ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे?...८२

वल्ली

मजकूर

११ फेब्रुआरी. देसायांकडे जाउन आलो. त्यांनी बोकडदाढी वाढविली आहे. ज्वालाग्राही पदार्थ प्रकरणात पुरेसा पुरावा नसल्यामुळे त्यांना सोडण्यात आलं. त्यानंतर ते बिहारमध्ये गेले. तेथे अंडरग्राउंड राहून काम करीत होते. तेथले कार्य संपल्यावर परत मुंबईला आले. "अजूनही अंडरग्राउंडच का ?" साळसूदपणानं विचारलं. त्यांना ते आवडलं नाही.
त्यांना फक्त माझा प्रश्न आवडला नाही. मला सबंध देसाईच आवडेनासा झालाय. दांभिक लेकाचे.
त्यांना डेफ्थ आहे हे मान्य करतो. माणूस पॉलिश्ड आहे. गटस् ही असावेत. पण ते शिष्टपणाचा आव आणतात तो शिसारी आणणारा आहे. आपण समोरच्या माणसापेक्षा मोठे आहोत असं ही माणसं गृहीतच धरतात. मग उच्चासनावरून पामरांना दोन शब्द सांगावेत अशा थाटात बोलू लागतात. झक मारता तुम्ही.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
संकेत लागलाच तर उद्या देईनच.

संकेत १: लेखक मराठीतील सर्वश्रेष्ठ कादंबरीकारांपैकी एक असून ही एका वेगळ्याच धर्तीची कादंबरी त्यांनी लिहीली आहे.
संकेत २: दुसर्‍या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील चाळ जीवनाचे प्रत्ययकारी सूक्ष्म चित्रण या कादंबरीत केले गेले आहे.
संकेत ३. एखादी रोजनिशी असावी अश्या स्वरूपात ही कादंबरी लिहिली गेली आहे. कादंबरीतील वर्णन म्हणजे जणू काही झुळझुळत्या पाण्याबरोबर झुलणारे गवतच.

सागरचे अभिनंदन. वेच्याचा पहिला विजेता झाल्याबद्द्ल. दिगम्भा व पाठोपाठ मणिकर्णिका यांनीही उत्तर अचूक ओळखले आहे. तीन विजेते मिळाल्यामुळे उत्तर जाहीर करत आहे.:)

पुस्तक - लव्हाळी
लेखक - श्री. ना. पेंडसे

अभिप्राय

चित्रा राजेन्द्र जोशी

चित्रा राजेन्द… · गुरुवार, 31 Mar 2011 - 17:49

वल्ली,
कितीही संकेत मिळाले तरीही ह्या वेच्याची ओळख पटणे शक्य नाही....
फारच अवघड आहे ब्वा!!!

वल्ली

वल्ली · गुरुवार, 31 Mar 2011 - 18:47 · उत्तर

संकेत दिल्यावर तुम्ही असे म्हणणार नाहीत.
असो उद्या सकाळी संकेत देतोच.

चित्रा राजेन्द्र जोशी

चित्रा राजेन्द… · Fri, 1 Apr 2011 - 07:52

वल्ली,
हा वेचा कोणत्या पुस्तकात्तील आहे ते मला ओळखू येवो, न येवो, पण मला तो फार आवडला. कारण????
कारण देसायांचे स्वभाववर्णन नेमकेपणाने केलेले आहे. माझ्या माहितीत सेम टू सेम अश्शाच वर्णनाचा एक माणूस आहे आणि त्याच्यासमोर बोलता-वावरताना मलाही थेट अगदी अस्सेच वाटते ब्वा....
‘ते शिष्टपणाचा आव आणतात तो शिसारी आणणारा आहे‘’

सागर

सागर · Fri, 1 Apr 2011 - 10:33

लेखक ओळखला तरी त्यांचे नेमके ते पुस्तक ओळखणे एक दिव्यच आहे एवढी या महान कादंबरीकाराची ग्रंथसंपदा आहे :)

तरी प्रयत्न विरोपवला आहे.

वल्ली

वल्ली · Fri, 1 Apr 2011 - 10:40 · उत्तर

पुस्तकाबद्दलचा एक संकेत वेच्यातच खुबीने लपलेला आहे. लक्षात येताच उत्तर आपोआप मिळेल. :)

सागर

सागर · Fri, 1 Apr 2011 - 11:46 · उत्तर

नीट विचार केल्यावरच ह्या पुस्तकाचे नाव आठवले.

एवढे सहजा सहजी आठवणारे नाहीये. कारण हा महान कादंबरीकार जरी एक स्पेशालिटी बाळगत असला तरी त्याच्या अनेक गाजलेल्या कादंबर्‍या या आगळ्यावेगळ्या कादंबरीला झाकोळून टाकतात :)

बाकी वेच्याची निवड अतिउत्तम केलीस मित्रा.
आगळी वेगळी कादंबरी असूनही त्यात स्पष्ट संकेत मिळणारा वेचा दिलायेस :)

चित्रा राजेन्द्र जोशी

चित्रा राजेन्द… · Sat, 2 Apr 2011 - 15:27

वल्ली,
सागर, दिगम्भा, मणिकर्णिका.... तिचांचेही हार्दिक अभिनंदन!!!!!

श्री. ना. पेंडसे मी फारसे वाचलेले नाहीत. ह्या वेच्यामुळे मात्र `लव्हाळी' वाचावीशी वाटू लागली आहे एवढे नक्की .....
अशा प्रकारे (वेच्याद्वारे) एखाद्या कलाकृतीविषयी कुतूहल जागे होणे हे `पुवि' मुळे शक्य झाले.
समस्त `पुवि'करांचे मनःपूर्वक आभार!!!!!!!

सागर

सागर · Sat, 2 Apr 2011 - 17:23 · उत्तर

चित्रा,

श्रीनां ची खासियत म्हणजे कोकणाच्या पार्श्वभूमिवरच्या कादंबर्‍या.
तुंबाडचे खोत, गारंबीचा बापू, रथचक्र या सारख्या गाजलेल्या कादंबर्‍यांमुळे श्री.ना. साहित्यविश्वात खूपच प्रसिद्ध आहेत. तेव्हा या महान कादंबरीकाराची पुस्तके न वाचणे म्हणजे अप्रतिम साहित्याला मुकणे आहे.
तेव्हा चित्रा श्री. ना. पेंडसे नक्की वाच. एक अवर्णनीय आनंद मिळेल :)

चर्चा प्रकार