- Log in to post comments
संकेत: गरज पडली तर देईन. या वेच्याला विजेते मिळणे अवघड नसावे :)
संकेत १ : ह्या पुस्तकाने महाराष्ट्राच्या भूगोलावर परिणाम करणार्या एका महत्त्वाच्या घटनेला स्पर्शले आहे. (बहुदा हाच संकेत पुरेसा ठरावा :) )
संकेत न देताही वल्ली यांनी पुस्तक ओळखले आहे. तेव्हा या कोड्याचे प्रथम विजेते आहेत वल्ली.
दुसरा विजेता मिळाला :)
रोचीन ने हे पुस्तक अचूक ओळखले आहे. अर्थात लेखकाच्या नावात थोडा घोळ झालाच तिचा. पण पुस्तकाचे नाव अचूक सांगितले आहे.
चला उत्तर जाहीर करतो आहे.
उत्तरः
पुस्तकाचे नावः खंडाळ्याच्या घाटासाठी
लेखिका: शुभदा गोगटे
वेच्याची पुस्तकातील जागा: पान क्रमांक १६१ आणि १६२
मूल्य : १५० रुपये (पेपरबॅक द्वितीय आवृत्ती, भारत बुक हाऊस ने प्रकाशित केलेली)
एकूण पृष्ठसंख्या : ४६६
हे पुस्तक आहेच इतके सुंदर की वाचले असेल तर संकेताची गरजच पडणार नाही. वेच्यातील व्यक्तीरेखा ही केंद्रस्थानी असलेले पात्र आहे. त्यामुळे वाचले असणार्यांना संकेताची गरज पडणार नाही.
वेचा:
--------------------------------------------
लग्नासाठी १०-१५ दिवसांची रजा काढायला आण्णांनी नारायणला सांगितलं होतं. त्याप्रमाणे नारायणनं पंधरा मार्चपासून तीस मार्चपर्यंत रजा हवी असल्याचं स्मिथला सांगितलं. त्यावर अक्षरानंही चौकशी न करता, स्मिथनं त्याला रजा मिळणार नाही म्हणून सांगितलं.
"पण सर...."
"नो बट्स. यू आर नॉट गेटींग एनी लीव्ह." असं फटकारुन स्मिथ तिथून निघूनच गेला.
दोन दिवस थांबून नारायणनं पुन्हा स्मिथला गाठलं आणि सांगितलं.
"सर, आय अॅम गेटिंग मॅरिड ऑन ट्वेंटिथर्ड ओफ धिस मंथ"
स्मिथनं त्याच्याकडे रोखून पाहिलं आणि विचारलं,
"सो?"
"सर मला रजा पाहिजे लग्नासाठी"
"मी तुला सांगितलं आहे की रजा मिळणार नाही"
"सर, पण माझं लग्न आहे."
"मग त्याला मी काय करु?"
"लग्नासाठी बाहेरगावी जायचं आहे. सर, प्लीज मला आठ दिवस तरी रजा द्या."
"सध्या काम खूप आहे. कोणालाही रजा मिळणार नाही"
"रजेशिवाय लग्नाला कसं जाता येईल मला?"
"देन डोण्ट मॅरी. मॅरी व्हेन यू गेट लीव्ह अँड डोन्ट आस्क मी अगेन, आयॅम वॉर्निंग यू"
स्मिथनं असा दम भरल्यावर नारायण स्तंभित होऊन काही वेळ तसाच उभा राहिला
स्वतःच्या लग्नासाठीसुद्धा स्मिथ रजा मंजूर करत नव्हता!
आता काय करायचं? लग्न तर पंधरा दिवसांवर येऊन ठेपलं होतं. नारायणनं त्याची अडचण घरी सांगितली तेव्हा सगळेच काळजीत पडले. लग्नासाठीसुद्धा रजा मिळत नाही, अशी कशी ही नोकरी?
त्यापेक्षा एखाद्या पेढीवर कारकुनाचं काम काय वाईट? आता तरी नारायणनं ही हलक्या दर्जाची नोकरी सोडून द्यावी आणि एखादी कारकुनाची जागा मिळते का ते बघावं असं रमाबाई आणि भागीरथीबाईंनी बोलून दाखवलं.
आण्णांनी मात्र नारायणला सांगितलं,
"स्मिथ नाही म्हणतो तर तुझ्या लुईस साहेबाला का नाही सांगत तुझी अडचण? त्यांनी तुझी रजा मंजूर केली तर स्मिथ साहेबालाही नाईलाजाने का होईना, मंजुरी द्यावी लागेल."
--------------------------------------------
अभिप्राय
दूरदर्शी
दूरदर्शी · Mon, 3 Jan 2011 - 15:27
वाचले नाहिये पण वाचायला आवडेल हे पुस्तक
ऋषिकेश
ऋषिकेश · Tue, 4 Jan 2011 - 04:19 · उत्तर
असंच म्हणतो
वल्ली
वल्ली · Tue, 4 Jan 2011 - 04:07
व्यनि केला आहे रे. उत्तर बहुतेक बरोबरच असणार. :)
सागर
सागर · Tue, 4 Jan 2011 - 08:30 · उत्तर
या कोड्याचे विजेते आहेत वल्ली :)
वल्ली
वल्ली · Tue, 4 Jan 2011 - 04:13
वेचा खूपच छान निवडलास. हे पुस्तक तर प्रत्येकाने वाचलेच पाहीजे असे आहे.
सागर
सागर · Tue, 4 Jan 2011 - 12:57 · उत्तर
हे पुस्तक तर प्रत्येकाने वाचलेच पाहीजे असे आहे.
