिकेश · Mon, 4 Oct 2010 - 19:49

पास. धार्मिक व्यक्ती किंवा योग किंवा आयुर्वेद किंवा आध्यात्मिक अनुभव वगैरेंवरील पुस्तक आहे का? असल्यास जराही माहित असणे कठीण आहे.

दिगम्भा

दिगम्भा · Tue, 5 Oct 2010 - 08:28

मला वाटते मूळ पुस्तक अन्य भाषेतील आहे व हा वेचा त्याच्या मराठी अनुवादातून घेतलेला आहे, बरोबर आहे का श्रामो?
(हा आपला उगीच कोडे आणखी किचकट करण्याचा प्रयत्न!)

- दिगम्भा

श्रावण मोडक

श्रावण मोडक · Tue, 5 Oct 2010 - 09:15 · उत्तर

खरं आहे. हा अनुवाद आहे.
ऋ, पुस्तक धर्माविषयीचे आहेही आणि नाहीही. माझा अंदाज हुकला. तू हे पुस्तक वाचले असावेस असे वाटले होते. कदाचित वाचले असशीलही, ओळखता येत नसावे.

ऋषिकेश

ऋषिकेश · Tue, 5 Oct 2010 - 11:15 · उत्तर

संकेत वाचायच्या आधी उत्तर दिले आहे. आता संकेत वाचल्यावर ते बरोबर आहे याची खात्री आहे.
बाकी दुधाची गरज नाही म्हणल्याने मी आधी संभ्रमात होतो.

दिगम्भा

दिगम्भा · Tue, 5 Oct 2010 - 09:38

(अगदी खरे सांगायचे तर मीही कुठे संपूर्ण वाचले आहे?)

सागर

सागर · Tue, 5 Oct 2010 - 12:26

हात्तिच्या.. हे पुस्तक आहे होय
ओळखले मी आणि वाचले पण आहे. पण या महान(?) व्यक्तीमत्त्वाच्या या पुस्तकातील मी फक्त देशाच्या दृष्टीने महत्त्वाचा भाग तेवढा लक्षात ठेवला आहे. त्यांच्या वैयक्तीक प्रयोगांशी माझा ३६ चा आकडा आहे ;)

मस्त कलंदर

मस्त कलंदर · Tue, 5 Oct 2010 - 12:31

पुस्तक नक्कीच वाचले नाहीय. पण काल वेचा वाचता-वाचताच काही संदर्भ लागत होते. तरी खात्री नसल्याने मनोमन पास दिला होता... पण आताच्या संकेतानंतर ओळखलेय असे वाटते आहे..
चला, श्रामोंकडून उधार घेण्याच्या पुस्तकांच्या यादीत आणखी एक भर पडली!!!

सागर

सागर · Tue, 5 Oct 2010 - 12:33 · उत्तर

अहो मस्त कलंदर

उधार कशाला घेता फक्त ३० रुपये किंमत आहे या पुस्तकाची. एवढे मोठे पुस्तक आणि खूप सवलतीत मिळणारे हे कदाचित एकमेव पुस्तक असावे :D

श्रावण मोडक

श्रावण मोडक · Tue, 5 Oct 2010 - 13:30

सागर, रोचीन, ऋषिकेश, मस्त कलंदर आणि बहुदा अदिती यांनी ओळखले. प्रयोग हा शब्द अगदीच पुरेसा ठरला. अदितीने प्रत्यक्ष कळवलेले नाही, पण तिची खरड पाहता तिने ते ओळखले असावे.
पण सर्वांचे ओळखणे म्हणजे अंदाजच. प्रत्येक जण प्रश्न विचारतोय, सत्याचे प्रयोग हे पुस्तक आहे का? अरे ठामपणे सांगा की... ;)

सागर

सागर · Tue, 5 Oct 2010 - 13:35 · उत्तर

मी आहे का म्हणून विचारले नाही ;)
सांगितले होते सत्याचे प्रयोग हा हा हा :)

पण श्रामो मान गये यार... काय जबरदस्त वेचा दिला होता.
आधी मला वाटले होते. पण म्हटले एवढा सोपा वेचा नाही देणार तू म्हणून पास केले.
नंतर लक्षात आले ते प्रयोग हा शब्द ठळक केल्यावरच.

