प्रकाशकाचि माहिति

देवेन्द्र प्रभुणे

मजकूर

मला वरिल पुस्तकाचे प्रकाशक आनि त्यान्च पत्ता हवा आहे.
क्रुपया मदत करा.(सिनेमाच्या स्तोरि मगिल गोश्ट)

अभिप्राय

मणिकर्णिका

मणिकर्णिका · Sun, 6 Feb 2011 - 06:06

देवेंद्र,
या पुस्तकाचं नाव नाही ऐकलेलं. मला माधव देशपांडे यांचं 'सिनेमाचा रंग वेगळा' माहीत आहे, जे आपल्या पुस्तकविश्वच्या पुस्तकांच्या यादीमध्ये सुद्धा आहे. आणि अभिजित देसाईंची जी पुस्तकं माहीती आहेत त्या पुस्तकांमध्ये हे पुस्तक नाहीये. वरच्या पुस्तकचे ऑथर अभिजित देसाई हे नक्की ना?

सागर

सागर · Sun, 6 Feb 2011 - 19:19

सिनेमाचा रंग वेगळा हे पुस्तक माधव देशपांडे यांचेच माहिती आहे. मणिकर्णिका म्हणते आहे ते बरोबर आहे
प्रकाशक : किर्ती प्रकाशन , कोल्हापूर (जे येथील पुस्तकात दिले आहे)

पत्ता काही मला मिळाला नाही. पण आपल्या येथील एक सन्मानीय सदस्य इंद्रराज पवार हे कोल्हापुरातलेच आहेत. तेव्हा तुम्हाला हवी ती मदत ते नक्की करतील असा विश्वास वाटतो :)

पण तुम्हाला जर पुढील पुस्तक हवे असेन तर ही घ्या माहिती
पुस्तक : शिणेमाच्या ष्टोरी'मागची गोष्ट
लेखक : अभिजित देसाई
प्रकाशक : राजा प्रकाशन, मुंबई
पत्ता : ( माझ्याकडे एक पुस्तक होते त्यात मिळाला म्हणून देऊ शकतो आहे :) )
राजा प्रकाशन,
सौ. शुभदा मुळे
२२५/३, पांडुरंग भुवन, लेडी जमशेटजी रोड,
शिवाजी पार्क, माहिम,
मुंबई - ४०० ०१६.
फोन : २४३००४०३

महाराष्ट्र टाईम्स वर हा एक सुंदर लेख बघायला मिळाला या पुस्तकावर

तुम्ही मुंबई किंवा पुण्यात रहात असाल तर हे पुस्तक मिळण्यात काहीच अडचण पडू नये.
पुण्यात रसिक साहित्य किंवा अक्षरधारा ला नक्की मिळेल

वल्ली

वल्ली · Mon, 7 Feb 2011 - 02:26 · उत्तर

जबरा रे सागर. तू तर कुठलेही पुस्तक सहज शोधून देउ शकतोस रे मित्रा.

इंद्रराज पवार

इंद्रराज पवार · Mon, 7 Feb 2011 - 09:26 · उत्तर

"...तुम्हाला हवी ती मदत ते नक्की करतील असा विश्वास वाटतो..."

~ जरूर सागर. खुद्द श्री.माधव देशपांडे हे आमच्याच परिसरात राहतात, शिवाय किर्ती प्रकाशनही.

मात्र दिसते असे की मूळ धागाकर्ते याना 'शिणेमाच्या ष्टोरी'मागची गोष्ट, लेखक : अभिजित देसाई' हेच पुस्तक हवे असणार असे त्यांच्या विनंतीतील भाषेवरून वाटते.

(बाय दे वे....मला 'सन्माननीय' सदस्याचा दर्जा दिल्याबद्दल एक गरमागरम नेसकॉफी...!)

इन्द्रा

सागर

सागर · Mon, 7 Feb 2011 - 09:27 · उत्तर

(बाय दे वे....मला 'सन्माननीय' सदस्याचा दर्जा दिल्याबद्दल एक गरमागरम नेसकॉफी...!)

