- Log in to post comments
५१ वे पुस्तककोडे देताना मी सध्या वाचत असलेल्या एका 'आत्मचरित्रा' तील वेचा द्यावा असा बेत केला होता....पण या अगोदरचा वेचाही आत्मचरित्रातीलच असल्याने पाठोपाठ तोच प्रकार नको, म्हणून हा खालील वेचा (अन्य गटातील) निवडला आहे.
".....एवढे सहा महिने जाऊ द्या. मग बघा !" हे वाक्य तर मी वयाच्या सहाव्या महिन्यापासूनच आजपर्यंत ऐकत आलो आहे. शनी, गुरू, मंगळ किंवा आणखी कोणीतरी असाच स्वगृही यावा लागतो. ही मंडळी आपली घरं सोडून आधी इतरांची घरं धुंडाळीत हिंडतातच का हे मला अजूनही कळलं नाही. माझी 'सनलाईन' कमालीची सुंदर आहे हेही मला पुष्कळांनी सांगितलं आहे. परंतु तिचा अजूनही उजेड पडलेला मला आठवत नाही. काहींनी माझे कुंडली एकदम कंडम ठरवून बायकोच्या नशिबानं मी 'खातो' आहे असं तिच्यासमोर बजावून माझ्या घरचे पोहे, शिरा वगैरे खाल्ले आहेत. घरी जन्माला येणारं प्रत्येक मूल भलतंच भाग्य घेऊन आलं आहे ही हमी तर मी पाच वेळा ऐकली. आणखी किती वेळा ऐकणं नशिबात आहे, देव जाणे !..."
संकेत
१. हे ज्योतिषशास्त्रावरील भाष्य आहे, हे तर स्पष्टच आहे....पण पूर्ण पुस्तक याच विषयावर नाही.
२. लेखकाविषयी संकेत सांगण्यात अर्थ नाही...मग मजाच जाईल.
संकेत क्रमांक २
महाराष्ट्रातीलच काय पण ज्या ज्या ठिकाणी "मराठी" भाषेतील पुस्तक विक्रीला ठेवले जाते तिथे तिथे या लेखकाचे किमान एक तरी पुस्तक असतेच असते.
जाहीर करत आहे : "असा मी असामी" ~ श्री.पु.ल.देशपांडे
इन्द्रा
अभिप्राय
श्रावण मोडक
श्रावण मोडक · Tue, 2 Nov 2010 - 10:53
व्यनि केला आहे.
इंद्रराज पवार
इंद्रराज पवार · Tue, 2 Nov 2010 - 10:59
वेच्याची शाई वाळायच्या आतच जबरदस्त वाचनप्रेमी श्री.श्रावण मोडक यानी पुस्तक ओळखले.
अभिनंदन !
इन्द्रा
इंद्रराज पवार
इंद्रराज पवार · Tue, 2 Nov 2010 - 17:15
"मुक्तसुनीत" (हे माझे गाईड आहेत....यांचे बोट धरून मी मिपा व नंतर पुविवर आलो आहे.) ~ अभिनंदन
दुसर्या प्रयत्नात का होईना....पण नेमके पुस्तक ओळखले.
इन्द्रा
इंद्रराज पवार
इंद्रराज पवार · Wed, 3 Nov 2010 - 07:20
श्रा.मो.; मुसु....पाठोपाठ "रोचीन" ने अचूक ओळखले हे पुस्तक....अभिनंदन !!
इन्द्रा
इंद्रराज पवार
इंद्रराज पवार · Wed, 3 Nov 2010 - 07:20
श्रा.मो.; मुसु....पाठोपाठ "रोचीन" ने अचूक ओळखले हे पुस्तक....अभिनंदन !!
इन्द्रा
इंद्रराज पवार
इंद्रराज पवार · गुरुवार, 4 Nov 2010 - 05:31
ग्रेट ~ श्री.सागर यानीही पु.ल.देशपांडे यांच्या "असा मी असामी" या पुस्तकातील क्र.५१ च वेचा असल्याचे अचूक ओळखले.
सर्वांचे अभिनंदन !!
सागर
सागर · गुरुवार, 4 Nov 2010 - 07:13 · उत्तर
एवढा सोपा वेचा इंद्रराज देतील असे मला वाटले नव्हते त्यामुळे पु.लं. च्या ऐवजी आधी दुसरीकडे उडी मारुन पाहिली होती. मग म्हटले चला येऊ ट्रॅक वर :)
समग्र पु.लं. मी सलग वाचले होते, तेही खूप वर्षांपूर्वी. जवळपास १५ वर्षांपूर्वी त्यामुळे डोक्यात खिचडी पकली होती. आणि दिवाळीच्या कामात पूर्ण गुरफटलो होतो त्यामुळे मेंदूवर जास्त ताण दिला नसल्याने ओळखायला वेळ लागला हे नक्की.
वेचा ओळखणारे खरे शिलेदार श्रामो, मुक्तसुनीत आणि रोचीनच आहेत. मी त्यामानाने खूप उशीर केला. :)