- Log in to post comments
हे एक अनुवादित आत्मचरित्र आहे. आत्मचरित्र लेखक हे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उच्चपदस्थ व्यक्ती होते. 'कखग' या व्यक्तीला 'भारता'च्या इतिहासातील सर्वात महत्वाच्या राजकारण्यांपैकी एक असे गणता येईल.
--
[कखग] आणि मी त्यांच्या निवडणुकीची टाऊन हॉल आणि उमरखाडी अशी जी दोन मतदानकेंद्रे होती त्यापैकी टाऊन हॉल मतदानकेंद्रावर होतो. ... ... एक वाजण्यापूर्वीच आपल्या भारी किंमतीच्या बंद गाडीमधून मिसेस [कखग] जेवणाचा डबा घेऊन खाली उतरल्या आणि [कखग] ना म्हणाल्या, "'[के]' (त्या [कखग] ना '[के]' असे संबोधित असत) 'काय आणलय ओळखा तुमच्यासाठी!" [कखग] म्हणाले, "मला कसे ओळखता येईल?" तशा त्या म्हणाल्या, "तुमच्यासाठी छान हॅम (डुकराच्या मासाचे) सँडविचिस आणले आहेत!" ते ऐकून [कखग] एकदम दचकले आणि म्हणाले, ''अरे बापरे! ... ... मी निवडणुकीत हरावे असे तुला वाटते?"
मिसेस [कखग] चा चेहरा पडला होता. ... ... माझ्याकडे वळून [कखग] मला म्हणाले, "आपण कोठेतरी जाऊन खाऊन येऊ या!" टाऊन हॉलपासून फारसे दूर नसलेल्या कॉर्नेलिया या सुप्रसिद्ध हॉटेलात आम्ही गेलो. ... ... मी म्हणालो की, "येथे पोर्क सॉसेजिस चांगले मिळतात." तेव्हा [कखग] नी कॉफी, पेस्ट्री आणि पोर्क सॉसेजिस मागवले.
... ... आम्ही कॉफी आणि सॉसेजिस यांचा समाचार घेत असताना एक दाढीवाला मुसलमान साधारण दहा एक वर्षांच्या मुलाला घेऊन तेथे आला. ... ... त्या मुसलमान गृहस्थासाठी चहाचा कप आणि मुलासाठी थंडपेय [कखग] नी ताबडतोब मागवले. मुलाचे हातमात्र प्लेटमध्ये ठेवलेल्या सॉसेजिसकडे जात होते. जरा घुटमळून त्याने सॉसेजिसपैकी हळूच एक उचलला, तो तोंडात घातला आणि तो खाऊ लागला तसा तो त्याला फार आवडला असावा असे त्याच्या चर्चेवरून मला वाटले. मी अस्वस्थ मनाने भीतभीतच हे सारे पाहात होतो. ते निघून गेल्यावर [कखग] माझ्याकडे वळले आणि रागाने मला म्हणाले, "[आत्मचरित्र लेखक], तुम्हाला लाज वाटली पाहिजे." मी म्हणालो, "मी काय केले?" [कखग] म्हणाले, "त्या मुलाला तुम्ही सॉसेजिस घेऊ दिलेत कसे?" मी म्हणालो, "हे पहा, याबद्दल माझ्या मनाला चटकन् निर्णय घ्यावा लागला. प्रश्न होता तो असा की तुम्ही निवडणूक हरावी की त्याला नरकात जाऊ द्यावे? मी अर्थातच तुमच्या बाजूने निर्णय घेतला!"
अभिप्राय
सागर
सागर · Sat, 12 Mar 2011 - 11:37
कखग ने उत्कंढा वाढवली आहे
अनुवादित म्हणजे विचार करायला लावणारे आहे.
थोडा संकेत आवश्यक आहे. कारण भारताच्या सर्वात महत्वाच्या राजकारण्यांपैकी एक असे कित्येक नेते आहेत.