इंद्रराज पवार
इंद्रराज पवार · Tue, 4 Jan 2011 - 13:09 · उत्तर
"भूगोल" या जादाच्या संकेताच्या आधारे आठवण्याचा प्रयत्न करत होतो, पण आता लेखिकेचे नाव वाचल्यावर लक्षात आले की कितीही प्रयत्न केले असते तर हे पुस्तक नजरेसमोर येणे शक्यच नव्हते. कारण शुभदा गोगटे यांचे कोणतेच पुस्तक वाचलेले नाही. पण असो, ज्याअर्थी 'वेचा' द्यावा असे सागर याना वाटले त्या अर्थी हे पुस्तक तितकेच महत्वाचे आणि चांगले असणार. वाचनखूण म्हणून ठेवतो.
श्री.वल्ली आणि रोचीन यांचे वाचन किती प्रगल्भ आहे हेच त्यांचे विजेतपद सिद्ध करते. अभिनंदन.
इन्द्रा
सागर
सागर · Tue, 4 Jan 2011 - 13:15 · उत्तर
इंद्रराज,
हे कथानक खंडाळ्याच्या घाटाभोवती फिरते. इंग्रजांच्या काळात मुंबईला किती महत्त्व होते हे तुम्ही जाणताच. पण दळणवळण करण्यात येणार्या अडचणीवर मात करण्यासाठी इंग्रजांनी सह्याद्रीला गवसणी घालायचे ठरवले. त्यातून निर्माण झाला तो खंडाळ्याचा घाट. या घाटाच्या निर्मितीच्या भोवती फिरणारे हे कथानक सुरेख चितारलेले आहे. मी ही शुभदा गोगटेंचे हेच एकमेव पुस्तक वाचलेले आहे.
हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट
सांग चेडवा दिसता कसो खंडाळ्याचो घाट
असे सुंदर गाणे निर्माण करणार्या गीतकारांनाही खंडाळ्याच्या घाटाने मोहीनी घातली नसती तर नवलच.
इंद्रराज हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा. एक अफलातून अनुभव मिळेल याची मी खात्री देतो. :)
रोचीन
रोचीन · Wed, 5 Jan 2011 - 05:00 · उत्तर
वाचन प्रगल्भ ????
मेघना किंवा नंदनला टाकायची खरड चुकुन मला की काय???
वल्ली
वल्ली · Wed, 5 Jan 2011 - 06:11 · उत्तर
हेच म्हणतो.
इंद्रराज पवार
इंद्रराज पवार · Wed, 5 Jan 2011 - 06:31 · उत्तर
अरेरे !! काय दिवस आले आहेत....या रोचीनला आणि वल्ली यांना त्यांच्या चौफर वाचनाबद्दल कौतुकाचे विशेषण वापरले तर त्याबद्दल मला कॉफी देण्याऐवजी माझ्यावरच डोळे वटारत आहेत.
इन्द्रा
सागर
सागर · Wed, 5 Jan 2011 - 07:25 · उत्तर
इंद्रराज,
हे पुस्तक नक्की वाचा. पुस्तक वाचल्यावर तुमची नक्की अशीच अवस्था होईल की अरेरे हे पुस्तक कसे सुटले? ;)
खंडाळ्याच्या घाटासाठी च्या वाचनासाठी एक गरमागरम नेसकॅफे माझ्याकडून :)
सागर
सागर · Tue, 4 Jan 2011 - 13:04
या कोड्याचे प्रथम विजेते आहेत वल्ली आणि दुसरी रोचीन
तेव्हा उत्तर जाहीर करतो आहे.
हे सर्वांग सुंदर पुस्तक सर्वांनी अवश्य वाचावे असेच आहे.
ऋषिकेश
ऋषिकेश · Tue, 4 Jan 2011 - 18:16
वेच्याने चकवा दिला.. मी हे पुस्तक ५-६ वर्षांपूर्वी वाचले आहे पण आता विसरलो :(
पुस्तक अप्रतिम आहेच... एका बैठकीत वाचल्याचे आठवते
सागर
सागर · Wed, 5 Jan 2011 - 07:28 · उत्तर
पुस्तक अप्रतिम आहेच... एका बैठकीत वाचल्याचे आठवते
माझीही अशीच अवस्था झाली होती. सुंदर पुस्तक आहे.मी अगदी एका बैठकीत नाही पण दोन दिवसांतच संपवले. कारण आदल्या दिवशी रात्री ११ ला घेतले वाचायला, त्यामुळे एका बैठकीत नाही संपवता आले. १२ पर्यंत वाचले मग पुढचे दुसर्या दिवशी. :)
वल्ली
वल्ली · Wed, 5 Jan 2011 - 07:47
अवांतरः
अश्या मोठ्या प्रकल्पाभोवती गुंतलेल्या अजून काही कादंबर्या वाचायला नक्कीच आवडतील. अश्या काही चटकन नजरेसमोर येतात. त्या म्हणजे-
१. आम्ही भगीरथाचे पुत्र- गो.नी. दांडेकर - भाक्रा नांगल धरणावरील कादंबरी
२. रारंगढांग - प्रभाकर पेंढारकर - हिमालयीन रस्ता बांधणीवर आधारीत कादंबरी.
तर अश्या अजून काही कादंबर्यांची पुविचे सदस्य नक्कीच देउ शकतील.
सागर
सागर · Wed, 5 Jan 2011 - 08:19 · उत्तर
श्रामो चे तिढा ... नर्मदा प्रकल्पावर
अजून वाचायचे आहे मला. या महिन्यात वाचून होईन :)
वल्ली
वल्ली · Wed, 5 Jan 2011 - 08:22 · उत्तर
मलाही वाचायचे आहे ते. आता घेईन लवकरच.