- Log in to post comments
".....मद्याचा परवाना मिळवण्यासाठी मी सरकारी इस्पितळातील त्या डॉक्टरना जाऊन भेटलो. त्यानी माझे वजन, उंची, जिभेचा रंग तपासला; ठराविक नमुन्याच्या अर्जात मी माहिती भरली. 'तुम्हाला मद्य प्यायला आवडतं का?' असं त्यानी विचारलं. काहीसं लाजत मी 'होय' म्हटलं. तेव्हा त्यानी अर्जात 'अल्कोहोल घेण्याची सवय आहे' असं लिहिलं. मला नीट झोप लागते की, रात्री मध्येच जाग येते नि बेचैन वाटते? असं त्यानी विचारलं. पण मी काही उत्तर देण्याच्या आधीच त्यांनी लिहिलं, 'निद्रानाशाचा विकार'. पुढचा प्रश्न होता, 'माझ्या कामात खूप लक्ष केंद्रित करण्याची व कल्पकतेची गरज आहे काय?' त्यांनी अर्जावर लिहिलं., "सृजनात्मक कार्य!"
~~ या वेच्यासाठी वेगळा संकेत देण्याची आवश्यकता असेल असे मला वाटत नाही, कारण मजकुरातच लेखकाचे एक ठळक वैशिष्ट्य आहेच आहे.
~~ तरीही हे एका 'आत्मचरित्रा'तील उतारा आहे...इतपत सांगतो....आणि हे ज्याचे आत्मचरित्र आहे ती व्यक्ती इथल्या प्रत्येक सदस्याच्या ओळखीची/माहितीची आहे.
जादाचा संकेत ~ श्री.सागर आणि श्री.वल्ली यानी केलेल्या प्रयत्नानंतर जादाच्या संकेताची गरज भासत आहे असे दिसते. तर तो देत आहे : हे एक अनुवादित आत्मचरित्र आहे. पण असे असले तरी मूळ लेखक प्रत्येक मराठी माणसाला माहीत आहे.....आणि त्या व्यक्तीवर आपण प्रेमही तितकेच करतोय.
चौथा संकेत ~ लेखक महाराष्ट्रीयन नाही हे तर वर आलेच आहे....तरीही ज्यादाचा आणखीन् एक संकेत ~ यांची ओळख या देशातील सर्व भाषिकांना आहे....त्यामुळेच ते सर्वानाच "आपले' वाटतात.
श्री.सागर....आणि पुस्तक ही अशी एक विलोभनीय सांगड आहे की, वेचा देताना मनी आलेच होते की बाकी कुणी नाही तरी 'सागर' हे पुस्तक आणि लेखक ओळखणारच ! ~ सो, प्रथम विजेते श्री.सागर....अभिनंदन
श्री.सागर यांच्यापाठोपाठ आत श्री.वल्ली यानीही पुस्तक आणि लेखक ओळखले [त्यामुळे त्यानी 'हुश्श...' केलेले मला इथे ऐकू आले आहे.]...अभिनंदन.
दोन सदस्यांनी पुस्तक ओळखले असल्याने ते जाहीर करीत आहे : "लक्ष्मणरेषा" ~ मूळ लेखक आर.के.लक्ष्मण, अनुवादक श्री.अशोक जैन
इन्द्रा
अभिप्राय
वल्ली
वल्ली · गुरुवार, 10 Feb 2011 - 05:47
वेच्याची निवड अगदी उत्कृष्ट केलीत इंद्रराज. लेखकाच्या वैशिष्ट्याविषयी थोडा गोंधळ होतो आहे.
इंद्रराज पवार
इंद्रराज पवार · गुरुवार, 10 Feb 2011 - 05:53
थॅन्क्स....'जरा हटके....' पद्धतीचा वेचा आहे....आणि कथा किंवा कादंबरीतील नाही हेही मुद्दाम स्पष्ट केलेले आहेच. पण ज्या व्यक्तीचे हे आत्मचरित्र आहे ती व्यक्ती सर्वाना 'आपलीच' वाटते.
इन्द्रा
सागर
सागर · गुरुवार, 10 Feb 2011 - 06:31
वेचा छोटासाच आहे पण नक्कीच चक्रावणारा आहे.
