ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे ते... - ५९

निवांत पोपट

मजकूर

परंतु अलीकडे मात्र तिला पुर्णपणे नवी अशी एक उदास अस्वस्थता स्पर्श करू लागली होती.कधी तरी तिला एकदम अतिशय थकवा वाटे व त्याच्या दडपणाखाली तिला खिळून गेल्यासारखे वाटे.मनात एखादा विचार चमकून जाई; पण तो काय,कसला हे मात्र तिला समजत नसे.तो वाढू लागला तर स्पष्ट करता येत नसे.सतत नजरेपुढे येत राहून तिने आपल्याला गोंजरावे,आपल्याशी बोलावे,आपल्याला प्रवेश द्यावा,अशी सतत विनवणी करण्याय्रा अनेक नव्या,अपरिचित कल्पना तिच्या भोवती फ़िरत.परंतु ह्या परक्या माणसांशी बोलायचे म्हटले तरी तिला परवलीचे शब्द माहीत नव्हते.एखादा विचार म्हणजे केवळ आभास नसून ती एक सत्य वस्तू असते.शब्द म्हणजे तिची वस्त्रेच असे मानता येईल.ती एखाद्या नवबालेप्रमाणे विनयशील आहे. अनुरूप वस्त्राखाली तिची नग्नता झाकल्याखेरीज तिच्याकडे कुणालाच पाहता येणार नाही.नाहीतर ती अत्यंत भयभीत होऊन दूर पळून जाईल व मग अंधार होताच परत येऊन बालिश,बारीक आवाजात रूदन करत राहील.प्रथम हा शोकस्वर उमगणारही नाही.पण नंतर मनावर त्याचे सतत आघात होऊ लागले की मात्र तिचे कवच आणि तिचा ध्वज असलेले चित्र शब्द निर्माण करून आपण तिचे समाधान करतो.

ही एक अनूवादीत कादंबरी आहे.तिचे अनुवादक आहेत मराठीतील एक श्रेष्ठ लेखक.मराठी साहित्यातील त्यांच्या योगदाना इतकेच त्यांचे अनुवादक म्हणून कार्य अतिशय श्रेष्ठ आहे.जाणकारांना लेखक ओळखायला अडचण येणार नाही कदाचित,पण पुस्तकाविषयी मात्र मला शंका आहे. कारण ? ? ………
… कारण देत नाही. नाहीच कुणी ओळखले तर दुवा म्हणून सांगेन.

अभिप्राय

निवांत पोपट

निवांत पोपट · Sat, 4 Dec 2010 - 16:40

वरील पुस्तक कोड्याचे उत्तर श्री मुक्तसुनीत यांनी अगदी ताबडतोब दोन प्रयत्नात दिले आहे.तसेच श्री वल्ली ह्यांनी सुध्दा लेखक ओळखले आहेत.
श्री ऋषिकेश ह्यांनी संकेत मागीतला आहे. संकेत म्हणून ह्या पुस्तकाच्या लेखकाविषयी सांगायचं झालं तर एवढंच सांगता येईल की त्यांच्याविषयी संकेत द्यावा लागेल असं मला अजिबात वाटलं नव्हतं, एवढे हे लेखक पुस्तकविश्वाच्या सभासदांचे आवडीचे आहेत. एका कोड्यामधे त्यांचा पुस्तकाचा धागा येउन गेला आहे.
मी धाग्यात उल्लेख केलेला संकेत सांगणं म्हणजे ह्या पुस्तकाचे आणि ओघाने वाचकांचे दुर्दैव सांगणं आहे. गेली कित्येक वर्षे हे अतिशय सुंदर पुस्तक बाजारात उपलब्ध नाही. मी मात्र सुदैवी आहे, कारण हे पुस्तक माझ्याजवळ आहे…...
तर ओळखा तुमच्या आवडत्या लेखकाचे बाजारात अनेक वर्षे आउट ऑफ़ प्रिंट असलेले अनुवादित पुस्तक!

इंद्रराज पवार

इंद्रराज पवार · Sat, 4 Dec 2010 - 19:17

आज दिवसभर इकडे नसल्याने हा धागा व वेचा पाहिला नाही. पण ठीक आहे. व्य.नि. केला आहेच.

इन्द्रा

चित्रा राजेन्द्र जोशी

चित्रा राजेन्द… · Tue, 1 Mar 2011 - 12:05

हा वेचा खूपच छान आहे. इतरांपर्यंत पोचवण्यासाठी विचारांना शब्दांचे वस्त्र चढविणे..... शब्दांचं मह्त्त्व इतक्या सुंदर कल्पनेतून सांगितलेलं आहे!
आता दोनेक महिने उलटून गेले आहेत. आतातरी
सर्वांच्या आवडत्या लेखकाचे बाजारात अनेक वर्षे आउट ऑफ़ प्रिंट असलेले अनुवादित पुस्तक!
ह्या पुस्तकाचे नाव व लेखक सांगा... सांगा ....... सांगाच...........

श्रावण मोडक

श्रावण मोडक · Tue, 1 Mar 2011 - 18:02

विकेट पडली. वाचलं आहे. पण पार विसरलो.

चर्चा प्रकार