- Log in to post comments
आज माझी जगण्याची उमेद खालावली आहे. कर्तव्य अर्थशून्य वाटत आहे. जन्माला आलोच कशाला असा प्रश्न मला कधी पडला नाही. जगायचं तर जन्माला यायलाच हवं. पण मला नुस्तं जगवत नाही. वर्तमान जिवंत असला पाहिजे आपल्या साथीला. गतकाळच्या आठवणींवर जगायचं म्हणाजे नुस्ती दिवाळखोरी. आणि भविष्याच्या आशेनं दिवस काढायचे म्हणजे आणखी एक कर्जबाजार. न फेडता येणारी उधारी. जगत रहायचं आणि चालू घटकाप्रहर आंबून गेलेले पाहायचे. अशानं मला भांबावल्यासारखं होतं
ज्याचा वर्तमान संपला त्याचं आयुष्य संपलं. माझी चालू घडी दूषित झाली आहे. ती नकोशी झाली आहे.
‘अॅक्ट, अॅक्ट, अॅक्ट इन द लिव्हिंग प्रेझेंट’... होय, मी ‘अॅक्ट’च करीत आहे. अभिनय करीत आहे जगण्याचा. तो जितका चांगला साधेल तितका मी छान मेलेला असेन.
संकेत १: हा उतारा एका कादंबरीतील आहे
संकेत २: `निष्णात पुवि' करांना तो ओळखणे फारसे अवघड नाही...
जास्तीचे संकेत---
संकेत ३: लेखकाची ओळख व्यासंगी कादंबरीकार आणि समीक्षक अशी दुपेडी आहे.
संकेत ४: `ज्याने त्याने स्वत:लाच कौल लावावा अशी ही निरंतराची कथा आहे.'
शेवटचे संकेत.......
संकेत ५: ज्या कादंबरीतील हा उतारा आहे, ती कादंबरी, कादंबरी-त्रयीतील पहिली आहे.
संकेत ६: ही एक शोकांतिका आहे.
संकेत ७: लेखकाचे वडिल एका संस्थानिक राजाचे कारभारी व खाजगी सचिव होते. ह्याचा ह्या कादंबरी-लेखनाशी जवळचा संबंध आहे
लेखकाचे वडिल एका संस्थानिक राजाचे कारभारी व खाजगी सचिव होते. ह्याचा ह्या कादंबरी-लेखनाशी जवळचा संबंध आहे. पुस्तकाच्या मनोगतात ह्याविषयी लेखक त्र्यं.वि, सरदेशमुखांनी पुढील माहिती दिली आहे.
त्यांचे वडिल ज्या संस्थानिक राजाचे कारभारी व खाजगी सचिव होते, त्या राजच्या अपघाती मृत्युनंतर बाकीच्या दरबारी व्यक्तींनी त्यांना इतका त्रास दिला की शेवटी त्यांना ते गाव, संस्थान सोडून दुसरीकडे जावं लागलं. खूप लहान वयातील हा दाहक अनुभव ह्या कादंबरी-त्रयीच्या निमित्ताने उसळी घेऊन बाहेर पडला
अभिप्राय
वल्ली
वल्ली · Wed, 23 Mar 2011 - 09:42
अजून एखादा संकेत आवश्यक आहे.
सागर
सागर · Wed, 23 Mar 2011 - 13:36
संकेत २: `निष्णात पुवि' करांना तो ओळखणे फारसे अवघड नाही...
या संकेताचा मला काही उपयोग नाही. कारण मी निष्णात या सदरात मोडत नाही :(
सध्यातरी पास. वेच्याचा अंदाज येत नाहिये. बहुतेक हा लेखक माझ्यासाठी अपरिचित असावा असे दिसतेय...
बहुतेक इंद्रा, यशोधरा, मणिकर्णिका (कुठे अदृष्य झालीय? कळत नाही) , नंदन ( अजून १ अदृष्य पुस्तकप्रेमी) , दिगम्भा, चिंतातुर जंतु हे ओळखू शकतील असा माझा होरा आहे. अजून कित्येक निष्णात सदस्य आहेत जे अदृष्य आहेत. नाहीतर छान स्पर्धा बघायला मिळाली असती.
