- Log in to post comments
संकेत १: ही अनुवादीत कादंबरी आहे
उत्तरे विरोपाने द्यावीत. खरडू नयेत किंवा इथेही देऊ नयेत ही विनंती.
२ पेक्षा जास्त विजेते मिळाल्यावर जाहीर करेन उत्तर.
श्रामो चे अभिनंदन बरोब्बर उत्तर ओळखले आहे :)
श्रामोंच्या संकेतामुळे दिगम्भा आणि ऋषिकेश यांनाही ओळखता आले.
ब्रिटिश टिंग्या यांनीही ओळखले आहे.
कोणी हे पुस्तक वाचले नसल्यास अवश्य वाचावे.
वेचा:
==========================
नंतर आणखी एक चामड्याची वहीसारखी वस्तू दिसली. तिनं ती पाहिली आणि एकदम दचकलीच...
केजीबी या रशियन गुप्तहेर खात्यामधील एक मोठा अधिकारी असल्याचं ते राझीनचं ओळखपत्र होतं !
"विश्वासघातकी! बदमाष!" ती पूर्ण हादरली होती. घाईघाईनं तिनं सगळ्या वस्तू मोठ्या पाकिटात कोंबल्या आणि ते जाकिटाच्या आतल्या खिशात टाकलं. थरथरत्या हातांनी तिनं सिगारेटचं पाकीट उचलून त्यातली एक सिगारेट पेटवली. बिछान्याच्या कडेला बसून ती विचार करु लागली. विचार करणं सुद्धा यावेळी सोपं नव्हतं. राझीनची खरी ओळख पटल्यावर तिला जो मानसिक धक्का बसला, तो जबरदस्त होता.
हळूहळू तिला एकेक प्रसंग आठवू लागले. वास्तवाचा स्वीकार करणं तिला भागच होतं. सारं काही स्पष्ट झालं होतं. म्हणजे - अलेक्स राझीन हा तिचा मित्र, मदतनीस , सौजन्यशील दुभाषा, मूळचा अमेरिकन मुलगा म्हणजे अखेरीस केजीबी एजंट निघाला! यापेक्षा आपल्या बाबतीत वाईट काय असेल? तिला पळून जाण्यात त्यानं मदत केली. पाशवी रक्षकांच्या तावडीतून तिला सोडवलं - पण तो एका मोठ्या नाटकाचा खेळ होता.
बिलीनं भरपूर कादंबर्या वाचल्या होत्या; चित्रपट पाहिले होते. माहिती काढून घेण्यासाठी पोलिस खातं कसं डाव करतं, ते तिला चांगलं ठाऊक होतं. प्रथम वाईट पोलिस त्रास देणार आणि मग चांगला पोलिस सुटका करणार ! त्याची सहानुभुती मिळाल्यामुळे 'स्थानबद्ध' व्यक्ती आपण होऊन मन मोकळं करते. इथे जनरल पेट्रॉव्हनं वाईट पोलिसाची भूमिका केली - तिला दहशत घातली. राझीन चांगला पोलिस बनला. रक्षणकर्ता बनून तिचा विश्वास संपादन केला. कैदेतून पलायन हा नाटकातला क्लायमॅक्स होता. राझीनबद्दल शंकेला जागाच राहू नये म्हणून !
==================
अभिप्राय
श्रावण मोडक
श्रावण मोडक · Sat, 16 Oct 2010 - 09:17
चकवा वाटतोय. कारण वाचून बरीच वर्षे झाली आहेत. व्यनि केला आहे.
आधी हे लिहिले, पण आता निश्चितपणे सांगतो. व्यनितून दिलेले उत्तर बरोबर आहे. सागर?
वल्ली
वल्ली · Sat, 16 Oct 2010 - 09:57
श्रामोंच्या प्रतिसादातूनच एक संकेत मिळाला.
व्यनि केला आहे.
सागर
सागर · Mon, 18 Oct 2010 - 10:20
हे काय ? मला वाटले होते की बर्याच जणांनी वाचलेले पुस्तक आहे हे.
खूप गाजलेली कादंबरी आहे ही. हा वेचा फक्त श्रामोने ओळखला आहे.
संध्याकाळी उत्तर देणार आहे. पण त्याआधी अजून कोणी ओळखले तर आनंद होईल.