स्पिन डॉक्टर
स्पिन डॉक्टर · Sat, 12 Mar 2011 - 13:00 · उत्तर
स्पिन डॉक्टर
स्पिन डॉक्टर · Sat, 12 Mar 2011 - 14:27
चित्रा राजेन्द्... यांनी पहिल्याच प्रयत्नात उत्तर ओळखले आहे.
स्पिन डॉक्टर
स्पिन डॉक्टर · Sun, 13 Mar 2011 - 14:52 · उत्तर
देवेन्द्र प्रभुने यांनीही पहिल्याच प्रयत्नात उत्तर ओळखले आहे.
उद्या संध्याकाळी उत्तर जाहीर करेन.
सागर
सागर · Sun, 13 Mar 2011 - 08:39
चांगलाच चक्रावणारा वेचा दिसतोय :(
आतापर्यंतचे सर्व अंदाज धुळीला मिळाले
जबरदस्त कोडे घातले आहे यावेळी तुम्ही हे मान्य केलेच पाहिजे
सागर
सागर · Sun, 13 Mar 2011 - 18:00
एकतर खूप सोपे कोडे असेन की ज्याची शक्यता गृहीत धरली जात नसेन किंवा मग खरेच कठीण असावे.
कोणते पुस्तक असेन याची उत्सुकता मात्र लागून राहिली आहे.
मी अनुवादित पुस्तकांचा तसा चाहता आहे. पण हे पुस्तक वाचनातून सुटले असावे.
इंदिरा गांधींचे पुपुल जयकर यांचे अशोक जैनांनी अनुवादित केलेले पुस्तक आहे माझ्याकडे. तेवढे एकच राजनितीक नेत्याचे अनुवादित पुस्तक कदाचित माझ्याकडे असावे. :(
वल्ली
वल्ली · Mon, 14 Mar 2011 - 09:06
अजून एकाद्या संकेताची गरज आहे. त्याशिवाय कोडे सोडवणे अवघडच आहे.
स्पिन डॉक्टर
स्पिन डॉक्टर · Mon, 14 Mar 2011 - 10:48 · उत्तर
कखग = महंमद अली जीना. (त्यांची पत्नी त्यांना 'जे' असे संबोधित असे.)
भारत या शब्दाभोवती अवतरणचिन्हे दिली होती :D
--
ज्यांनी नंतर सोबत सोडली असे त्यांचे जुने मुस्लिम सहकारी शोधल्यास लेखकाचे आणि पुस्तकाचे नाव समजू शकेल.
वल्ली
वल्ली · Mon, 14 Mar 2011 - 13:57
जिनांवरची काही अलीकडची 'जीना' हे जसवंत सिंग यांचे तसेच 'कायदेआझम' हे आनंद हर्डीकरांचे ही पुस्तके मराठीत प्रसिद्ध आहेत. पण आत्मचरित्र कोणते ते मात्र ध्यानात येत नाही.
सागर
सागर · Mon, 14 Mar 2011 - 16:29 · उत्तर
जसवंत सिंग यांचे तसेच 'कायदेआझम' हे आनंद हर्डीकरांचे
ही दोन्ही असणे शक्य नाही कारण
जसवंत सिंग अजून हयात आहेत
आणि आनंद हर्डिकरांचे पुस्तक स्वतंत्र आहे.
लेखक आणि जीना दोघेही गेल्या शतकात निवर्तले असल्याचा संकेत आधीच वाचला होता म्हणून ही दोन्ही पुस्तके मी उत्तर देण्याआधीच वगळली होती
पण जसवंतसिंग यांचे पुस्तक वाचायची खूप इच्छा आहे. ते जास्त चांगले असावे.
शीर्षक: शिशिरातले गुलाब
लेखक: एम सी छगला
अनुवादक: वि वा पत्की
ही तिन्ही नावे १००% अपरिचित आहेत मला :(
कधी ऐकलीच नाही ही नावे. ना शिशिरातले गुलाब, ना छगला आणि ना पत्की :( घोर अज्ञान :(
वल्ली
वल्ली · Mon, 14 Mar 2011 - 17:29 · उत्तर
एम सी छगला यांनी जीनांवर पुस्तक लिहिल्याचे अतिशय अंधुक आठवत होते पण नेमके ध्यानी येत नव्हते. छगला हेच भारताचेमाजी सरन्यायाधीश होते ना?
