- Log in to post comments
हे पुस्तक कोणी वाचले नसेल तर ओळखणे अवघडच आहे. तरी संकेत देतो. त्यापेक्षा अधिक संकेत देऊनही उपयोग होणार नाही. कारण पुस्तक वाचले नसेल तर उत्तर येणार नाही हे नक्की :)
सोमवारी संध्याकाळी उत्तर जाहीर करणार आहे
संकेत : पुविवर नीट बारकाईने पहा म्हणजे संकेत सापडेल. या लेखकाची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत तुलनेने हे पुस्तक दुर्लक्षिलेले असल्यामुळे चर्चेत नाहिये. पण या लेखकाची पुस्तके आवडणार्या वाचकांना हे पुस्तक माहिती असावे. कथेतील नायकाचे नाव शेखर आहे. पुस्तकविश्ववर ह्या लेखकाची पुस्तके न वाचणारे मला बरेच जण सापडले त्यामुळे उत्तर फक्त दर्दी वाचकांकडूनच अपेक्षित आहे :)
पुस्तकविश्वच्या मुख्य पानावर हे टॉप रेटेड पुस्तक म्हणून 'जाई' हे पुस्तक दिसते आहे. असे असूनही कोणाच्या लक्षात नाही आले याचे आश्चर्य ;)
फक्त दिगम्भांनी लेखक सुहास शिरवळकर असल्याचा तर्क विरोपाने कळवला होता. अर्थात सुशि वाचनात नसल्यामुळे पुस्तक माहिती नाही असेही प्रामाणिकपणे त्यांनी सांगितले होते
पुस्तकाचे नावः जाई
लेखक : सुहास शिरवळकर
वेचा:
========================
ललिता दिसायला नक्कीच सुंदर आहे. पण एकदम कोणी भारावून जावं असं वैशिष्ट्यपूर्ण तिच्यात काहीच नाही. म्हणजे काही लोकांजवळ एक नैसर्गिक जादूच असते, तिच्या साहाय्यानं ते इतरांना जिंकून टाकतात. प्रसंगी ती मोहक रुप धारण करते, कधी उग्र असते, तर कधी इतरांच्या बाबतीत थट्टेची बाब ठरणारी वैशिष्ट्यच एखाद्या व्यक्तीला असामान्यपणे आकर्षणाचं केंद्र करुन टाकतात. उदाहरणच द्यायचं झालं तर आशा पारेख या हिंदी नटीचं देता येईल. 'बाळनजर' हा खरं तर थट्टेचा विषय, पण तिच्या बाबतीत तेच तिच्या मोहकपणाचं कारण ठरलं आहे. खर्ज्यातला आवाज, उग्र मांजरी डोळे हे खास श्रीराम लागूंचं वैशिष्ट्य आहे. असं काहीच 'खास' ललितामध्ये नाही. शी इज प्लेनली ब्यूटिफुल. तुलना केली तर दीपा तिच्यापेक्षा सरस ठरेल. पण दीपाच्या मोहापासून स्वतःला परावृत्त करु शकलो, तसा ललितापासून दूर होऊ शकलो नाही मी.
त्यामागचं एक कारण माझ्या लक्षात येतं. दीपा अवेळी माझ्या आयुष्यात डोकावून गेली. त्यावेळी जाईच्या प्रेमानं, लॉयल्टीनं मला पछाडलेलं होतं. ललिता मला भेटली तेव्हा मनातली तिच्याबद्दलची अॅटॅचमेंट कमी झालेली होती. प्रखर वास्तववादी वगैरे शब्दांत सांगायचं तर सन्निध नसलेल्या जाईच्या आठवणींशी नुसतं प्रामाणिक राहण्याचा मला कंटाळा आला होता.
अभिप्राय
वल्ली
वल्ली · Sat, 16 Oct 2010 - 09:51
संकेताची गरज आहेच सागर, काहीही अंदाज बांधता येत नाहीये.
मस्त कलंदर
मस्त कलंदर · Sun, 17 Oct 2010 - 15:17
ओह्ह.. म्हणजे जीएंचे असावे.. असा आपला माझा अंदाज हो!!
सागर
सागर · Mon, 18 Oct 2010 - 08:09 · उत्तर
नाही हो मस्त कलंदर.. जी ए नाहियेत.
चांगले प्रसिद्ध लेखक होते हे.
अवांतर: पुविवर नीट बारकाईने पहा म्हणजे संकेत सापडेल असे सांगूनही अजून कोणी ओळखले नाही याचे आश्चर्यच आहे :)
रोचीन
रोचीन · Mon, 18 Oct 2010 - 12:29 · उत्तर
सु. शि. असणार!!
अर्रे!!वर पुस्तक चिकटवलेलं मी पाहीलंच नाही!!
सागर
सागर · Mon, 18 Oct 2010 - 12:29 · उत्तर
पुस्तक मात्र कोणी ओळखू नाही शकले
वल्ली
वल्ली · Tue, 19 Oct 2010 - 05:34
वाचलेले होते बर्याच वर्षांपुर्वी पण लक्षात नाही आले.