- Log in to post comments
"बहिरं किंवा आंधळं असणं ही किती भयंकर गोष्ट असली पाहिजे." केट केलर म्हणाली.
"असंच काही नाही बरं का!" डॉ. बेल झटकन् म्हणाले. "माझी पत्नी वयाच्या चौथ्या वर्षापासूनच बहिरी आहे. त्या वेळी तिला 'जांभळा ताप' आला अन् त्यामुळे ती आपली श्रवणशक्ती गमावून बसली. पण आम्ही अत्यंत सुखी आहोत."
अशी गोष्ट आपण बेजबाबदारपणे बोलून गेलो याचा संकोच वाटून केट केलरने आपली जीभ तत्क्षणी चावली. पण डॉ. बेलच्या मनावर त्याचा काहीच परिणाम झालेला दिसला नाही. ते शांतपणे पुढे बोलू लागले.
"आपण फक्त एकाच गोष्टीपासून सावध राहायला हवं मिसेस केलर, आणि ती गोष्ट म्हणजे अज्ञान. पूर्वीच्या काळी बहिर्या व आंधळ्या लोकांची कायद्यानंच वेड्या लोकांत गणना केली होती. कारण कोणालाही त्यांचं मनोगत नीट समजावूनच घेता येत नसे. अशा तर्हेच्या अपंग लोकांना सर्वात अधिक आवश्यकता जर कशाची असेल तर ती तज्ज्ञ आणि सहृदय अशा शिक्षकांकडून दिल्या जाणार्या शिक्षणाची, हे आता हळूहळू आम्हाला समजायला लागलं आहे. तुम्हाला हे माहितच असेल की बीथोव्हनची श्रवणशक्ती नष्ट झाली होती, पण त्यानं स्वररचना करण्याचं आपलं काम सोडलं नाही. प्रसिद्ध ग्रीक कवी होमर हा आंधळा होता. जॉन मिल्टननं आपलं सर्वश्रेष्ठ काव्य दृष्टी गेल्यानंतरच लिहिलं, आणि थॉमस एडीसन, ज्यानं विजेच्या दिव्याला कार्यक्षम स्वरूप दिलं आणि जो आता विद्युत्शक्तीनिर्माणकेंद्र तयार करीत आहे, तो अगदी ठार बहिरा आहे. एडिसन आणि त्याची पत्नी जेव्हा नाटकाला जातात तेव्हा त्याची पत्नी नाटकातले सारे संवाद 'मॉर्स कोड'च्या साह्याने त्याच्या गुडघ्यावर टकटक करून त्याला समजावून सांगते. खरोखरी यशस्वी रीतीने जीवन जगण्यासाठी आपली सारीच ज्ञानेंद्रिये कार्यक्षम असावी लागतात असं मुळीच नाही."
अभिप्राय
यशोधरा
यशोधरा · Sat, 12 Jun 2010 - 14:07
वेदश्री, तुला मित्रत्वाच्या नात्याने एक सूचना करते, रागावू नकोस. तू हे उतारे देते आहेस, खूप चांगला उपक्रम आहे, पण बर्याच पुस्तकांवर छापलेलं असतं की पूर्वपरवानगीशिवाय पुस्तकातला भाग वापरु नये वा कुठेही पुन्हा छापू नये वगैरे... त्याचा विचार केला आहेस का? की तू रीतसर परवानगी घेऊन हे उतारे टाकतेस?
श्रावण मोडक
श्रावण मोडक · Tue, 22 Jun 2010 - 20:45
अरेच्चा! हे वाचलेच नव्हते.
पूर्वपरवानगीशिवाय पुस्तकातील मजकूर उद्धृत करू नये, अशी अट पुस्तकांवरच टाकलेली असते हे खरे आहे. पण ते इथे लागू करणे याला तर्कदुष्टता म्हणावे लागेल. असे नका करू. पुस्तकातील मजकूर उद्धृत केल्याने येथे जे साध्य होते त्याला केवळ पुस्तकाविषयीची चर्चाक्षमता वाढणे असे म्हणता येते. त्यामुळे येथे ही अट लागू होत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे निदान आजच्या घडीला कोणताही आर्थीक लाभाचा हेतू या लेखनात, या संस्थळाच्या संचालनात नाही. त्यामुळेही ती अट येथे लागू होत नाही. या अटी प्रामुख्याने आर्थिक लाभाच्या व्यवहाराविषयी असतात.
पुस्तकांवरील ही अट अशीच तर्कदुष्टपणे वाढवली तर पुस्तकाचा परिचयही देता येणार नाही, परीक्षण तर करताच येणार नाही आणि ही बाब फक्त त्याच पुस्तकाला लागू होईल असेही नाही, तर त्या पुस्तकाशी साधर्म्यासाठी इतर पुस्तकांवर जे लेखन होईल त्यालाही लागू होईल. मग पुस्तकांविषयीची चर्चा करायची असेल तर त्या पुस्तकाचे शीर्षक, लेखकाचे नाव, पानांची संख्या, किंमत, प्रकाशक आणि त्याच्या विषयाविषयी आपली वाक्यं इतकंच लिहिता येईल (अर्थात, तसंही परिचय किंवा परिक्षण केलं जातं आजकाल अनेकांकडून हा भाग वेगळा).
