- Log in to post comments
पुस्तक वाचले असेल तर संकेताची गरज नाही. तरी गरज पडली तर देईन.
एकमेव संकेतः अलिकडेच पुस्तकविश्व वर या लेखकाच्या सर्वोत्कृष्ट कथेबद्दल चर्चा झाली होती. आणि ज्या कथेतील हा वेचा आहे ती कथा त्यांच्या लेखनाचा मेरुमणी असल्याचे अनेकांनी सांगितले होते. प्रसिद्धीपासून कायम दूर राहणार्या या लेखकाच्या लेखनाचे कौतुक करावे तितके थोडे आहे.
वेचा ओला आहे तोवर श्रामो, इंद्रराज, दिगम्भा, मुक्तसुनीत, वल्ली, वेदश्री, मस्तकलंदर, यशोधरा, रोचीन, निखिल या खंद्या फलंदाजांबरोबरच इतरही आजी - माजी सदस्यांकडून उत्तरे अपेक्षित आहेत.
अपेक्षेप्रमाणेच इंद्रराज व मुक्तसुनीत यांनी ओळखले आहे. पुविच्या नवीन सदस्या ज्योति कामत यांनीही ओळखले आहे. त्यानंतर आणखी एक वाचनप्रेमी दिग्गज दिगम्भा यांनीही ओळखले आहे
सर्वांचे मनापासून अभिनंदन.
टण्या आणि वेदश्री यांनी उत्तर पाठवले नसले तरी उत्तर त्यांनी ओळखले आहे याची खात्री आहे.
कोड्याचे उत्तरः
'इस्किलार' म्हणताच जी.ए.कुलकर्णींच्या या सर्वोत्कृष्ट कलाकृतीची आठवण येत नाही असा वाचक विरळाच.
पुस्तकाचे नावः रमलखुणा (यात दोनच कथा आहेत १. प्रवासी आणि २. इस्किलार)
लेखक : जी.ए.कुलकर्णी
वेच्याचे स्थान : पान क्रमांक ९० वरील हा वेचा आहे.
क्रिसस हे नाव वेच्यात आले असते तर वेच्याला काही अर्थ राहिला नसता म्हणून हा वेचा दिला तरी त्यातील वृद्ध, नाणी, सैन्याचा उल्लेख आणि भाषा थेट जी.एं.कडे निर्देश करणारीच होती.
वेचा:
======================================
आतील वातावरण धूप, मद्याचा धुंद वास आणि किणकिण संगीताचा ध्वनी यांनी दाटून गेले होते. तो आत येताच एक वृद्ध लगबगीने समोर आला व त्याने त्यास नम्रपणे लवून अभिवादन केले.
"तुमच्यासारख्या थोरांनी येथे पदस्पर्श करावा, ही माझ्या भाग्याची परमावधी आहे! तुमच्या इतमामाला शोभेल असे आदरातिथ्य करणे माझ्यासारख्या क्षुद्राला कसे शक्य आहे? कदाचित वीस वर्षांमागे ज्या वेळी मी पन्नास हजार सैन्याचा अधिनायक होतो त्या वेळी या क्षुद्राला तुमची योग्य ती तैनात राखता आली असती. पण सरदार, येथे जे आहे ते सर्वस्वी आपल्या सेवेसाठीच आहे. माझ्या हृदयावर पाऊल ठेवून आत येण्याची या धूलिकणावर कृपा करावी" तो म्हणाला.
तो थोडा हसला व आत जाण्यासाठी वळला तेव्हा वृद्धाने त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला थांबवले व हलक्या पण अगदी रोकड आवाजात म्हटले,
"पण कमरबंदामध्ये नाणी आहेत ना? नाहीतर फुकट खाणार्यापिणार्यांसाठी मी येथे चार पहिलवान बाळगून आहे! बदाम फोडल्याप्रमाणे ते हातापायांचे सांधे मोडू शकतात, हा त्यांचा सर्वात किरकोळ गुण आहे!"
यावर तर तो मोठ्याने हसला. त्याने एक नाण्यांची पिशवी काढली व वृद्धापुढे खुळखुळवली. वृद्धाचा चेहरा उजळला.
======================================
अभिप्राय
इंद्रराज पवार
इंद्रराज पवार · गुरुवार, 4 Nov 2010 - 15:44
खूप्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प सोप्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प
पहिल्याच ओळीवरून ओळखलं !!!!!! ही कथा जर मला तुम्ही मध्यरात्री डोक्यावर थंड पाण्याची बादली ओतून न पाहता म्हणायला लावली तरी अचूकपणे म्हणेन....इतकी भिनली आहे.
विरोप केला आहेच.
इन्द्रा
वेदश्री
वेदश्री · Fri, 5 Nov 2010 - 08:22 · उत्तर
उत्तर प्रच्चंड सोप्पं आहे कारण उत्तर तर ओपन सिक्रेट आहे! :-)
सागर
सागर · Fri, 5 Nov 2010 - 08:48 · उत्तर
ही तर तुझी या लेखकाची सर्वात आवडती श्टोरी हाय नव्हं ;)
तुझ्याबद्दल खात्रीच होती. चला यानिमित्ताने का होईना तू पुन्हा वेचा या प्रांगणात अवतरलीस हेही नसे थोडके :)
श्रावण मोडक
श्रावण मोडक · गुरुवार, 4 Nov 2010 - 16:59
पास. वाचलेलं नाही.
सागर
सागर · गुरुवार, 4 Nov 2010 - 18:22 · उत्तर
कधी कधी सचिन तेंडुलकर पण शून्यावर आऊट होतो त्यातलाच हा प्रकार दिसतोय.
