- Log in to post comments
संकेतः वाचले असेल तर गरज नाही ( खरेच गरज नाही पडली संकेताची :))
एकमेव संकेत - सदर लेखकास साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. आणि कोकण प्रांतावर अधिकाराने लिहितात
या वेच्याचे विजेते आहेत - इंद्रराज आणि वल्ली. :)
टण्या यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत त्यावरुन त्यांनी ओळखले आहे याची खात्री वाटते.
तेव्हा उत्तर जाहीर करतो आहे.
पुस्तकाचे नावः गारंबीचा बापू
लेखकः श्री.ना.पेंडसे
वेच्याचे पुस्तकातील स्थान : पान क्रमांक ८७ (२००९ च्या पुनर्मुद्रण आवृत्तीतील)
वेचा:
--------------------------
"मठ कुठं आहे?"
"तो पाहा कोपर्यांत?"
"ते उंचावरचं पांढरं घर?"
"हो"
"कोणी राहतं का तिथं?"
"बागलबुवा राहतात."
"थट्टा करतो आहेस की काय?"
"थट्टा नाही. खरंच. दुर्गेश्वरचे बागूल नांवाचे गृहस्थ आहेत. भूतवाडीला भिक्षा मागून तपश्चर्या करतात. तूं पाहिले नाहीस? रोज संध्याकाळी हाटेलवरुन जातात दुर्गेश्वरला."
"मी कुठचे पाहणार?"
"दाखवीन हं आज-आज नाही आतां-आज सारा दिवस व्याघ्रेश्वरालाच असतील. उद्यां आठवण कर."
"तपश्चर्या म्हणजे काय करतात?"
"करीत असतील अनुष्ठान. नाहीं तर दुसरं काहीं."
"मठ त्यांचाच का?"
--------------------------
एवढांच वेचा पुरेसा असावा :)
अभिप्राय
ऋषिकेश
ऋषिकेश · Fri, 7 Jan 2011 - 16:40
बहुतेक वाचलेले नाहि मात्र विषयाचा अंदाज आहे. व्यनी बघ
सागर
सागर · Sat, 8 Jan 2011 - 16:26 · उत्तर
ऋ,
अजून एक संकेत देतो
मला विरोपात ज्याबद्दल अंदाज वर्तवला आहेस त्याच्या अजून खाली घसर ;)
बहुतेक क्लू लागेल तुला :)
वल्ली
वल्ली · Sat, 8 Jan 2011 - 04:10
यावेळी अगदीच सोप्पे कोडे घातलेस रे.
व्यनि केला आहे.
वल्ली
वल्ली · Sat, 8 Jan 2011 - 04:14
आणि प्रथमदर्शनी उत्तर जरी सोपे वाटले तरी कोडे सोडवताना फसगत होउ शकते. इतकेही ते सोप्पे नाहीये.
सागर
सागर · Sat, 8 Jan 2011 - 16:25 · उत्तर
उत्तर चुकलेले आहे
पुढच्या प्रयत्नात वल्ली ओळखेलच
टण्या
टण्या · Sat, 8 Jan 2011 - 08:28
भूतवाडी-दुर्गेश्वर-व्याघ्रेश्वर हे तीन शब्द पुरेसे नाहीत का :)
सागर
सागर · Sat, 8 Jan 2011 - 16:22 · उत्तर
ट्ण्याभाऊ,
उत्तर माहिती आहे तर विरोपाने पाठवा की :)
अजून पर्यंत एकाचेही उत्तर बरोबर नाहिये
इंद्रराज पवार
इंद्रराज पवार · Sun, 9 Jan 2011 - 13:03
सागर....हुश्श....व्याघ्रेश्वर पावला....व्य.नि. केला आहे.
इन्द्रा
सागर
सागर · Sun, 9 Jan 2011 - 13:07 · उत्तर
वेच्याचे पहिले विजेते आहेत इंद्रराज
अभिनंदन इंद्रराज :)
बाकीच्यांकडून उत्तराची अपेक्षा :)
३ विजेते मिळाले की उत्तर जाहीर करेन
वल्ली
वल्ली · Mon, 10 Jan 2011 - 07:50
वेचा एकदम झकास निवडलास आणि त्यामुळेच सुरुवातीला पुस्तक अचूक ओळखू शकलो नाही. वेच्यातील 'मठा' मुळेच उत्तराची दिशा थोडीशी भरकटली. पण नंतर मात्र रिकव्हर होउ शकलो.
बाकी टण्यांच्या उल्लेखाप्रमाणे वेच्यातील संकेत एव्ह्ढे ठळक आहेत की उत्तर ओळखणे मुळीच अवघड जाउ नये. किमानपक्षी लेखक तर प्रत्येकाला ओळखू आलाच पाहीजे.
सागर
सागर · Mon, 10 Jan 2011 - 08:27 · उत्तर
लेखक तर प्रत्येकाला ओळखू आलाच पाहीजे.
म्हणूनच म्हटले होते की संकेताची गरज नाही पडणार :)
सागर
सागर · Mon, 10 Jan 2011 - 08:39
वेच्याचे उत्तर जाहीर केले आहे.
पुढील वेच्याची आता मी वाट बघतो आहे :)
वल्ली यांना पुढील वेचा देण्यासाठी विनंती केली आहे
वल्ली
वल्ली · Mon, 10 Jan 2011 - 08:44 · उत्तर
पुढचा वेचा देणे बहुतेक उद्या/ परवा शक्य होईल. घरी आंतरजालाची सुविधा नसल्याने हापिसातच एखादे पुस्तके घेउन जाणे व तिथेच टंकणे क्रमप्राप्तच आहे. तेव्हा यामधील काळात एखादा वेचा दुसर्या कुणाकडून आला तरी चालेलच.
सागर
सागर · Mon, 10 Jan 2011 - 09:05 · उत्तर
आज मी देऊ नाही शकलो वेचा तर तू प्लीज दे १-२ दिवसांत :)
वल्ली
वल्ली · Mon, 10 Jan 2011 - 09:09 · उत्तर
नक्कीच देइन १-२ दिवसांत.
इंद्रराज पवार
इंद्रराज पवार · Mon, 10 Jan 2011 - 20:45
सागर आणि वल्ली....तुम्ही दोघेही देऊ नका....मीच देतो, माझ्या डोक्यात या संदर्भात एक भन्नाट कल्पना आली आहे, तिचाच उपयोग करून कोडे इथे देतो.
इन्द्रा
वल्ली
वल्ली · Tue, 11 Jan 2011 - 05:33 · उत्तर
अरे व्वा इंद्रराज. वाट पाहतोय तुमच्या भन्नाट कोड्याची.
सागर
सागर · Tue, 11 Jan 2011 - 06:33 · उत्तर
वाट बघतो आहे इंद्रराज वेच्याची :)
ऋषिकेश
ऋषिकेश · Tue, 11 Jan 2011 - 04:27
छ्या! सपशेल फसलो :)
सागर
सागर · Tue, 11 Jan 2011 - 06:52 · उत्तर
वेचा थोडा फसवणारा होता खरा.
पण एवढे सोपे पुस्तक असेल असे वाटले नसेन ना तुला ऋ :)
यातच मज्जा असते
हा हा हा..