हा उपक्रम पुढे चालू ठेवावा.
आनंदयात्री
आनंदयात्री · Wed, 23 Jun 2010 - 03:42 · उत्तर
सहमत आहे.
अदिती
अदिती · Wed, 23 Jun 2010 - 05:06 · उत्तर
मीही या म्हणण्याला सहमत आहे. हा उपक्रम सुरू ठेवावा.
--अदिती
ऋषिकेश
ऋषिकेश · Wed, 23 Jun 2010 - 06:23 · उत्तर
माझ्यामते, प्रत्येक पुस्तकातील परिच्छेद कोणत्या कारणाने प्रकाशित केला आहे यावरही हे अवलंबून असावे. इथे पुस्तकातील छोटासा वेचा, कोणत्याही आर्थिक मिळकतीसाठी, व्यावसायिक प्रकाशन म्हणून प्रकाशित केलेला नाहि. प्रताधिकार कायदा माहित नसला तरी हे चालावे असे वाटते.
याशिवय खात्री करून घेण्यासाठी मिपावरील धनंजय / नितीन थत्ते यांनाही विचारता येईल.. शिवाय मागे उपक्रमावर लोकमित्रच्या निमित्ताने याच प्रकारची चर्चा झाल्याचे स्मरते, बघतो शोधून
वेदश्री
वेदश्री · Wed, 23 Jun 2010 - 15:56 · उत्तर
क्या बात है! या झक्कास आनंददायी प्रतिसादासाठी एक पाणीपुरीची पार्टी उधार राहिली रे माझ्याकडे! मला हा उपक्रम परत सुरू करायला अत्यंत आनंद होतोय.. :)
यशोधरा
यशोधरा · गुरुवार, 24 Jun 2010 - 06:32 · उत्तर
केवळ रेकॉर्डसाठी आणि कोणाचाही आणि मुख्य म्हणजे वेदश्रीचा गैरसमज होऊ नये म्हणून सांगत आहे की, मी वेदश्रीला उतारे टाकू नकोस, वा तिचा कोणताही उपक्रम बंद करावा असे सांगितले वा सुचवलेले नाही. तेह्वा माझ्यावर हा आरोप कोणीही करु नये.
माझ्या मनातली शंका मी तिला बोलून दाखवली, त्यावर उतारे न टाकण्याचा निर्णय केवळ तिचाच होता. मी तिच्यावर कोणत्याही प्रकारे दबाव आणलेला नाही आणि नव्हता, त्यामुळे माझ्या एका प्रश्नवजा खरडीमुळे उतारे टाकण्याचा उपक्रम बंद होतोय, हे म्हणणे मला तरी अवास्तव वाटते.
मी तिला केवळ प्रश्न विचारले होते, कारण ह्या बाबत माझ्या मनात संदिग्धता होती. त्याचा विपर्यास करण्याची काहीही गरज नाही. धन्यवाद.
मग पुस्तकांविषयीची चर्चा करायची असेल तर त्या पुस्तकाचे शीर्षक, लेखकाचे नाव, पानांची संख्या, किंमत, प्रकाशक आणि त्याच्या विषयाविषयी आपली वाक्यं इतकंच लिहिता येईल (अर्थात, तसंही परिचय किंवा परिक्षण केलं जातं आजकाल अनेकांकडून हा भाग वेगळा).
आजवर पुस्तक परिचय देताना मी पुस्तक कोणतय विषयावर आहे त्याबद्दल माझ्या शब्दांत, माझी मतं आणि परिचयाचय शेवटी पुस्तकाचे शीर्षक, लेखकाचे नाव, पानांची संख्या, किंमत, प्रकाशक हे डीटेल्स दिलेले आहेत. ह्या मूल्यमापनाबद्दल धन्यवाद.
