ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे ते... - ७०

वल्ली

मजकूर

वेचा:

आणि तिकडे पुलाखाली पोंब्या. स्वप्नात काय बघत असेल? मिथुन चक्रवर्तीसारखे आपणही सिनेमात नाचतो आहोत ते? आणि दु:खी डोळ्यांचा लहानसा दाम्या. हृदय पिळवटून टाकणारे सूर आपल्या बासरीतून काढणारा गंजू. सगळे आपापल्या झोपडीत, पुलाखाली झोपले असतील. आपल्या मेणचट झोपड्या उशाशी घेऊन. अर्धपोटी. उद्या सकाळी उठल्यावर पाऊस असो की ऊन असो, धोपट्या घेउन धंदा करण्याच्या आशेने स्टेशनांकडे पळत सुटतील. धंद्यातली कमाई दिवसेंदिवस कमीच होत राहणार-मग ही पोरं पुढच्या वर्षी काय करतील? त्याच्या पुढच्या वर्षी काय करतील? चोर्‍या करतील? की मटकेवाल्या, दारुवाल्यांच्या गँगमध्ये जातील? कुठे तरी जायलाच पाहीजे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

संकेत देण्याची आवश्यकता वाटत नाही गरज पडल्यास देईनच.
संकेत १. ही मुंबईच्या पार्श्वभूमीवरील कादंबरी आहे.
संकेत २. मुंबईतल्या गरीब मुलांच्या व्यवसायाची पार्श्वभूमी या कादंबरीला लाभलीय. ठळक शब्दांवरून अंदाज बांधा.
संकेत ३. लेखकांनी एकदा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही भूषवले होते.

इंद्राचे अभिनंदन. त्यांनी पुस्तक अचूक ओळखले आहे. पाठोपाठ सागर ने लेखक ओळखूनही पुस्तक मात्र भगीरथ प्रयत्नांतीच ओळखले. तेव्हा त्याचे अभिनंदन. :)

पुस्तक दोघाजणांकडून ओळखले गेल्यामुळे आता उत्तर जाहीर करत आहे.

पुस्तकः झिपर्‍या
लेखकः अरूण साधू
पान नं. ११४

अभिप्राय

ऋषिकेश

ऋषिकेश · Tue, 8 Feb 2011 - 10:30

पास.. म्हणजे वेचा पास.. मी नापास

वल्ली

वल्ली · Tue, 8 Feb 2011 - 10:37 · उत्तर

हे काय रे ऋ, तू नेहेमीच पास देतोस. प्रयत्न तर करा जरा. उत्तर मिळेल. संकेत देत आहेच.

ऋषिकेश

ऋषिकेश · Tue, 8 Feb 2011 - 11:51 · उत्तर

अरे काय करणार.. इतकं वाचन नाही माझं :(

मात्र तुही संकेत असा दिला आहेस की त्यातून ही कादंबरी आहे ही एकमेव माहिती मिळते.. मुंबईत घडते हे परिच्छेदावरून कळतेच आहे.:P

वल्ली

वल्ली · Tue, 8 Feb 2011 - 10:50 · उत्तर

उत्तर चुकलेय रे मित्रा. आता त्या लेखकाच्या इतर पुस्तकांतून अचूक उत्तर दे.

सागर

सागर · Tue, 8 Feb 2011 - 10:58 · उत्तर

त्यामुळे ओळखायला सोपे पडेन... उत्तर देतो आहेच तुला.

इंद्रराज पवार

इंद्रराज पवार · Tue, 8 Feb 2011 - 11:37

वेच्यातील वर्णनानुसार कादंबरी मुंबई (आणि त्यातही झोपडपट्टी वातावरण...) शहराशी निगडित आहे हे तर स्पष्टच आहे. तरीही जयवंत दळवी यांची 'चक्र' वा मधु मंगेश कर्णिक यांची 'माहिमची खाडी' नव्हेच....कारण वेच्यात असलेले 'मिथुन चक्रवर्ती' हे नाव, जो या दोन्ही कादंबरी काळात अस्तित्वातच नव्हता.

'शांताराम' मधील असेल का याचा कानोसा घेणार होतो, पण श्री.वल्ली यानी श्री.सागर याना दिलेली 'हिंट' वाचली, म्हणजे लेखकाची अनेक पुस्तके आहेत....आणि ग्रेगरी रॉबर्टसचे तर ते एकमेव [मुंबई विषयावर]....त्यामुळे तोही नाद सोडला आहे.....तरीही धांडोळा घेत आहेच.

इन्द्रा

वल्ली

वल्ली · Tue, 8 Feb 2011 - 12:40 · उत्तर

बरोबर आहे तुमचे म्हणणे लेखक दळवी वा कर्णिक नाहीतच.
अजून संकेत दिलेले आहेतच त्यावरून उत्तर शोधणे फारसे अवघड जाउ नये.

इंद्रराज पवार

इंद्रराज पवार · Tue, 8 Feb 2011 - 12:49

ओळखली असे वाटते....व्य.नि. केला आहेच.

इन्द्रा

वल्ली

वल्ली · Tue, 8 Feb 2011 - 12:58 · उत्तर

आता उत्तर अचूक ओळखल्यामुळे मी इंद्रराजांनी विनंती करतो की पुढचा वेचा त्यांनी द्यावा.

इंद्रराज पवार

इंद्रराज पवार · Tue, 8 Feb 2011 - 14:24 · उत्तर

थॅन्क्स वल्ली. पण तसे पाहिल्यास मी कौतुकास तितकासा पात्र नाही...कारण किमया केली ती तुम्ही ठळक केलेल्या "धोपट्या" या खुणेने....जिच्यावरून मी त्या कादंबरीकडे गेलो.

आणखीन एक....विजेत्याचे नाव घोषित करताना नावात "जी" देण्याचे काय प्रयोजन? उगाच मला अटलजी वाजपेयी यांचा निकटचा नातेवाईक असल्याचे भासले. तेव्हा संपादित होत असेल तर प्लीज ते जी संबोधन काढून टाकावे ही विनंती.

पुढचा वेचा देईन.

इन्द्रा

वल्ली

वल्ली · Tue, 8 Feb 2011 - 15:05 · उत्तर

नक्कीच. पण तुम्ही ही कादंबरी वाचली आहे का? वाचली असेल असेच गृहीत धरतोय. नसेल वाचली तर जरूर विकत घ्याच.

सागर

सागर · Tue, 8 Feb 2011 - 13:37

ओळखलं आहे.
(तशी शक्यता कमीच आहे) तरी पण उत्तर चुकले असेन तर मग पासच म्हणेन.
आधीच लक्षात यायला हवे होते खरे तर :(
असो... पण वेचा छान निवडलास मित्रा...

चर्चा प्रकार