वल्ली
वल्ली · Wed, 23 Mar 2011 - 13:39 · उत्तर
'निष्णात' या शब्दातच एखादा संकेत लपला असेल काय?
सागर
सागर · Wed, 23 Mar 2011 - 13:43 · उत्तर
=)) =)) =)) =))
छान निरिक्षण मित्रा :)
सागर
सागर · Wed, 23 Mar 2011 - 18:13
पण ते नसावे असे वाटते आहे.
कारण उतारा कादंबरीतला आहे. आणि मी अंदाज आत्मकथनपर पुस्तकाचा केलाय :(
ते नसेन तर मग माझा पास.
उत्तराची आवर्जून वाट पाहीन.
देवेन्द्र प्रभुणे
देवेन्द्र प्रभुणे · गुरुवार, 24 Mar 2011 - 15:18
चित्राताई,
काही ठोस संकेत देउ शकाल का?
सध्या फक्त संदिग्धताच आहे.
-देवेन्द्र प्रभुणॅ,यवतमाळ.
वल्ली
वल्ली · Fri, 25 Mar 2011 - 03:54
आता माझाही पास.
सर्व प्रयत्न थकले. :(
चित्रा राजेन्द्र जोशी
चित्रा राजेन्द… · Fri, 25 Mar 2011 - 09:05
स्पिन डॉक्टर ह्यांनी कादंबरी त्रयी व लेखक बरोब्बर ओळ्खले आहे.
देवेन्द्र प्रभुने हे देखील उत्तराच्या जवळपास आहेत, त्यांनी लेखक बरोब्बर ओळ्खला.
परंतु कादंबरीचे नाव दोघांनीही वेगळे सांगितले..
`पुवि'मित्रहो,
ह्या कादंबरीतील एक उतारा ह्याआधी एकदा पुस्तककोड्यात येऊन गेलेला आहे. त्यामुळे त्याच कादंबरीतील हा दुसरा उतारा (माझा आवडता) ओळखणे त्यामानाने सोप्पे असेल असे मला वाटले. पण........
असो!!!!!!!!!!
वल्ली
वल्ली · Fri, 25 Mar 2011 - 09:39
उत्तर जाहीर झाल्यावर समजले की अजून कितीही संकेत दिले असते तरी हा वेचा ओळखणे माझ्या कुवतीबाहेरचेच होते. :(
बराच अवघड वेचा होता हा.
स्पिडॉ आणि देवेंद्र यांचे अभिनंदन.
सागर
सागर · Fri, 25 Mar 2011 - 12:24 · उत्तर
हे पुस्तक अजूनही वाचलेले नाहीये त्यामुळे वेचा ओळखण्याचा प्रश्नच नव्हता :(
स्पिन डॉक्टर आणि देवेंद्र यांचे उत्तर ओळखल्याबद्दल अभिनंदन... :)
चित्रा राजेन्द्र जोशी
चित्रा राजेन्द… · Fri, 25 Mar 2011 - 09:56
ह्यातील संकेत क्र. ४ : `ज्याने त्याने स्वत:लाच कौल लावावा अशी ही निरंतराची कथा आहे.'
हे वाक्य `डांगोरा एका नगरीचा' ह्या कादंबरी-त्रयीतील दुसरया कादंबरीतील आहे. (स्पिन डॉक्टर ह्यांनी हे लक्षात आणून दिले, त्यांचे मनःपूर्वक आभार. त्यांनी इतरही दोन उत्तम लेखांच्या लिंक्स पाठवल्या) परंतु ते त्या संपूर्ण त्रयीलाच लागू होणारे आहे, म्हणून संकेतात द्यावेसे वाटले.
ह्यामुळे कोडे ओळखताना कुणाची दिशाभूल झाली असल्यास क्षमस्व!!!!!!!