ऋषिकेश
ऋषिकेश · Mon, 18 Oct 2010 - 10:42
पुस्तक नक्की वाचलं आहे.. मात्र नेमकं नाव आठवत नाहिये :(
श्रावण मोडक
श्रावण मोडक · Mon, 18 Oct 2010 - 10:56 · उत्तर
हाहाहाहा... माझं काहीसं असंच झालं होतं आधी. हा अगदी "दूसरा' होता सागरने टाकलेला. पण अंदाज आल्यावर नीट खेळता आला. :)
सागर
सागर · Mon, 18 Oct 2010 - 12:19 · उत्तर
पुस्तकाचे नाव कळाल्यावर सगळेच उडणार आहेत बसल्या जागी ;)
श्रावण मोडक
श्रावण मोडक · Mon, 18 Oct 2010 - 12:38 · उत्तर
हाहाहाहाहा... माझ्या वरील प्रतिसादात खरं तर संकेत आहे. पण...
ऋषिकेश
ऋषिकेश · Mon, 18 Oct 2010 - 12:47 · उत्तर
ओह्ह.. सागर एक उत्तर पाठवलं आहे.. बहुदा बरोबर आहे.. अर्थात पुस्तक खूपच पूर्वी वाचलं आहे
सागर
सागर · Mon, 18 Oct 2010 - 12:54 · उत्तर
बरोबर आहे ऋ.
श्रामोंनी एवढा मोठा 'दूसरा' चा संकेत दिल्यावर अजून काय बोलणार ;)
ब्रिटिश टिंग्या
ब्रिटिश टिंग्या · Mon, 18 Oct 2010 - 14:22
बरोबर आहे का?
ऋषिकेश
ऋषिकेश · Mon, 18 Oct 2010 - 14:46
मी हे पुस्तक इंग्रजीतून वाचले होते.. त्यामुळे राझिन आणि बिली नावं आठवत असली तरी नेमकं पुस्तक आठवेना.. श्रामोंच्या सेंकेतामुळे ट्युब पेटली.
आभार श्रामो! :)
आणि पुस्तक मस्तच आहे.. खिळवून ठेवणारे!
सागर
सागर · Mon, 18 Oct 2010 - 16:12 · उत्तर
यावेळी वेचा देताना मी दिगम्भांनी वेचा कसा असावा याबाबत जैत रे जैत वेच्याच्यावेळी दिलेल्या सूचनांचा वापर करण्याचा प्रयत्न केला आहे.
त्यामुळेच राझीन, बिली आणि पेट्रॉव्ह यांचा उल्लेख असलेला वेचा निवडला. राझीन आणि पेट्रॉव्ह ही दोघे प्रमुख पात्रे (नायक नायिका या दृष्टीने) नसली तरीही कथानकाची महत्त्वाची पात्रे आहेत. नोराचे नाव घेतले असते तरीही लगेच कळाले असते. आणि बिलीचे पूर्ण नाव वेच्यात नसल्यामुळे कधीतरी वाचलेल्या वाचकांचा गोंधळ होणारच होता. ब्रॅडफोर्ड हे नाव दिले असते तर मग वेच्याला अर्थ उरला नसता. त्यामुळे हा वेचा अनेकांना चकवून गेला एवढे नक्की
पुढचा वेचा द्या रे कोणीतरी लवकर :)
इंद्रराज पवार
इंद्रराज पवार · Mon, 18 Oct 2010 - 15:23
श्री.सागर....
".....त्यामुळेच राझीन, बिली आणि पेट्रॉव्ह यांचा उल्लेख असलेला वेचा निवडला. ही दोघे प्रमुख पात्रे नसली तरीही कथानकाची महत्त्वाची पात्रे आहेत....नोराचे नाव घेतले असते तर लगेच कळाले असते.
काहीतरी गल्लत होत आहे वरच्या वाक्यात. बिली ब्रॅडफर्ड तर कादंबरीची नायिकाच आहे ना? "द फर्स्ट लेडी'? राझीन तर केजीबी एजंट आणि 'फर्स्ट' ला 'मी तुझ्या प्रेमात पडलो आहे....' अशी बतावणी करणारा, प्लॅननुसार. नोरा जड्सन ही बिलीची प्रेस सेक्रेटरी...त्यामुळे कथानकात ती तर खरी दुय्यमच.
वरील तीन नावामुळे मी ही कादंबरी ओळखली होती (पण तुमचा 'विरोपा' ची अट काही तांत्रीक अडचणीमुळे पूर्ण होत नव्हती...दोनचार प्रयत्नानंतर मग मी दूरच झालो)....अनुवादित मी वाचलेली नाही...माझ्याकडे वॅलेसची ओरिजिनल आहे. मूळ पॅरा असा आहे :
"Here were the very same initials on the card from Alex Razin's wallet. KGB.
No more mystery. Alex Razin was an out-and-out KGB agent. The rotten bastard.
