ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे ते... - ५५

निवांत पोपट

मजकूर

तिनं एका छोट्या टाचणीनं मला टोचलं होतं पण एका क्षणात माझा फ़ोफ़ावलेला राग मला एकटं सोडून गेला.मला काही गोष्टी समजतच नाहीत.त्या घडत असताना मी बघतो.डोळे उघडे ठेवून.त्यांच्याबरोबरचा क्षुल्लक,असंबध्द विनाकारण तपशील मी टिपून घेतो.सगळं आठवतं मला. जसं घडलं तसं.पण आतापर्यंत लागेबांधे नसलेल्या,संकोचात गुरफ़टून बसलेल्या,त्या एका घटनेला अचानक वाचा फ़ुटते. इतक्या दिवसाची वांझॊटी, कुणाच्या न मध्यात विधवा मग सतिसावित्रीच्या संकटासारखी बोकाळते.माझ्या नकळत तो सारा काळ तिनं असंख्य परिणाम होऊ घातलेले असतात. ती स्वत:चा एक स्वतंत्र संदर्भ निर्माण करते आणि माझ्या साय्रा जीवनाला त्याच्यात गुंतवते.

.......................
हातात जळती मशाल घेतलेल्या डीप सी ड्रायव्हर सारखं मला वाटलं.मशालीचा प्रकाश विक्षिप्त होता.तो तुला जसा दूरदूरवर प्रकाशित करत होता तसाच मला भस्मसात करून शांत करत होता.प्रत्येक श्वासाबरोबर भरती आली आणि मी तुझ्याबरोबर उचलला गेलो.आकाश मोकळं होतं. दूर उंच उंच अनुस्वारासारखा मी पक्षी बनलॊ.माझे स्तब्ध पंख हवेच्या भरलेल्या झोक्याबरोबर तरंगत होते. मग मी पंख मिटले आणि सारी पृथ्वी मला भेटायला मी खाली वेगानं येत असताना वर वर उचंबळली.स्पर्श होता न होताच तू मागं सरत गेलीस.मला आणखीन उंच अंतराळात जावं लागणार होतं.मी उरफ़ाटा होऊन झेप घेताना तु माझ्याबरोबर अचानक आलीस.सारं जग एका मिठीत.पार्वतीनं शंकराला घातलेल्या विळख्यात.सहज ताण तुटले आणि आपल्या दोघांच शुध्द तालात रुपांतर झालं.आपल्यापासून पसरत पसरत ह्या तालाची लाट जगाच्या उराला चाटून येत होती.मुक्ती, मुक्ती, मुक्ती.सारं आकाश मुक्त झालं आणि सागराच्याबरोबर तुझ्यात आणि माझ्यात सामावलं.

....................................

संकेत म्हणून दोन वेचे दिले आहेत.हे कॊडे श्री इंद्रराज ह्यांच्यासाठी नाही हे मला माहीत आहे तसे इंद्रराज ह्यानाही माहीत आहे. असेच सागर ह्यांच्याबाबतीत पण म्हणता येईल.बाकी त्यांनी मत द्यायला हरकत नाही.

एक संकेत....

श्री इंद्रराज ह्यांनी एका संस्थळावर ह्या पुस्तकाच्या लेखकाच्या परिचयाचा अतिशय सुंदर लेख लिहिला आहे.

अभिप्राय

सागर

सागर · Sat, 13 Nov 2010 - 10:07

माझ्याबद्दलचा उल्लेख करुनच मोठा संकेत दिला हो निपो ;)

असो.. वेचा छान आहे :)

रोचीन

रोचीन · Sat, 13 Nov 2010 - 12:14 · उत्तर

उल्लेख म्हणजे सु. शिं. चं पुस्तक आहे का??

निवांत पोपट

निवांत पोपट · Sat, 13 Nov 2010 - 12:31 · उत्तर

नाही.हे सु. शिं. चं पुस्तक नाही.
सागर आणि इंद्रराज ह्यांचा उल्लेखाला त्यांच्या आणि माझ्यामधील वैयक्तिक चर्चेचा संदर्भ आहे.