कारण लेखकाच्या एका वैशिष्ट्याकडे निर्देश झाला असला तरी प्रत्यक्षात लेखकाचा अंदाज बांधणेही अवघड पडते. त्या लेखकाची एखादी कलाकृती असेन तर अंदाज घेता येतो, पण आत्मचरित्रात प्रकटन असते तेव्हा लेखनशैली तीच असली तरी कित्येकदा परिचित वाटणार नाही असे लेखनही त्याच शैलीच्या लेखकाकडून होते.
वेचा छान निवडलाय एवढे नक्की.
अंदाज विरोपाने पाठवला आहे, पण अजून संकेताची गरज वाटते आहे.
वल्ली
वल्ली · गुरुवार, 10 Feb 2011 - 09:28
अजून एखादा संकेत लागेलच इंद्रराज. बरेच तर्कवितर्क करून झालेत.
इंद्रराज पवार
इंद्रराज पवार · गुरुवार, 10 Feb 2011 - 09:58
ज्यादाचा आणखीन् एक संकेत दिला आहे.....आता 'वेचा' अवघड वाटणार नाही याची खात्री आहे.
इन्द्रा
रोचीन
रोचीन · गुरुवार, 10 Feb 2011 - 11:18
:)
वल्ली
वल्ली · गुरुवार, 10 Feb 2011 - 11:44 · उत्तर
अगदीच तोकडा संकेत आहे.
इंद्रराज पवार
इंद्रराज पवार · गुरुवार, 10 Feb 2011 - 11:48 · उत्तर
अरेच्या....तोकडा? अहो मी एकदा नाही तर दोनदा मोजला...चांगला मैलभर तरी लांब आहे असे दिसते.
तरीही वर चौथा संकेत देतो.....त्यावरून तर थेट तुम्ही त्याच्या दारातच पोचू शकाल.
इन्द्रा
सागर
सागर · गुरुवार, 10 Feb 2011 - 12:04 · उत्तर
मी दारात पोहोचलो का बघा...
पुस्तक मात्र वाचले नाही अजून हे
अहो इंद्रराज प्रतिक्रियांमध्ये सुद्धा किती संकेत देता तुम्ही ;)
वल्ली
वल्ली · गुरुवार, 10 Feb 2011 - 14:09 · उत्तर
मी अजूनही पोहोचलो नाही ब्वा.
इंद्रराज पवार
इंद्रराज पवार · गुरुवार, 10 Feb 2011 - 15:09
आता बाकी मला श्री.सागर आणि श्री.वल्ली यांचे वैतागाने फुललेले चेहरे दिसू लागले असल्याने एक प्रकारचा 'क्रूर' आनंद होत आहे. आज रात्री ट्राय करा....नाहीतर उद्या सकाळी आणखीन् एक सॉलीड संकेत देत.
रोचीनला देखील उपयोगी होईल.
इन्द्रा
सागर
सागर · गुरुवार, 10 Feb 2011 - 15:23 · उत्तर
प्रतिक्रियांमधून इल्ला असे कानडी शब्द वापरुन भुलवणारे संकेत देता राव तुम्ही...
कोणी पण भंजाळेल ;)
विदेशी अनुवाद नसावा एवढीच अपेक्षा करतो ;)
इंद्रराज पवार
इंद्रराज पवार · गुरुवार, 10 Feb 2011 - 15:37
"...विदेशी अनुवाद नसावा एवढीच अपेक्षा करतो ...."
~ नक्कीच नाही. वर कित्येक ठिकाणी मी असे म्हटलेच आहे की, प्रत्येक (सुशिक्षित) भारतीय नागरिकाला 'ते' नाव माहीत आहे....विदेशी व्यक्तीच्या आत्मचरित्राचे इतपत कौतुक मूठभराना असते.
उद्या प्रथम अनुवादकाचे नाव जाहीर करतो...जादाचा संकेत म्हणून...त्यावेळी कदाचित तुमच्या विचाराला चालना मिळेल.
इन्द्रा
इंद्रराज पवार
इंद्रराज पवार · गुरुवार, 10 Feb 2011 - 17:31
ग्रेट सागर.....मला माहीत होतेच की पुस्तक शोधून काढल्याशिवाय हा गृहस्थ झोपी जाणारच नाही.
ओळखले पुस्तक आणि लेखक....! अभिनंदन.
आता श्री.वल्लीही ओळखतीलच.
इन्द्रा
वल्ली
वल्ली · गुरुवार, 10 Feb 2011 - 18:06
हयात असलेली तरीही लोकप्रिय असणारी, आपलीशी वाटणारी ही व्यक्ती कोण ब्वा?
