- Log in to post comments
>>>> ..... दोन माणसांच्या नातेसंबंधात मला एक गोष्ट सतत जाणवत आली आहे. ती दोन्ही माणसे हयात असताना एवढ्या-तेवढ्याने ताणले जाणारे त्यांचे संबंध, त्यातली एक व्यक्ती कालवश झाली की इतके शिथिल होतात, मागे राहिलेल्या व्यक्तीला मग गेलेल्याच्या दोषांत इतके गुण जाणवू लागतात की वाटते, या तणावविरहित संथ शांत जीवनासाठी इतकी मोठी किंमत द्यायलाच हवी होती काय? समजूतदारपणा ही इतकी दुर्मिळ चीज का असावी? या 'अहम्' चा भाव किती जबरदस्त आणि सर्वव्यापी आहे ! आम्ही संस्कृतीच्या कितीही गप्पा मारल्या किंवा सुसंस्कृतपणा बाणवण्याचा कितीही मनापासून प्रयत्न केला, तरी यच्चयावत मानवजात ही या 'अहम्' ने आतून अशी काही एखाद्या भयानक रोगासारखी पोखरून काढली गेली आहे, की संस्कृती पेलण्याची ताकदच माणसात शिल्लक राहिलेली नाही. मृत्यूपुढे फारतर हा अहम् शरणागती पत्करत असावा. रोगापेक्षा ही औषधयोजना किती भयंकर आहे !
संकेत :
१. हा वेचा एका आत्मचरित्रातील आहे....जरी रूढार्थाने ते आत्मचरित्रच आहे/असेल असे नाही.
२. दुसरा संकेत >>>>
असे दिसत आहे की, हे पुस्तक तर जवळपास सर्वांनी वाचले आहे (असावे...) पण वेचा असा आहे की त्यावरून तो आत्मचरित्राचा भाग वाटत नाही....त्यामुळे थोडासा समजेल असा आणखीन एक संकेत देतो : (मात्र लेखकाविषयी देणार नाही....कारण लेखकाचा संकेत असा होईल की एका क्षणात कळेल....म्हणून...)
~ या आत्मचरित्राच्या २००७ पर्यंत १४ आवृत्त्या निघाल्या आहेत....त्यापुढेही निघाल्या असणार..पण माझ्याकडील ती चौदावी आहे.
श्री.सागर आणि श्री.दिगम्भा यांच्या प्रयत्नानंतर आता "त्या" पुस्तकाचे नाव जाहीर करणे गरजेचे आहे...
वेचा आहे >> "आहे मनोहर तरी...." या पुस्तकातील / लेखिका...अर्थातच सुनिता देशपांडे
मी मुद्दाम 'लेखक' असे पुल्लिंगी रूप वापरले होते....कारण उघड आहे....तो संकेत आणि वेच्याची भाषा सर्वांना सुनिता देशपांडे या नावाकडेच घेऊन गेला असता.
सर्वांना धन्यवाद !
इन्द्रा
अभिप्राय
मस्त कलंदर
मस्त कलंदर · Fri, 29 Oct 2010 - 16:18
सध्या माझ्या कामकाजाकडे पाहता वेचा द्यायला वेळ नव्हता. अणि तसे लिहिन लिहिन म्हटले पण राहून गेलं. धन्यवाद रे इंद्रा वेचा दिल्याबद्दल.
बाकी, हे पुस्तक वाचल्यासारखे तर वाटतेय. पण खूप वर्षांपूर्वी वाचल्यासारखे आहे. शैलीवरून फडके, गोरेंच्या काळातल्या माणसाने लिहिल्यासारखे वाटते आहे.
अवांतरः प्रतिसाद लिहिताना चुका करत नाहीस, आज छापील उतारा देताना का व्हाव्यात? एकदा वाचून संपादित कर.
सागर
सागर · Fri, 29 Oct 2010 - 19:47
इंद्रराज सारख्या दर्दी वाचकाने पहिलाच आणि खास करुन सुवर्णमहोत्सवी वेचा देणे ही एक आनंदाची गोष्ट आहे
इंद्रराज वेचा देण्याच्या उपक्रमात स्वागत आहे :)
उत्तर विरोपाने कळवेन लवकरच
(माझी ट्यूब जरा उशीरा पेटते ;) )
इंद्रराज पवार
इंद्रराज पवार · Fri, 29 Oct 2010 - 19:44
"....प्रतिसाद लिहिताना चुका करत नाहीस, आज छापील उतारा देताना का व्हाव्यात? एकदा वाचून संपादित कर. ..."