हा हा हा

इंद्रराज तुमच्याकडून ही दुसरी नेसकॉफी
पहिली माळगांवकरांबद्दलची पेन्डींग आहेच :)

इंद्रराज पवार

इंद्रराज पवार · Mon, 7 Feb 2011 - 10:19

"....पहिली माळगांवकरांबद्दलची पेन्डींग आहेच....!"

~ नक्कीच....पण ती कॉफी 'सब्जेक्ट टु...' अटीवर आधारित आहे. कादंबरीवाचनानंतर "सुंदरी" बाबत दोनचार चांगले उदगार इथे प्रकट करणे तुम्हावर बंधनकारक आहे, हे लक्षात असू द्या.

इन्द्रा

सागर

सागर · Mon, 7 Feb 2011 - 11:53 · उत्तर

मी प्रिन्सेस आधी वाचणार आहे मगच तुम्हाला भेटणार आहे
तेव्हा त्या नेसकॅफे अगोदर अट मी पूर्ण केलेली असेन ;)

वल्ली

वल्ली · Mon, 7 Feb 2011 - 13:53 · उत्तर

मी ही तुमच्याबरोबर कॉफी घ्यायला आलो तर आपली काही हरकत नाही ना?

इंद्रराज पवार

इंद्रराज पवार · Mon, 7 Feb 2011 - 14:23 · उत्तर

जरूर....पण त्या अगोदर तुम्ही मनोहर माळगांवकर यांची Bend in the Ganges ही एक अतिशय सुंदर कादंबरी वाचली असल्याचे [आणि त्यातील नायिका 'सुंदरी'चे कौतुक....] स्टॅम्प पेपरवर लिहून देणे गरजेचे आहे....नोटरीच्या सहीशिक्क्यासह !!!!!

इन्द्रा

वल्ली

वल्ली · Mon, 7 Feb 2011 - 17:43 · उत्तर

अनुवाद मिळाला तर नक्कीच वाचेन. अनुवाद झालय का त्या कादंबरीचा?

इंद्रराज पवार

इंद्रराज पवार · Mon, 7 Feb 2011 - 19:10 · उत्तर

".....अनुवाद झालय का त्या कादंबरीचा?...."

~~ वेल, फार फार वर्षापूर्वी (आत्ता या क्षणी मला प्रकाशन वर्ष आठवत नाही...) श्री.ज.जोशी यांनी "....जिथे थबकली गंगामाई" या नावाने या कादंबरीचा फार देखणा अनुवाद केला होता असे माझे ज्येष्ठ सांगतात (अर्थात मला आजतागायत ही अनुवादित कादंबरी पाहायला मिळालेली नाही....). तरीही मूळ कादंबरीतील इंग्रजी भाषा अत्यंत ओघवती तसेच स्वातंत्र्यपूर्व पाचसहा वर्षापूर्वीची कहाणी सांगत असल्याने तुम्हाला ती इंग्लिश रचना अगदी घरगुती वाटेल असा माझा विश्वास आहे...शिवाय कथानकही १९४२ नंतरच्या कालखंडातील असल्याने नवखेही वाटण्याची सुतराम शक्यता नाही.

वल्ली....फार सुंदर कादंबरी आहे ही...अगदी नायिका 'सुंदरी' सारखी, तुम्ही तिच्या प्रेमातच पडाल...(आय मीन कादंबरीच्या..."सुन्दरी" च्या नको)...जरुर मिळवून वाचा....You wont regret !!!

इन्द्रा

सागर

सागर · Tue, 8 Feb 2011 - 09:22 · उत्तर

वल्ली मित्रा,

या सुंदरीचे इंग्रजीतून अवलोकन करायचे असेन तर माझ्याकडे इंग्रजी प्रत आहे.
तुला हवी असेन तर मी पुण्याच्या भेटीत घेऊन येईन.

वल्ली

वल्ली · Tue, 8 Feb 2011 - 09:28 · उत्तर

पण इंग्रजी वाचणे आम्हांला अंमळ जडच जाते तेव्हा अनुवाद मिळाला तर उत्तमच.