श्रामो हे पुस्तक तुमच्यासारख्या दर्दी वाचकाच्या वाचकातून सुटणे अवघड आहे. पण तुम्हालाच खात्री आहे म्हटल्यावर मी काय बोलणार? ;)
वेचा ओला असतानाच इंद्रराज यांनी अगदी बरोब्बर ओळखले आहे. त्यांचे अभिनंदन :)
अनपेक्षितपणे (पुस्तकविश्वसाठी) नवीन खेळाडू योग्य पथावर आहे. ज्योति कामत यांनी लेखक बरोबर ओळखला आहे. पुस्तकाच्या नावाची वाट बघत आहे :)
वेदश्री
वेदश्री · Fri, 5 Nov 2010 - 08:26 · उत्तर
>पण तुम्हालाच खात्री आहे म्हटल्यावर मी काय बोलणार?
काय बोलणार काय? अरे कधी नव्हे तो बरा सापडलाय जाळ्यात.. सडकव की उभा-आडवा-तिरपा हव्वा तसा! :P
सागर
सागर · Fri, 5 Nov 2010 - 09:08 · उत्तर
श्रामोसाठी अजून एक संकेत दिला आहे.
हे पुस्तक न वाचलेल्यांनाही आता लेखक व त्या अनुषंगाने पुस्तक ओळखता यावे :)
वेदश्री
वेदश्री · Fri, 5 Nov 2010 - 08:15 · उत्तर
>पास. वाचलेलं नाही.
पास काय डोंबल??!!! अशाने 'पामरा, सोन्यासारख्या आयुष्याचं पार मातेरं केलंस!' अशा शब्दांत संभावना होऊन नापास होशील यमसदनी.. त्यामुळे अगदी लगोलग युद्धपातळीवर वाचायला घे हे पुस्तक. आणि हो रे.. वाच'च' हे पुस्तक.. नाहीतर उगाच यमाने आमची नको बिनपाण्याची करायला, दोस्त असूनही श्रावणला इत्तकेही कसे सांगितले नाही तुम्ही म्हणून!
टण्या
टण्या · गुरुवार, 4 Nov 2010 - 21:03
अरे नुसत्या उपमांवरुनदेखील ओळखू शकाल की लेखक कोण आहे. आणि ज्याला लेखक कळला त्याने हे वाचले नसण्याची शक्यताच नाही :)
वेदश्री
वेदश्री · Fri, 5 Nov 2010 - 08:16 · उत्तर
+१०००००....
वेदश्री
वेदश्री · Fri, 5 Nov 2010 - 08:21
इतका सोपा वेचा विचारल्याबद्दल तीव्र निषेध! :) उत्तर नाही देणार...
सागर
सागर · Fri, 5 Nov 2010 - 08:55 · उत्तर
श्रामो सारख्या खंद्या फलंदाजाची विकेट ज्याने घेतली तो वेचा सोपा कसा असू शकतो?
तू हे पुस्तक अलिकडे वाचले म्हणून तुझी चंगळ आहे असे बोलायची ;)
सर्वांनाच येईल असे नाही....
मला उत्तर विरोपाने न पाठवणार्यांचा निषेध करायचा अधिकार मला पण आहे म्हटलं :P
श्रावण मोडक
श्रावण मोडक · Fri, 5 Nov 2010 - 12:31
कसला सचिन आणि कसलं काय? माझ्या वाचनाविषयी तुमचे घोर गैरसमज आहेत राव. उलट फार वाचन नाही म्हणून तर इथं आलो, भाग घेतोय. आता अजून जीए काहीही वाचलेले नाहीत (म्हणजे अपवाद बहुदा एखाद्या संग्रहाचा, जो आता लक्षातही नाही - म्हणजे त्या वाचनाला अर्थ नाही) यावरून समजून घ्या. एक आहे - काही मोजकी खूपच चांगली, दमदार पुस्तकं न चुकता वाचलेली आहेत. पण म्हणून सचिन थोडाच होणार. कुंबळेही एखाद्या वेळी शतक मारू शकायचाच. तसंच हे. ;)
सागर
सागर · Fri, 5 Nov 2010 - 14:06 · उत्तर
>>>> काही मोजकी खूपच चांगली, दमदार पुस्तकं न चुकता वाचलेली आहेत.
मग हे कसे राहिले श्रामो ;)
इस्किलार तर जी.एं.च्या कलाकृतीचा शिरोमणी आहे
श्रावण मोडक
श्रावण मोडक · Fri, 5 Nov 2010 - 17:31 · उत्तर
कारण आहे ना. मी काही पुस्तके वाचली आहेत. सर्व नाही. त्यामुळं अशी काही राहिली असणारच. :(
सागर
सागर · Sat, 6 Nov 2010 - 10:13 · उत्तर
असे होतेच श्रामो. सगळी चांगली पुस्तके वाचनात आलेली असतातच असे नाही
मी ही त्याला अपवाद नाहिये. माझी पण कित्येक पुस्तके वाचायची राहिली आहेत
जसे एका स्टुडिओचे आत्मचरित्र, झोंबी, एम टी आयवा मारु, एका मुंगीचे महाभारत, राजा रविवर्मा, एकोणिसावी जात, मुंबई दिनांक, किरण नगरकरांचे रावण आणि एडी, ब्र, ईव्हन गोनीदांचे पडघवली, प्रकाशवाटा, समिधा, अगदी आनंदी गोपाळ सुद्धा.
याव्यतिरिक्त खूप वर्षांपूर्वी वाचलेली अनेक पुस्तके आहेत जी काहीच आठवत नाहीत व पुन्हा वाचायची आहेत
जसे रारंगढांग, आहे मनोहर तरी, युगान्त, व्यासपर्व, राऊ, छावा, मृत्युंजयही... :) व अनेक आहेत