शिवाय छगलांचे पुस्तक मराठीत अनुवादित झाले आहे हेच माहिती नसल्याने त्या दिशेने प्रयत्नच केला नाही.
अभिनंदन स्पिडॉ. यावेळचा वेचा अतिशय अवघड, गुंगवून टाकणारा व चक्रावणारा दिलात.
त्याबरोबरच चित्रा व देवेंद्र यांचेही खास अभिनंदन. ते किती दर्दी वाचक आहेत हे त्यांनी सिद्ध केले आहे.
सागर
सागर · Tue, 15 Mar 2011 - 13:42 · उत्तर
चित्रा व देवेंद्र यांचेही खास अभिनंदन. ते किती दर्दी वाचक आहेत हे त्यांनी सिद्ध केले आहे.
:)
चित्रा राजेन्द्र जोशी
चित्रा राजेन्द… · Tue, 15 Mar 2011 - 15:43
वल्ली, सागर, स्पिडॉ.
तुमच्यासारख्या दर्दी वाचकांच्यात सामील होता आल्यामुळे `पुवि'करांचे मनापासून धन्यवाद!
पूर्वी नोकरीत असताना काही training programs केले होते. अशा ठिकाणी वेगवेगळ्या पुस्तकांचे संदर्भ मिळत असतात. त्यावेळी वरील पुस्तकाचा संदर्भ मिळाला होता व तो मी मनात टिपून ठेवला होता.
त्यानंतर ते पुस्तक मिळवायचा असफल प्रयत्नदेखील केला. आणि मग विसरून गेले.
गेल्या ६-७ वर्षांत खर्या अर्थाने वाचन सुरू झाले तेव्हा ह्या पुस्तकाची आठवण झाली. शोध घेऊनही ते कुठे मिळाले नाही. पण ते मनात होते हे ह्या कोड्यामुळे लक्षात आले. आणि आनंद झाला.
मित्रहो, मनात असे अजून काय काय साठलेले आहे ते यथावकाश तुम्हां सगळ्यांच्या सहवासात समजत / जाणवत राहील....
आपली सर्वांची पुस्तकमैत्री आणि वाचनप्रेम असेच अभंग राहो...............
सागर
सागर · Tue, 15 Mar 2011 - 17:46 · उत्तर
आपली सर्वांची पुस्तकमैत्री आणि वाचनप्रेम असेच अभंग राहो...............
खरे आहे चित्रा तुझे. अशी कित्येक पुस्तके असतात की जी त्यावेळी मनाने टिपून ठेवलेली असतात पण नंतर पुढील आयुष्यात काहीतरी कारणामुळे अचानक ते पुस्तक आठवते.
'पाडस' बद्दल माझे असेच झाले होते. कविता महाजन यांच्याशी फेसबुकावर बालसाहित्यावर सुसंवाद साधताना त्यांनी पाडस चे नाव घेतले आणि मला 'पाडस' कधी मिळवून वाचेन असे झाले होते. पुण्याला मागच्या वेळी आलो तेव्हा 'पाडस' माझ्या बॅगेत होते :)
चित्रा राजेन्द्र जोशी
चित्रा राजेन्द… · Tue, 15 Mar 2011 - 18:00
सागर,
गेले बरेच महिने मलाही `पाडस' वाचायचे आहे. पण.........
आता असे लक्षात येते की वाचावीशी वाटलेली पण अजूनही न वाचलेली अशा पुस्तकांची यादी वाचलेल्या पुस्तकांपेक्षा मोठ्ठी असेल!!!!!!!!!
सागर
सागर · Tue, 15 Mar 2011 - 18:11 · उत्तर
चित्रा,
जेव्हा आपल्याला वाटते की आपण बरेच वाचन केले आहे तेव्हा अशी पुस्तके समोर येतात की वाटते आपण काहीच वाचले नाही अजून :)
ऋषिकेश मुळे "साखरेचं बाळ" ची पण ओळख झाली आणि घेतल्याबरोबर वाचूनही झाले लगेच.