सागर

सागर · Tue, 8 Feb 2011 - 10:01 · उत्तर

त्यातल्यात्यात
पुणे मराठी ग्रंथालय आणि
नगर वाचन मंदीर इथे नक्की मिळेल असे वाटते

ऋषिकेश

ऋषिकेश · Tue, 8 Feb 2011 - 10:29 · उत्तर

पण इंग्रजी वाचणे आम्हांला अंमळ जडच जाते तेव्हा अनुवाद मिळाला तर उत्तमच.

+१
हे वल्ली आमच्यासारखेच दिसताहेत :)

सागर

सागर · Tue, 8 Feb 2011 - 10:42 · उत्तर

पण इंग्रजी वाचणे आम्हांला अंमळ जडच जाते तेव्हा अनुवाद मिळाला तर उत्तमच.

यात मी पण आहे ऋ आणि वल्ली. सहसा इंग्रजी पुस्तके मी नाहीच वाचत. मराठी वाचण्यात जास्त मजा येते.
इंद्रराज यांनी शिफारस केल्यामुळे बेन्ड्स इन द गॅन्जेस इंग्रजीतून घेतली. वाचून बघणारच आहे. पण तूर्तास नाही. सर्वात पहिले मी वाचले तर माळगांवकरांचे प्रिन्सेस मराठीतून वाचेन. मग गॅन्जेस

टण्या

टण्या · गुरुवार, 10 Feb 2011 - 09:47 · उत्तर

मी हे पुस्तक प्रथम मराठीतूनच वाचले होते.. चांगला अनुवाद आहे.. मूळ इंग्रजी पुस्तक वाचण्यातच मजा अधिक आहे हे मात्र खरे..
वर इंद्रराज ह्यांनी म्हटल्याप्रमाणे गंगा नदीचा आणि कथानकाचा भौगोलिकदृष्ट्या परस्परसंबंध नाही. फाळणीस वापरलेले metaphor आहे ते.. A bend in the river हा शब्दप्रयोग इंग्रजीत खासकरून नदी जिथे भले-थोरले वळण घेते तिथे वापरला जातो.. मला जोशींनी केलेले शीर्षकाचे भाषांतर मात्र खासेच आवडले.. इथे थबकली गंगामाई.. उत्तम..

A Bend in the River नावाची नायपॉलची छोटेखानी कादंबरी आहे.. माझी फार लाडकी कादंब्री..

वल्ली

वल्ली · Tue, 8 Feb 2011 - 12:49

Bend in the Ganges चा योग्य उच्चार काय? बेन्ड इन द गॅन्जेस की बेन्ड इन द गंगेज

इंद्राने उल्लेख केलेल्या "जिथे थबकली गंगामाई" या श्री. ज. जोशींच्या अनुवादावरून तर ही गंगेवरील कादंबरी असावी हे तर स्पष्टच आहे.

इंद्रराज पवार

इंद्रराज पवार · Tue, 8 Feb 2011 - 13:00 · उत्तर

'गॅन्जेस' हा खास ब्रिटिश धाटणीचा उच्चार....आणि माळगावकर हे ब्रिटिश आर्मीमध्येच 'कर्नल' पदावर असल्याने त्याना तोच उच्चार अभिप्रेत होता.

श्री.जोशी यानी जरी 'जिथे थबकली गंगामाई...." असे मराठी अनुवादाला शीर्षक दिले असले तरी 'गंगा' नदीचा आणि कथानकाचा काहीही संबंध नाही...."गंगे'चे थबकणे हे एक मेटॅफर आहे....कहाणी स्वातंत्र्य वर्षाच्या अगोदर चारपाच वर्षे आणि त्यानंतरची अपरिहार्य ठरलेली फाळणी, त्या अनुषंगाने झालेला हिंदु-मुस्लिम भडका...ह्या सत्य घटना आणि दोन कॉलेज युवक ~ एक बंदुकीच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवू इच्छिणारा तर दुसरा गांधी तत्वज्ञानावर विश्वास ठेवणारा....व त्यातील एकाची बहीण "सुंदरी"....यावर बेतलेली आहे.

