- Log in to post comments
पुस्तक वाचले असल्यास कोणताही संकेत देण्याची आवश्यकता नाही.
संकेतः या लेखकाच्या अलिकडच्या एका पुस्तकाने वाचकांना निराश केले. कारण त्याची तुलना या पुस्तकाशी झाली ज्यातील हा वेचा आहे. :)
संकेताची गरज नाही याची खात्री होतीच. त्याप्रमाणे सर्वप्रथम मस्त कलंदर नंतर वल्ली , निखिल यांनी बरोबर ओळखले आहे. :) तसेच इंद्रराज व दिगम्भा यांनीही ओळखले आहे
वेचा:
=================================
संध्याकाळी मामा आला.
पण जेवण होऊन गेलं, तरी नोकरीचं कसं काढावं हे कळेना.
तेव्हा त्यांना वाटलं, हा इकडेच झोपणार असेल. म्हणून त्यांनी माझी झोपायची तयारी केली. उद्या आपण दहापर्यंतही उठणार नाही. तेव्हा ह्यांना आत्ताच मोकळं करावं, म्हणून मी घाबरुन मुद्द्याला हात घातला.
तेव्हा सगळीच चर्चा अतिशय खालच्या सुरात झाली. आधी मामा म्हणाला, तुला आणि नोकरी? ती काय म्हणून?
मी म्हणालो, मला आयते पैसे खर्चायचा कंटाळा आला आहे. मला अनुभव घ्यायचा आहे.
हे नोबल स्पिरिट इतकं काही चांगलं नाही. हे अमेरिकेत ठीक आहे. आपल्याकडे गोरगरीब लोकांना नोकर्यांची मारामार. तिथे तुझ्यासारख्यानं धडपडावं? तू खरं तर आरामात पैसे खर्च करावेस. परीक्षा द्याव्यात. एकदा नाही जमलं, तर सातदा द्याव्यात. फॉरिनला जावं - तर हे काय खूळ काढलंस?
मी म्हणालो, मला नोकरी पाह्यजे आहे. येत्या एक तारखेपासून.
शेवटी तो म्हणाला, अरे पण एवढी घाई काय? तुला त्यातल्या त्यात कमी त्रासाची नोकरी मिळवून देतो. माझ्या हातात आहे सगळं. महिनाभर थांब.
मग त्यानं मला सकाळची चालेल का संध्याकाळची, गोदीतली चालेल की गोदीच्या ऑफिसातली - हे सगळं ठाकठीक विचारुन घेतलं. आणि म्हणाला, येत्या महिन्यात तुला एकदा येऊन जावे लागेल. इंटरव्ह्यू माझा असिस्टंट घेतो. मग पुढच्या महिन्यात किंवा फारतर त्याच्या पुढच्या महिन्यात तू इकडे कायमचाच ये. तू आता पुण्याला जाणार काय?
अभिप्राय
मस्त कलंदर
मस्त कलंदर · Mon, 25 Oct 2010 - 20:10
हा हा हा.. मी ओळखलं!!!!!
आताशाच वाचले मी हे पुस्तक!!!
सागर
सागर · Mon, 25 Oct 2010 - 21:03 · उत्तर
मस्त कलंदर,
एवढे स्पष्टच बोलताय तेव्हा पुस्तक ओळखले असणारच. विरोपाने उत्तर पाठवा.
खरोखर ओळखले असेल तर विक्रमी वेळेत पुस्तक ओळखल्याबद्दल अभिनंदन :)
वल्ली
वल्ली · Tue, 26 Oct 2010 - 05:38
अगदीच सोपे कोडे घातलेत यावेळी. व्यनि केला आहे.
सागर
सागर · Tue, 26 Oct 2010 - 08:41 · उत्तर
वल्ली,
सोपे होते खरे यावेळचे कोडे पण पुस्तककोडे या प्रकारात एवढ्या सुंदर पुस्तकावर कोडे नव्हते म्हणूनच दिले होते :)
दिगम्भा
दिगम्भा · Tue, 26 Oct 2010 - 10:39
ज्याने वाचले नाही त्याच्यासाठी संकेतसोय नाही का?
त्याला एवढे पट्कन उत्तर कळेल?
सागर
सागर · Tue, 26 Oct 2010 - 10:43 · उत्तर
दिगम्भा,
जवळपास प्रत्येक दर्दी वाचकाने हे पुस्तक एकदा तरी वाचलेले असणारच या अपेक्षेने संकेत दिलेला नव्हता.
एक मोठा संकेत वर देतो आहे.
वल्ली
वल्ली · Tue, 26 Oct 2010 - 10:48 · उत्तर
अगदी खरे म्हणणे आहे सागर तुमचे. जवळपास प्रत्येक दर्दी वाचकाने हे पुस्तक एकदा तरी वाचलेले असणारच आहे.
दिगम्भा
दिगम्भा · Tue, 26 Oct 2010 - 12:42 · उत्तर
कळले.
पण वेच्याची निवड विषयाचा पुरेसा निर्देश करत नाही असे वाटते.
ज्यांनी पुस्तक ७८-८० साली वाचले आणि नंतर तपशील विसरले ते आउट होतील माझ्यासारखे.
- दिगम्भा
सागर
सागर · Tue, 26 Oct 2010 - 13:05 · उत्तर
दिगम्भा,
या वेच्याच्या वेळी मी मुद्दाम विधीवत संकेत पाळले नव्हते कारण तसे केले असते तर हे पुस्तक लगेच कोणीही ओळखू शकले असते. :)
पण असे असूनही मस्त कलंदर, वल्ली आणि निखिल यांनी तळ्यात-मळ्यात न होता अगदी ठामपणे ओळखला.
तुम्ही म्हणता तसे एवढ्या प्रदीर्घ कालावधीनंतर हा वेचा गोंधळवणे साहजिकच आहे.
इंद्रराज पवार
इंद्रराज पवार · Tue, 26 Oct 2010 - 13:08
पुस्तक तर इतरांप्रमाणे मीही ओळखले आहेच....पण मकीने तर पहिल्याच झटक्याला ओळखले असल्याने तिला "खंडेराव" पाऊ दे.
श्री.सागर यांना विरोप वा व्य.नि. करायचीदेखील आवश्यकता नाही.....कारण सर्वानीच 'पांडोबा' ला ओळखले आहेच.
इन्द्रा
सागर
सागर · Tue, 26 Oct 2010 - 13:16 · उत्तर
खंडेरावांचा संकेत पुरेसा आहे ;)
श्रावण मोडक
श्रावण मोडक · Tue, 26 Oct 2010 - 14:31 · उत्तर
असं आहे होय. बरं बरं...