~ ओ... आय अॅम सो सॉरी फॉर दोज अनफरगिव्हेबल टायपिंग मिस्टेक्स, मकी... पण, ते सर्व झाले ते तांत्रिक करामतीमुळे. मुळात मी अचूकतेवर फार फार जोर देत असतो. कोणताही/कसलाही प्रतिसाद पोस्टपूर्वी दोनदा तपासून पाहतोच. वेचाच्या बाबतीतही योग्य ती काळजी घेतली होतीच. पण ज्यावेळी तो Submit केला त्यावेळी पु.वि.ने स्वीकारला नाही...त्याला कारण म्हणजे इथली ही माझी पहिलीच वेळ आणि नकळत 'पुस्तका'च्या कॉलममध्ये मी ????? असे टाईप केले होते. साहजिकच वेचा बाऊंस झाला, मग मार्गदर्शनासाठी सागर याना खरड केली व त्यांचे उत्तर येईपर्यंत ते मॅटर मी 'वर्ड फाईल' मध्ये कॉपी करून ठेवले व माझ्या अन्य कार्यात गुंतून गेलो. अर्ध्या तासाने सागर यांची खरड आली, मार्गदर्शनही योग्यरितीने आले...व त्यानुसार मी थेट वर्डवरून कॉपी उचलली व इथे पेस्ट केली....घाईने 'प्रकाशित करा' वर उंदीरमामालाही नेले....आणि स्वीकृती आल्यावर शांतही झालो. त्यावेळी समजले की वर्ड टु पुवि पेज ट्रान्स्फर कुछ कुछ गडबड होता है !
पूर्वीही एकदा मिपावर तसा अनुभव आला होता... उदा. "बर्यापैकी" असे टाईप करून वर्डमध्ये ठेवले तर त्याचे पेस्टींगच्यावेली "बर्यापैकी" असे होते.... गंमतच आहे.
एनी वे.... थॅन्क्स फॉर पॉईन्टिंग आऊट दोज सिव्हीअर टायपोज ! वेचा संपादित करून प्रकाशित केला आहे.
(जाताजाता तुझ्यासाठी एक बोनस संकेत : फडके, गोरे यांच्या काळात डोकावू नकोस)
इन्द्रा
मस्त कलंदर
मस्त कलंदर · Fri, 29 Oct 2010 - 19:54 · उत्तर
ओह्ह... मला हे पुस्तक का कुणास ठाऊक ययाती, स्वामी, छावा अशा जुन्या आणि प्रसिद्ध पुस्तकांच्या मांदियाळीतले एक वाटतं आहे. पण लेखकाबद्दलचा अंदाजही चुकला. आता मात्र पास माझा!!! :-(
बाकी, एवढेही काही गंभीर टायपोज नव्हते रे ते. कधी कधी मुरा ही विनोद करतोच ना. तेवढं चालायचंच.
सागर
सागर · Fri, 29 Oct 2010 - 20:20
>>> रोगापेक्षा ही औषधयोजना किती भयंकर आहे
हे वाक्य खूप खूप परिचयाचे आहे.
पुस्तक वाचल्यानंतर माझ्या मनात उरले होते हेच ते वाक्य :)
बहुतेक अनुवादित आहे. नसेनही कदाचित. आठवले की सांगेनच. पण तूर्तास रजनीदेवीच्या अधीन होतो आहे ;)
इंद्रराज पवार
इंद्रराज पवार · Sat, 30 Oct 2010 - 05:24 · उत्तर
"....बहुतेक अनुवादित आहे...."
इल्ला !!
इन्द्रा
वल्ली
वल्ली · Sat, 30 Oct 2010 - 05:33
व्यनि केला आहे. पण अर्थातच हा तर्क म्हणजे अंधारात तीर मारणेच होय. पुस्तक वाचलेले नाही हे तर नक्कीच. त्यामुळे संकेतांचीच वाट पाहतोय.
इंद्रराज पवार
इंद्रराज पवार · Sat, 30 Oct 2010 - 05:49
हॅट्स ऑफ टु नंदन बाबू !!! पहिल्याच बॉलमध्ये सिक्सर !
त्यांना दुसर्या संकेताचीही आवश्यकता भासली नाही. ग्रेट !
इन्द्रा
दिगम्भा
दिगम्भा · Sat, 30 Oct 2010 - 07:51
सुंदर वेचा!
अंदाज कळवला आहे
श्रावण मोडक
श्रावण मोडक · Sat, 30 Oct 2010 - 15:42
पास. बराच विचार केला, पण वाचल्याचे आठवत नाही.