वाचाच...! [तुमचा इंग्रजीबाबतच वरचा विचार वाचला....त्यामुळे मीही मराठी अनुवाद कुठे मिळतो का याची चाचपणी करतो. मी अनुवादित न वाचल्याने ती कशी आहे याबद्दल मत प्रदर्शित करू शकत नाही, हे ओघाने आलेच. तरीही श्री.जोशी यानी छान अनुवाद केला असणार यात शंका नाही.....प्रकाशकही माहीत नसल्याने थेट तिथे संपर्क साधता येत नाही.]

इन्द्रा

वल्ली

वल्ली · Tue, 8 Feb 2011 - 13:21 · उत्तर

मी ही आता बघतो अनुवादित कादंबरी कुठे मिळते ते. नाहीच मिळाली कुठे तर इंग्रजी कादंबरीच विकत घेईन (पण ती तरी मिळते का?)
मूळ इंग्रजी पुस्तक वाचतांना काही अवघड शब्दांच्या बाबतीत तरी डिक्शनरीचा आधार घ्यावा लागतो व त्यामुळे मूळ कादंबरीशी मनापासून समरस होता येत नाही.

वल्ली

वल्ली · Tue, 8 Feb 2011 - 14:00 · उत्तर

धन्यवाद. मराठी अनुवाद नाही मिळाला तर नक्कीच येथून उचलेन.

स्वगतः हा धागा फारच अवांतर होत चाललाय. देवेंद्र प्रभुने (प्रभुणे असावेत) यांना राग तर नाही ना येणार?

इंद्रराज पवार

इंद्रराज पवार · Tue, 8 Feb 2011 - 14:29 · उत्तर

"....देवेंद्र प्रभुने (प्रभुणे असावेत) यांना राग तर नाही ना येणार?.."

~ निदान 'राग' आला आहे हे दाखविण्यासाठी तरी त्यानी इथे हजेरी लावावी. सदस्य धागा देतात आणि मग त्यांची येथील अनियमितता पाहून श्री.सागर यांच्यासारख्यानी माहितीसाठी घेतलेल्या श्रमाची वाफ होऊन जाते हे पाहून मनस्वी वाईट वाटतेच वाटते.

असो.

इन्द्रा

देवेन्द्र प्रभुणे

देवेन्द्र प्रभुणे · Wed, 9 Feb 2011 - 04:47 · उत्तर

sorry friends!
there was problem in internet connection for last three days.
and BIG THANKS!
yes,i was looking for "CINEMACHYA SHTORI MAAGHI GOSHT" ONLY.
(booked copy yesterday!).you see,books are not readily available at place like yavatmal.i need to get them by post from mumbai or pune.
pl.don't misunderstand!!
i am not the one,who lets go the good work or thread to steam!!!!!
once again,THANKS!
-devendra s.prabhune
(sorry,not comfortable with marathi fonts,hence english.
pardon!!!!!)

वल्ली

वल्ली · Wed, 9 Feb 2011 - 04:56 · उत्तर

पुस्तकविश्ववर येत चला नेहमीच. पुस्तकांची सतत नवनवीन माहिती मिळेलच. शिवाय मराठीतूनच लिहिण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीला थोडे अवघड वाटेल. पण सरावाने अगदी थोड्याच काळात चांगले मराठी लिहू शकाल. युनिकोड आधारीत मराठी कसे लिहावे ते तुम्हाला येथे मिळेल.

इंद्रराज पवार

इंद्रराज पवार · Wed, 9 Feb 2011 - 05:04 · उत्तर

Ok Devendra, forget it.

You and like many others are always welcome here on the activities relating mainly with literature. The original concept behind establishing this forum viz. "Pustakvishwa" is to create a family exclusively interested in the activities relating with the world of books.

Specifically, I mentioned something about your non-responding to the answers or 'Pratikriya' of members in the light of your absence. But now, after reading your explanation, it seems you were handicapped due to technical problem. No doubt, Yevatmal is a city where one can suffer time and again as far as the question of obtaining desired books. But in these days OnLine service providers like "BookGanga.com" and "Flickart.com", 'Rasik.com" are very much in active to fulfill your demand within stipulated time...and that too without charging any extra rupee.

Try it....and also give efforts in learning Marathi typing...which, surely, is not an impossible thing to learn.