वेदश्री
वेदश्री · गुरुवार, 24 Jun 2010 - 07:00 · उत्तर
मी कधी म्हणालेच नाही की यशोधराने मला हा उपक्रम बंद कर असे सुचवले म्हणून. तो माझाच निर्णय होता. मला पुस्तकपरीचय वगैरे लिहिता येत नाही पण पुस्तकातल्या चांगल्या गोष्टी तर आवर्जून सांगाव्याशा वाटतात, म्हणून मी हा कोड्यांचा खेळ सुरू करायचे ठरवले होते. मनात आले की करून मोकळे व्हायचे या माझ्या स्वभावानुसार मी कोडी विचारायला सुरूवात केली पण कॉपीराईट वगैरेचा काही अडसर असू शकतो यावर विचार मात्र काहीच केला नव्हता. यशोधराने प्रतिसाद दिला तेव्हा अचानक प्रत्येक पुस्तकातल्या त्या कॉपीराईटच्या मसुद्याची आठवण आली आणि चुकल्यासारखे वाटले. यशोधराचा सल्ला पटल्याचे आणि त्याबद्दल अजिबात वाईट न वाटल्याचेही मी तिला व्यक्तिगत खरडीत लिहिले होते. मुळात म्हणजे मला कसलीही पायरसी किंवा नियमांचे उल्लंघन करायचे नव्हते ही कोडी विचारून त्यामुळे अनवधानाने तसे झाल्याचे मलाही पटताच (कॉपीराईटचा माझा काही अभ्यास नाही. पुस्तकावर लिहिलेले असते त्यातून जितका मतितार्थ काढायची बुद्धी होती तेवढ्यानुसार पटले.) माझ्या स्वभावानुसार मी लगेच कार्यवाही केली. आता श्रावण म्हणाला की काही गैर नाही अशा खेळात, तू उपक्रम चालू ठेव.. त्याने दिलेले मुद्देही पटणेबल वाटले म्हणून परत सुरू केला! हा खेळ पुविवर चालू करणे असो, बंद करणे असो वा परत चालू करणे असो.. निर्णय सर्वस्वी माझा होता. कोणाचाही कसलाही गैरसमज नको.
श्रावण मोडक
श्रावण मोडक · गुरुवार, 24 Jun 2010 - 11:29 · उत्तर
यशोधरा,
या विषयावरील मूळ प्रतिसाद माझा असल्याने, टू स्ट्रेटन द रेकॉर्ड -
मी असे म्हटलेले नाही. त्यामुळे मी असा आरोप करण्याचा प्रश्न नाही. मी अत्यंत जनरल स्वरूपात लेखन केले आहे. त्यावर अर्थाची पेरणी काहीही करता येते. पण संदर्भचौकट ध्यानी घेता तसं होऊ नये.
अवास्तव शब्दापुरता खुलासा - वेदश्रीने तो तिचा निर्णय होता हे स्पष्ट केले आहे. माझ्यापुरता हा विषय संपतो.
मी कसलाही विपर्यास केलेला नाही. अधिक स्पष्टपणे तो दाखवल्यास मी दुरूस्त करेन.
तुमच्या कोणत्याही लेखनाचे मूल्यमापन करण्याची माझी पात्रता नाही. मी ते केलेले नाही. माझे संबंधित विधान अत्यंत जनरल होते आणि त्याला पुरेशी कारणे आहेत, जी तुमच्या लेखनाशी संबंधित आहेत असे मानण्याचे कारण नाही.
ऋषिकेश
ऋषिकेश · गुरुवार, 24 Jun 2010 - 06:45 · उत्तर
जरा खात्री करण्यासाठी प्रताधिकार कार्यालयाची वेबसाईट बघितली. त्यातील हँडबुकमधे पुढील वेचा मिळाला. ठळक गोष्टी पुस्तकविश्वासाठी महत्त्वाच्या ठराव्यात.
Does the law allow any use of a work without permission of the owner of the copyright, and, if so, which are they?
Subject to certain conditions, a fair deal for research, study, criticism, review and news reporting, as well as use of works in library and schools and in the legislatures, is permitted without specific permission of the copyright owners. In order to protect the interests of users, some exemptions have been prescribed in respect of specific uses of works enjoying copyright. Some of the exemptions are the uses of the work
1. for the purpose of research or private study,
2. for criticism or review,
3. for reporting current events,
4. in connection with judicial proceeding,
5. performance by an amateur club or society if the performance is given to a non-paying audience, and
6. he making of sound recordings of literary, dramatic or musical works under certain conditions.
बाकी यशोधरा,
अर्थातच तुमचा उद्देश चांगला होता. त्यानिमित्ताने हा महत्त्वाचा पैलू निकालात लागत असेल तर तुमचे हा पैलु प्रकाशात आणल्याबद्दल उलट आभार मानले पाहिजेत. धन्यवाद!
वेदश्री
वेदश्री · गुरुवार, 24 Jun 2010 - 07:03 · उत्तर
अग्गदी हेच!
ऋ,
जरूर ती माहिती शोधून काढून इथे दिल्याबद्दल मनापासून आभार. :)
यशोधरा
यशोधरा · गुरुवार, 24 Jun 2010 - 10:08 · उत्तर
धन्यवाद ऋ. ही महत्वाची माहिती आहे. इथे दिल्याबद्दल आणि वेब लिंक दिल्याबद्दल धन्यवाद. पुढेही उपयोगासाठी येईल.
वेदश्री
वेदश्री · Wed, 23 Jun 2010 - 17:36
उत्तर सांगितले आहे.