- Log in to post comments
"शंकराचार्यांनी म्हटलं आहे की, त्या वरच्या पातळीवर ईश्वर नाहीच. त्यांनीच वेगवेगळी स्तोत्रही लिहिली. काय सुंदर संस्कृत भाषा आहे त्यांची. अप्रतिम. शंकराचार्यांइतकं सुंदर, सौष्ठवपूर्ण संस्कृत कुणालाच लिहिता आलेलं नाही. त्यांनी देवीवर''सौंदर्यलहरी' हे काव्य लिहिलंय. देवीच्या प्रत्येक अवयवाचं अतिशय सुंदर वर्णन केलंय. कुणी त्याला अश्लील म्हणून शकतो. बघणार्याची दृष्टी जशी असेल तसं श्लील किंवा अश्लील ठरतं. आपल्याला ते अश्लील वाटत नाही; चावट दृष्टीला ते अश्लील वाटेल."
***
म्हणलं तर सोप्पं आहे. बर्याच लोकांना ओळखू यावं अशी अपेक्षा आहे.
***
संकेत १ : खरं तर संकेत देणं कठीण आहे. अगदी छोटासाही संकेत पुरेल खरं तर. बर्याच लोकांनी हे पुस्तक वाचलेलं आहे याची खात्री आहे. पण तरीही सांगतो. महाराष्ट्राच्या साहित्यिक इतिहासातील एक वजनदार आणि चतुरस्त्र संचार असलेले नाव. बरीच वर्षे हे नाव केवळ साहित्यिकच नव्हे तर एकंदर समाजात 'कन्सायन्स कीपर'चे काम करणारी व्यक्ती या वेच्याची लेखक (का उद्गाता?) आहे.
अभिप्राय
वल्ली
वल्ली · Mon, 6 Dec 2010 - 05:11
संकेत हवाच बिकाशेठ.
ऋषिकेश
ऋषिकेश · Mon, 6 Dec 2010 - 05:29
सगळे सोप्पं सोप्पं म्हणतात आणि मला तर बर्याचदा जवळपासही जाता येत नाही ;) तेव्हा ह्या सोप्पं ला निग्लेक्ट करून संकेत मागतो आहे. (तो दिल्यावरही येईल असे वाटत नाही :( )
इंद्रराज पवार
इंद्रराज पवार · Mon, 6 Dec 2010 - 08:17
मी हे पुस्तक पाहिले आहे....वाचलेले नाही, त्यामुळे अगदी छातीठोकपणे नसले तरी अंदाज व्यक्त करू शकतो की 'त्या' पुस्तकातील वेचा श्री.बि.का. यानी दिला आहे.... व्य.नि. केला आहे.
इन्द्रा
निवांत पोपट
निवांत पोपट · Mon, 6 Dec 2010 - 08:27
काहीतरी संकेत पाहिजेच.नाहीतर ओळखणे अवघड आहे.
नंदन
नंदन · Mon, 6 Dec 2010 - 09:20
वाचल्यासारखा वाटतो आहे, पण पुस्तकाबद्दल खात्री नाही. व्यनि केला आहे.
बिपिन कार्यकर्ते
बिपिन कार्यकर्ते · Tue, 7 Dec 2010 - 07:05
पुस्तक - ऐसपैस गप्पा : दुर्गाबाईंशी
लेखिका - प्रतिभा रानडे