ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे ते... - ४१

निखिल देशपांडे

मजकूर

मेघनाला श्रामोंनी दिलेला खो आहेच. पण न राहवून मी मध्येच घुसून हा वेचा देत आहे. पुस्तक ओळखण्यासाठी संकेतांची गरज आहेच आहे. पुस्तक किमान दोनजणांनी ओळखले जाईपर्यंत रोज एक संकेत दिला जाईल.
संकेत १: पुस्तक अनुवादित आहे

***************************************************************************************
जगभरात आत्मघातकी दहशतवाद वाढत चालला आहे; पण त्यामागील कारण नेमकं काय असावं याविषयी संभ्रम आहे. ११ सप्टेंबर २००१ सह असे बहुतांश हल्ले मुस्लिम दहशतवाद्यांनी धार्मिक हेतूसाठी केले असल्याचे मानलं जातं. त्यामुळे आत्मघातकी दहशतवादाच्या केंद्रस्थानी मुस्लिम पुनरूज्जीवनवाद आहे, असे चित्र उभं राहाणं स्वाभाविक आहे. या गृहितकामुळे मुस्लिम समाजात आमूलाग्र परिवर्तन झालं तरच भविष्यातील ९/११ टाळलं जाऊ शकेल, अशी धारणा निर्माण झाली आहे. इराकवर अमेरिकेनं केलेल्या आक्रमणाला अमेरिकेत मोठा पाठिंबा मिळण्यामागं तेच एक कारण आहे.
तथापि, आत्मघातकी दहशतवाद आणि इस्लामी पुनरूज्जीवनवाद यांच्यातील हा गृहित संबंध दिशाभूल करणारा असून यातूनच अमेरिकेतील परिस्थिती आणखी चिघळेल आणि मुस्लिमांना अकारण हानी पोचेल अशा काही धोरणांना चालना मिळत असावी.

अभिप्राय

वल्ली

वल्ली · Sun, 10 Oct 2010 - 12:29

प्रस्तुत विषयावर बरीच पुस्तके असल्याने ओळखणे अवघड आहे. त्यामुळे संकेतांशिवाय गेस्टीक्युलेशन करण्याला काहीच अर्थ नाही.

सागर

सागर · Sun, 10 Oct 2010 - 16:08

वल्ली म्हणतात तसे वेचा बराचसा जनरिक असल्यामुळे पुस्तक ओळखायला कष्ट आहेच :)

वल्ली

वल्ली · Wed, 13 Oct 2010 - 06:29

वेच्या दिल्यानंतर वेच्याकडे फिरकतच नाहीयेस. संकेत तरी दे एखादा.

निखिल देशपांडे

निखिल देशपांडे · Wed, 13 Oct 2010 - 06:42 · उत्तर

आत्ता उत्तरच जाहीर करतोय.

सागर

सागर · Wed, 13 Oct 2010 - 08:02

आपल्या श्रामोचेच पुस्तक असेल असा कोणी स्वप्नात तरी विचार करु शकेल का रे निखिल...

हे पुस्तक वाचले नाहिये पण वाचायला नक्की आवडेल. श्रामो चे स्टिलबॉर्न आणि तिढा पण माझ्या लिस्ट वर आहे. वाचायचे आहे म्हणून अ‍ॅडवले आहे.

श्रामो ने या पुस्तकाबद्दल आणि स्टीलबॉर्न बद्दल माहिती दिली तर आनंद होईल. :)

श्रावण मोडक

श्रावण मोडक · Wed, 13 Oct 2010 - 08:37

मी या पुस्तकाचा लेखक नाही. अनुवादक आहे. मूळ लेखक आहेत रॉबर्ट पेप.

निखिल देशपांडे

निखिल देशपांडे · Wed, 13 Oct 2010 - 09:15 · उत्तर

आहो पण वर तेच तर लिहिले आहे ना???? ;)

श्रावण मोडक

श्रावण मोडक · Wed, 13 Oct 2010 - 18:00 · उत्तर

अहो संपादकबा, हे वागणं बरं नव्हं!!! ;)

ऋषिकेश

ऋषिकेश · Wed, 13 Oct 2010 - 10:11

अरेच्या! मला श्रामोंचे हे व सागर म्हणतोय ते दुसरे पुस्तक माहितच नवह्ते.. फक्त तिढा माहित होते (वाचले एकही नाही :( ) आता वाचलेच पाहिजे

अवांतर: यानिमित्ताने आपले एका लेखकाबरोबर जालावर का होईना जवळजवळ रोज संपर्क राहतो ही जाणीव फार सुखावणारी आहे :)

सागर

सागर · Wed, 13 Oct 2010 - 10:44 · उत्तर

ऋ ,

अगदी मनातले बोललास बघ.

>>>>>> यानिमित्ताने आपले एका लेखकाबरोबर जालावर का होईना जवळजवळ रोज संपर्क राहतो ही जाणीव फार सुखावणारी आहे

असेच म्हणतो :)

चर्चा प्रकार