Hastily, she closed his wallet and stuffed it back into the inner pocket of his sports jacket. Blindly, she sought her package of cigarettes, found it, took one, lighted it, and sat down on he side of he bed to think. Reality was hard to accept, but he truth of what had happened could no be denied.
Billie had seen enough films, read enough novels, to know the Good Cop and the Bad Cop routine. General Petrov had played the Bad Cop. To frigheten her. Razin had played the Good Cop. To protect her and win her confidence. The escape had been he climactic part of the script, to maker her believe in Razin completely, to soften her.
तुमच्या खुलाशामुळे कादंबरी न वाचणार्यांना असे वाटेल की 'नोरा' ही सेकंड लेडी ची नायिका आहे...यासाठी हा प्रतिसाद.
इन्द्रा
सागर
सागर · Mon, 18 Oct 2010 - 16:15 · उत्तर
इंद्रराज,
मला वाटते मी घाईघाईत व्यवस्थित लिहिले नव्हते. मी पुन्हा वाचल्यावर मलाही असेच वाटले की मी नोराला नायिका असल्याचे सांगतो आहे. तीन पात्रांची नावे दिली होती. दोन पात्रे ती राझीन आणि पेट्रॉव्ह. बिली म्हणजेच राष्ट्राध्यक्षांची बायको ...
दुरुस्ती केली आहे वरच्या प्रतिसादात. बघा काही अजून चूक राहिली असेल तर :)
इंद्रराज पवार
इंद्रराज पवार · Mon, 18 Oct 2010 - 18:20
".....दुरुस्ती केली आहे वरच्या प्रतिसादात. बघा काही अजून चूक राहिली असेल तर...."
~~ वेल, तुम्ही लिहिले 'अजून चूक राहिली असेल तर....' म्हणून लिहितो. अन्यथा तशी काही चूक नाही; तरीही....
~~ दुरुस्तीत तुम्ही खुलासा केला : "राझीन आणि पेट्रॉव्ह ही दोघे प्रमुख पात्रे (नायक नायिका या दृष्टीने)"; इथे कमाल आहे ती आयर्विंग वॅलेसच्या प्रभावी आणि वाचकाला खिळवून ठेवणार्या लेखणीची. 'द सेकंड लेडी' ही त्याची अशी एक (प्रचंड खपाची) कादंबरी आहे की जिच्यात रूढ अर्थाने 'नायक' नाहीच ! अमेरिकन प्रेसिंडेंटच्या पत्नीला 'द फर्स्ट लेडी' असे नाम असते....इथे बिली ब्रॅडफर्ड ही ती फर्स्ट लेडी. हिचे केजीबी मशिनरी अपहरण करते आणि तिच्या जागी तिची "डुप्लिकेट" व्हाईट हाऊसमधे अवतरते....ती ही 'सेकंड लेडी'....कथानक केवळ बिलीची स्वतःच्या हिमतीवर सुटका करून घेण्याची धडपड आणि खलनायक राझिन व त्याचा बॉस जनरल पेट्रोव्ह यांचा सेकंड लेडीच्या माध्यमातून अमेरिकेला आपल्या कब्जात घेण्याचे प्लॅन्स यावर असल्याने संपूर्ण कथानक हे नायिकाप्रधानच आहे.
नोरा ही फर्स्ट लेडीची प्रेस सेक्रेटरी आणि गॅरी पार्कर हा एक पत्रकार हीच दोघे खर्या बिलीच्या जवळचे.... पण यांचेही कादंबरीतील स्थान फक्त 'हेल्पर' याच दर्जाचे.
तुम्ही 'नायकनायिका' असा उल्लेख केला म्हणून हा (जरा जादाचा) खुलासा.
आयर्विंग वॅलेसच्या "फॅन क्लब" याही अशाच अवाढव्य कादंबरीला नायक नाही....आहे ती फक्त नायिका "शॅरॉन फिल्ड्स" नावाची हॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री....जिच्या प्राप्तीसाठी या फॅन क्लबचे चार सदस्य.....[पण राहू दे... उगाच गंमत घालविण्यात अर्थ नाही....पण जबरदस्त आहे ही कादंबरीदेखील....मराठीत अनुवाद झाला आहे की नाही, हे माहित नाही...]
इन्द्रा
सागर
सागर · Tue, 19 Oct 2010 - 08:49 · उत्तर
इंद्रराज,
कीसच पाडलात की तुम्ही ;)
बहुतेक वेळा आयर्विंग वॅलेस आणि सिडने शेल्डनही नायिकाप्रधानच कादंबर्या लिहितात.
फॅन क्लबबद्दल सांगितल्याबद्दल धन्यवाद. मराठीत बहुतेक अनुवाद नाही झालेला