ऋषिकेश
ऋषिकेश · Fri, 11 Feb 2011 - 04:53 · उत्तर
व्यक्ती अजूनही हयात आहे? मग नाहि माहित ब्वॉ :(
वल्ली
वल्ली · Fri, 11 Feb 2011 - 06:09
कालची रात्र वेच्याचे उत्तर न मिळाल्यामुळे अस्वस्थतेतच गेली आता तरी एक शेवटचा संकेत द्या.
इंद्रराज पवार
इंद्रराज पवार · Fri, 11 Feb 2011 - 07:13 · उत्तर
"....आता तरी एक शेवटचा संकेत द्या....!
~ ठीक आहे. आणखीन् एक संकेत ~ अनुवादक 'अशोक जैन' आहेत. यावरून तुम्ही ओळखू शकाल असे वाटते.
[सागर यानी अनुवादकाचे नाव जाहीर करण्यापूर्वीच अचूक ओळखले आहे !]
इन्द्रा
सागर
सागर · Fri, 11 Feb 2011 - 07:20 · उत्तर
वेचा असा गोंधळवणारा होता आणि त्यात इंद्रराज यांनी प्रतिसादात इल्ला हा कानडी शब्द वापरून माझी दिशाभूल केली त्यामुळे माझी गाडी भैरप्पांकडे आपसूकच पहिल्यांदा गेली होती. पण तिथे भिंत आडवी आली आणी डोके आपटल्यावर मग शांत डोक्याने विचार केल्यावर तेवढे एकच नाव समोर आले :)
पण समाज प्रबोधन करणार्या या महान व्यक्तीचे हे आत्मचरित्र मी वाचलेले नाहिये.
या निमित्ताने एका चांगल्या पुस्तकाची ओळख (खरे तर आठवण) झाली.
इंद्रराज तुम्हाला मनापासून धन्यवाद
हे पुस्तक आता नक्की वाचेन. वाचायच्या यादीत अॅडवले आहे :)
वल्ली
वल्ली · Fri, 11 Feb 2011 - 08:44
एकदाचे ते अवघड कोडे सुटले. मला या वेच्याची उत्तरे देता देता 'गडदेच्या बहिरी' वेच्याच्या वेळी इंद्रराजांची झालेली अवस्था आठवली. उत्तर न देता आल्यामुळे निद्रानाशाच्या दु:खाचा अनुभवही घेता आला. :) शेवटी एकदाचे उत्तर मिळाले. वेच्याची निवड एकदम झकास. पुस्तक तर विकत घेणारच आहे.
यानिमित्ताने 'सागर' ही किती दिग्गज वाचक आहे हे पुन्हा एकदा कळून आले.
सागर
सागर · Fri, 11 Feb 2011 - 09:48 · उत्तर
यानिमित्ताने 'सागर' ही किती दिग्गज वाचक आहे हे पुन्हा एकदा कळून आले.
हा हा हा... फार तर शोधक म्हण रे मित्रा. हे पुस्तक वाचलेलेच नाहिये तरी उत्तर शोधू शकलो ;)
वल्ली
वल्ली · Fri, 11 Feb 2011 - 14:39
लक्ष्मणरेषा या नावाची २ पुस्तके दिसतात. एक काकोडकरांचे तर दुसरे अशोक जैनांचे वेच्यातील. योग्य ती दुरुस्ती अपेक्षित आहे.
इंद्रराज पवार
इंद्रराज पवार · Fri, 11 Feb 2011 - 14:48
"...एक काकोडकरांचे तर दुसरे अशोक जैनांचे वेच्यातील..."
~ होय....मीही पहिल्यांदा जे 'लक्ष्मणरेषा' आले त्यावर माऊसले आणि उत्तर प्रकाशित केले. पानावर चन्द्रकांत काकोडकर असे लेखकाचे नाव दिसल्यावर हबकलोच. घाईघाईने 'संपादन' प्रक्रिया....जी सुदैवाने हयात होती...केली आणि योग्य ते नाव्/दुरुस्ती केली आहे. पण मुखपृष्ठ येत नाही....तरी हरकत नाही....आपला कार्यभार तर झाला.
इन्द्रा
वल्ली
वल्ली · Fri, 11 Feb 2011 - 14:53 · उत्तर
मुखपृष्ठ मदतनीसांनी संमत केल्यावर येईलच.