श्रावण मोडक

श्रावण मोडक · Tue, 5 Oct 2010 - 14:53 · उत्तर

हो. सागरने ओळखले. गेस्टिक्यूलेशन नव्हते.

अदिती

अदिती · Tue, 5 Oct 2010 - 14:24

बहुदा अदिती? म्हणजे माझे दुसर्‍यांदा बारसे केलेत की काय? ;)
ह. घ्या.

श्रावण मोडक

श्रावण मोडक · Tue, 5 Oct 2010 - 14:49 · उत्तर

हाहाहाहा... दोन स्वल्पविराम टाकले असते, पण सहसा मराठीत तसं टाकलेले दिसत नसल्याने टाळले. एक स्वल्पविराम 'आणि' या शब्दानंतर आणि दुसरा 'बहुदा' या शब्दानंतर. मग ती रचना नीट झाली असती. :)

निखिल देशपांडे

निखिल देशपांडे · Tue, 5 Oct 2010 - 14:30

प्रयोग शब्द हायलाईट केल्या नंतर पुस्तक लक्षात आले होते.

सागर

सागर · Tue, 5 Oct 2010 - 14:55 · उत्तर

तू नुसता बघून मजा मारतोस निखिल.
कधीतरी मैदानात उडी घेत जा? ;)

निखिल देशपांडे

निखिल देशपांडे · Tue, 5 Oct 2010 - 15:20 · उत्तर

सागरं अरे एक दोन वेच्यांपुर्वीच तर लिहिले होते की कन्फर्म उत्तर येत असेल तेव्हाच देणार.
म्हणुन आपलं मी शांत असतो

सागर

सागर · Tue, 5 Oct 2010 - 16:08 · उत्तर

अरे निखिल पण खडे मारावे लागतात कधी कधी.. :)
प्रयत्ने वाळूचे कण रगडिता या उक्तीप्रमाणे कधीतरी शॉट बरोबर लागतो
एखादे पुस्तक खूप वर्षांपूर्वी वाचलेले असते अंधुकसे आठवत असते.
सांगू की नको?...सांगू की नको? अशी जीवाची घालमेल होत असते.
तेव्हा सांगून टाकावे. म्हणजे मनात किंतु रहात नाही जेव्हा उत्तर समजते तेव्हा.
नंतर खूप हळहळ वाटते रे त्या गोष्टीची म्हणून म्हटले तुला.

ऋषिकेश

ऋषिकेश · Tue, 5 Oct 2010 - 15:01

आधी वाटलं होतं पण गांधीजी शेळीचं दुध काढायला जायचे. आणि इथे दुध गरजेचं नाही म्हटल्यावर मी गोंधळलो. पण श्रामो म्हणाले की मी ओळखेन असं त्यांना वाटृलं होतां म्हटल्यावर परत उचल खाल्ली. मात्र मी ओळखले होते ते "खेडा" वरून. आधी खेडा कोणत्या राज्यात अहे ते आठवेना. गुगलल्यावर समजले. आणि मग पुस्तक नक्की झाले

श्रावण मोडक

श्रावण मोडक · Tue, 5 Oct 2010 - 15:12 · उत्तर

माझ्यासमोर पेच होता. वेच्यातूनच शब्द ठळक करून संकेत द्यायचे म्हटल्यावर मी आधी खेडा हाच शब्द ठळक केला होता. पण वाटलं की, तो इतका सामान्य स्वरूपाचा आहे की कळणार नाही. म्हणून प्रयोग हा शब्द केला. तिथं एकदम कोडं खुलं झालं.
आता नवा वेचा दिला आहे, या तिथं.

चर्चा प्रकार