Indra

देवेन्द्र प्रभुणे

देवेन्द्र प्रभुणे · गुरुवार, 10 Feb 2011 - 05:05 · उत्तर

thanks folks!
i am regular on flipkart.com but surely give a try
to bookganga.com.
i had once visited rasik.com but their payment options(us dollars),
didn't/don't suit me.
by the way,does anybody have this beautiful book,
"GURU DUTT-EK TEEN ANKI SHOKANTIKA" by ARUN KHOPKAR?
(longing to see it.any information on re-release?)
-devendra prabhune

इंद्रराज पवार

इंद्रराज पवार · गुरुवार, 10 Feb 2011 - 05:45 · उत्तर

श्री.देवेन्द्र....

इथून पुढे मात्र 'मराठी' मधूनच संवाद साधू या....कारण 'पुस्तकविश्व'वर इंग्रजीमधून लेखन आले तरी ते संपादक मंडळाकडून उडवले जाणार नाही याची जरी खात्री असली तरी संस्थळाची स्थापना 'मराठी भाषावृद्धी' नजरेसमोर ठेवूनच केली असल्याने गरजेपुरते इंग्रजी ठीक आहे.....तुम्ही सातत्याने इथे भाग घेत राहिला की अगदी शर्टाला बटण लावत कामे करणे जितके सोपे तितकेच मराठी टायपिंगदेखील सोपे वाटत राहिल....सवयीने ! एक काळ असा होता की, खुद्द मला 'इन्द्रराज पवार' हे नाव मराठीत टंकण्यास दहा मिनिटे लागली होती आणि तरीही मिसळपाव ह्या पु.वि.च्या थोरल्या भावंडाच्या घरी सदस्यत्व घेताना 'इन्द्र्राज' (द्र चा मोडका पाय) असेच रजिस्टर झाले. रितसर नावनोंदणी झाली आणि सदस्यत्व प्राप्त झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी 'ती' छोटीशी चूक लक्षात आली, पण आता ते बदलता येत नसल्याने तसेच ठेवले...आजही तसेच आहे.

पण त्यानंतर जसजसा माझा तेथील सहभाग वाढू लागला त्यावेळी जाणवू लागले की 'मराठी टंकलेखन' किती सोपे आहे आणि जम बसल्यावर किती वेगाने एखादी व्यक्ती ते काम करू शकते. सांगायचा मुद्दा असा की, 'सातत्याचा सहभाग आणि सवय' हा मंत्र जपला की तुम्हीही मराठी टंकनात 'सचिन तेंडुलकर' व्हाल.

~ श्री.खोपकरांचे 'गुरुदत्त' यांच्यावरील ते पुस्तक मी वाचले आहे, पण संग्रही नाही. त्याला कारण म्हणजे माझ्याकडे ऑक्सफर्डने प्रकाशित केलेले नसरीन मुन्नी कबिर यांचे अतिशय सुंदर आणि माहितीने परिपूर्ण असलेले "GURU DUTT ~ A Life in Cinema" हे पुस्तक आहे....जे मला Flipkart द्वारे मिळाले. त्यातूनही खोपकरांचे हवेच असेल तर Rasik.com यांच्या साईटला भेट द्यावी. त्यांच्याकडे जरी नसले तर ते प्रयत्न करून मिळवून देतील.

इन्द्रा

सागर

सागर · गुरुवार, 10 Feb 2011 - 06:17 · उत्तर

रसिक साहित्यच्या २ वेबसाईट्स आहेत
१ रसिक.कॉम - विदेशातील खरेदीदारांसाठी
२. ईरसिक.कॉम - भारतातील खरेदीदारांसाठी

तरी तुम्हाला डिस्काऊंट हवा असेन तर रसिक साहित्यचे श्री. भरत यांच्या मोबाईलवर संपर्क करावा. ९३७१२१८३७० हा त्यांचा नंबर आहे. योग्य तो डिस्काऊंट देतात ते. पैसे फक्त नेट्बँकिंग च्या पर्यायाने बँकेत ट्रान्सफर करा किंवा त्यांच्या खात्यात जमा करा. कुरियर २-३ दिवसांत लगेच मिळते असा माझा नेहमीचा अनुभव आहे.

चर्चा प्रकार