सागर

सागर · Sat, 13 Nov 2010 - 12:40 · उत्तर

मी सुशिंचा फॅन आहे यात शंका नाही. पण माझे बाकीचेही वाचन आहेच. आणि निपो यांनी माझा आणि इंद्राचा उल्लेख करुन चर्चेची आठवण करुन दिली म्हणूनच तो संकेत मानला मी :)

वेच्यात मुक्ती हा शब्द अनेकदा आला आहे म्हणून सुशिंचे मुक्ती (वाचलेले नसल्यास) असण्याची दाट शक्यता वाटते. पण लेखनशैली सुशिंची नाही हे पण लगेच कळते

सागर

सागर · Sat, 13 Nov 2010 - 19:55 · उत्तर

निपो ने चांगलाच चकवणार्‍या वेच्यांची निवड केली आहे.
माझ्या अतिशय आवडीच्या पुस्तकांपैकी एक असूनही साफ चकलो :(
ट्युब थोडी उशीरा पेटली

न वाचलेल्यांना ओळखता येणारच नाही याची पक्की खात्री :)

निवांत पोपट

निवांत पोपट · Sat, 13 Nov 2010 - 20:12 · उत्तर

त्या पुस्तकाचा जास्तीत जास्त लोकांना परिचय व्हावा एवढ्याच एकमात्र हेतूने मी त्या पुस्तकातील वेच्यांची निवड केली आहे.
असो एक संकेत देत आहे.
श्री इंद्रराज ह्यांनी एका संस्थळावर ह्या पुस्तकाच्या लेखकाच्या परिचयाचा अतिशय सुंदर लेख लिहिला आहे.

सागर

सागर · Sun, 14 Nov 2010 - 09:53 · उत्तर

ह्यॅ..ह्यॅ..ह्यॅ.. :)

आता लहान पोरगं पण ओळखेल ;)

अशा लेखकांच्या कलाकृती विस्फोटकच असतात :D

इंद्रराज पवार

इंद्रराज पवार · Sat, 13 Nov 2010 - 10:48

माझा इतका मोठा गौरव वाचून मी भारावलो असेच म्हणेन.....जरी मी त्याला पात्र नसलो तरी !!!
वेचा कशातील आहे हे मला माहित आहे.

इन्द्रा

सागर

सागर · Sat, 13 Nov 2010 - 11:58 · उत्तर

..जरी मी त्याला पात्र नसलो तरी !!
असेच म्हणतो ;)

श्रावण मोडक

श्रावण मोडक · Sat, 13 Nov 2010 - 13:34

­आण­खी ­एक 'न वाचलेले' पुस्तक बहुदा.

श्रावण मोडक

श्रावण मोडक · Tue, 16 Nov 2010 - 05:08 · उत्तर

ही मात्र बेक्कार विकेट गेली. वाचलेले ­(­­आणि संग्रहातील­) पुस्तक. पण ­उतारा ­असा की हे काही किरण नगरकर शैलीतील वाटलेच नाही. म्हणजेच नगरकर पुन्हा वाचावे लागतील असं दिसतंय... :­)­

निवांत पोपट

निवांत पोपट · Sun, 14 Nov 2010 - 10:56

श्री. वल्ली यांनी उत्तर दिले आहे.वल्ली यांचे अभिनंदन.
कोड्याचे उत्तर आहे सात सक्कं त्रेचाळीस-किरण नगरकर

सागर

सागर · Sun, 14 Nov 2010 - 11:04 · उत्तर

निपो... पुस्तक पण जोडून टाक मित्रा :)

रोचीन

रोचीन · Tue, 16 Nov 2010 - 05:25

वाचलेले नाहि त्यामुळे ते ओळखणे शक्य नव्हतेच.
@सागर,
>>माझे बाकीचेही वाचन आहेच
यात मला काहीच शंका नाही. पण हे ही तितकेच खरे आहे कि इथे सु. शिं. चे तुम्हीच सगळ्यात जास्त फॅन आहात म्हणून मला वाटलं की सु.शि. असावेत!!:)
असो. या निमित्ताने काय काय आणि किती वाचायचे राहीले आहे त्याचि मात्र सतत जाणिव होत रहाते!!! :)

सागर

सागर · Tue, 16 Nov 2010 - 09:06 · उत्तर

मी सुशिंचा फॅन आहे हे खरेच आहे. :)

या निमित्ताने काय काय आणि किती वाचायचे राहीले आहे त्याचि मात्र सतत जाणिव होत रहाते!!!

अगदी अगदी :) मलाही असेच वाटत राहते....

चर्चा प्रकार