इंद्रराज पवार
इंद्रराज पवार · Sat, 30 Oct 2010 - 16:12 · उत्तर
नो चान्स..... तुमच्यासारख्याने 'हे' पुस्तक वाचलेले नाही असे होणारच नाही, इतका विश्वास आहे मला. हां...आठवत नसेल हे एक वेळ मान्य करतो.
इन्द्रा
सागर
सागर · Sun, 31 Oct 2010 - 16:18 · उत्तर
हे पुस्तक बरेच परिचयाचे आहे. वाचलेले असणे अवघड आहे ;)
श्रामो नक्की वाचलेलेच असणार रे. नाव कळाले की म्हणावे लागेल की हे पुस्तक होते होय?
मी बहुतेक मंगळवारीच उडी घेईन इथे. त्यामुळे माझा पास गृहीत धरायला हरकत नाहिये. हे पुस्तक वाचले आहे एवढे नक्की. वेचा चांगलाच चकवतो आहे. ते वाक्य मनात नुसते खदखदत आहे, पण आठवणींच्या गर्तेतून बाहेर यायला तयार नाही.
इंद्रराज पवार
इंद्रराज पवार · Sun, 31 Oct 2010 - 17:27
"....वाचलेले असणे अवघड आहे..."
~ तुमच्या वाचनाच्या आवडी मी जाणल्या असल्याने हे पुस्तक तुमच्याकडून चुकणे संभवत नाही.....नंदन यांनी पहिल्याच वाचनात झटकन ओळखले....इतके ते प्रसिद्ध आहे.
दुसरा संकेत देऊ का?
इन्द्रा
सागर
सागर · Sun, 31 Oct 2010 - 17:33 · उत्तर
हो द्या इंद्रराज,
ते वाक्य हृदयात कोरलेले आहेच. पण नेमके पुस्तक आठवत नाहीये.
उत्तर ओळखू नाही शकलो तर हळहळ वाटेल एवढे प्रसिद्ध ते पुस्तक आहे एवढे नक्की :)
इंद्रराज पवार
इंद्रराज पवार · Sun, 31 Oct 2010 - 17:57 · उत्तर
पुढील संकेत दिला आहे.....आता पुस्तक ओळखायला जड जाऊ नये.
इन्द्रा
सागर
सागर · Sun, 31 Oct 2010 - 18:48 · उत्तर
ओळखले असे वाटते आहे ( नव्हे खात्रीच आहे ;) )
किमान मी तरी हा वेचा अगोदर ओळखायला हवा होता.
या पुस्तकाने मी अलिकडेच ट्रान्स मधे गेलो होतो ;)
इंद्रराज पवार
इंद्रराज पवार · Mon, 1 Nov 2010 - 07:50 · उत्तर
विरोप पाहिला.....पण तुम्ही 'ट्रान्स' मध्ये ज्या पुस्तकामुळे गेला 'त्या' पुस्तकातील 'हा' वेचा नाही.....सो ट्राय अगेन... नंदन आणि रोचीन यानी अचूक ओळखले आहेच.
इन्द्रा
सागर
सागर · Mon, 1 Nov 2010 - 12:11 · उत्तर
माझ्या ग्रंथसंग्रहात असूनही आणि माझे आवडते पुस्तक असूनही ओळखता नाही आले :(
सध्या जास्त डोक्यावर ताण देत नाहिये म्हणूनही असेल कदाचित.
पुस्तकाचे नाव माहिती करुन घ्यायला उत्सुक आहे.
उत्तर लवकर द्यावा इंद्रराज :)
इंद्रराज पवार
इंद्रराज पवार · Mon, 1 Nov 2010 - 06:27
"रोचीन" झिंदाबाद !!!!
~ एकच अंदाज....आणि तोही १००% अचूक निघाला. अभिनंदन ! ~ नंदन आणि रोचीन -- २ विजेते झाले.
इन्द्रा
रोचीन
रोचीन · Mon, 1 Nov 2010 - 07:30
हे पुस्तक वाचून बरीच वर्षे झाली. परवाच पुस्तकांचे कपाट आवरतांना हे दिसलं आणि परत एकदा वाचायचं ठरवलं. त्यामूळे आज वेचा वाचल्यावर लेखनशैली जास्त पटकन क्लीक झाली. :)
इंद्रराज पवार
इंद्रराज पवार · Mon, 1 Nov 2010 - 12:43
पुस्तक जाहीर केले आहे.
श्री.नंदन आणि रोचिन यानी ते पहिल्याच प्रयत्नात ओळखले त्याबद्दल त्यांचे यापूर्वीच अभिनंदन केले आहेच.
श्री.दिगम्भा जवळपास पोचले होते.....तर श्री.सागर यांचा 'पार्टनर' मुळे थोडासा गोंधळ झाला.
एनी वे....थँक्स फॉर सच अ वंडरफुल एक्स्चेन्ज !
इन्द्रा
सागर
सागर · Mon, 1 Nov 2010 - 12:48 · उत्तर
म्हटले काहितरी घोळ होतोय तो झालाच :)
आहे मनोहर तरी वाचायला घेतले होते आणि चाळता चाळता नेमका हाच वेचा वाचला होता.
आणि खास करुन हे वाक्य "रोगापेक्षा ही औषधयोजना किती भयंकर आहे" अगदी मनात घर करुन राहिले होते
मग अचानक का कुणास ठावूक मी व.पुं.चे पार्टनर वाचायला घेतले होते. त्यामुळे ही भेसळ झाली
असो.
चांगलाच चकवा देणारा वेचा दिलात इंद्रराज. त्याबद्दल तुमचे अभिनंदन. अजून एक येऊ द्यात. :)
इंद्रराज पवार
इंद्रराज पवार · Mon, 1 Nov 2010 - 12:57
".....अजून एक येऊ द्यात...."
~ तुमची अवस्था पाहुन ती आणखीन वाढवावी असा 'थोर थोर....उदाहरणार्थ...वगैरे...' विचार मनी आला होता, पण संभ्रमात पडलो होतो की ५१ वा वेचा मीच देणे बरोबर आहे की नाही.
पण दिला तर परत तुम्ही 'ट्रान्स' मध्ये जाणार याची बालंबाल खात्री आहे. विचार करा.
इन्द्रा
सागर
सागर · Mon, 1 Nov 2010 - 13:03 · उत्तर
यावेळी ट्रान्स मधे नाही जाणार याची खात्री आहे
कारण घरच्या कामातून मोकळा झालोय.
उद्या पुन्हा रिचार्ज झालेलो असेन ;)
द्या नवीन वेचा
श्रावण मोडक
श्रावण मोडक · Mon, 1 Nov 2010 - 13:39
अगायाया... विकेटच गेली.
इंद्रराज पवार
इंद्रराज पवार · Mon, 1 Nov 2010 - 14:47 · उत्तर
ओ नो.....विकेट जाणार नाही तुमच्यासारख्य चतुरस्त्र वाचकाची..."....आहे मनोहर तरी" तुम्ही नक्कीच वाचले असणार, पण काही काळासाठी स्मृती फ्रीझ झाली होती असे म्हणू या....त्यामुळे चटकन नाव आठवले नसणार.
पुढचा वेचा निवडलाय....उद्या देतो....तोही 'आत्मचरित्रा'तीलच असेल.
इन्द्रा
श्रावण मोडक
श्रावण मोडक · Mon, 1 Nov 2010 - 15:17 · उत्तर
वाचलं आहे. पण...
मस्त कलंदर
मस्त कलंदर · Mon, 1 Nov 2010 - 17:25 · उत्तर
मी पण वाचलेय.. पुष्कळ वर्षांपूर्वी.. :-(
ज्योति कामत
ज्योति कामत · Mon, 1 Nov 2010 - 18:01
पण वाचून खूप वर्ष झाली. शिवाय इन्द्रा एवढं पुढ्यातलं उदाहरण उदाहरण देईल का अशीही शंका आली. पण व्यनि न करण्याचं खरं कारण म्हणजे १००% खात्री नव्हती हेच!
इंद्रराज पवार
इंद्रराज पवार · Mon, 1 Nov 2010 - 19:51
सर्वश्री श्रा.मो....म.क. आणि ज्योति....
~ बघा, माझे तुमच्या वाचनाबद्दलचे अंदाज किती सत्य ठरले ! मी म्हटलेच होते की 'ते' पुस्तक तुम्ही सर्वांनी वाचलेच असणार.....श्री.श्री.ना.पेंडसे यांच्या "लेखक आणि माणूस" या आत्मचरित्रानंतर मराठीत इतके गाजलेले दुसरे म्हणजे सुनीताबाई यांचेच....जरी त्या, त्या पुस्तकाला आत्मचरित्र न म्हणता 'आठवणीचे वेचे' म्हणत असत.
पण ठीक आहे...त्या निमित्ताने सर्वानी आपली डोकी बराच काळ आठवणीच्या जंगलात नेली.
पुढच्या वेच्याच्या वेळी इतके अवघड वाटणार नाही अशी आशा आहे.
इन्द्रा