- Log in to post comments
मित्रांनो,
आहात तय्यार?
प्रश्नमंजुषा -२ ची उत्तरे व्य.नि द्वारा शनीवार पर्यंत पाठवावीत.
उत्तरे व विजेत्यांची नावे रविवारी जाहीर करेन.
मणीकर्णीका ताईं साठी थांबलो होतो.
विजेते आहेत- सागर्.(उत्तम प्रयत्न!)
वल्ली व चित्राताईं चे आभार!आपला प्रतिसाद वाढावा ही इच्छा!
१.व्यंकटेश माडगूळकरांवर शरसंधान करणारी कादंबरी कोणती व त्याचे लेखक कोण?
-कलेचे कातडे,आनंद यादव
२.गेल्या दशकातील सर्वोत्तम मराठी पुस्तक म्हणून कोणत्या पुस्तकाची निवड झाली आहे?
-मौनराग्,महेश एलकुंचवार
३.सातत्याने नावीक जीवनावर लेखन करणारे दोन मराठी लेखक कोण?
-श्रीकांत लागू व अनंत सामंत
४.कालमापनावर नुकताच प्रकाशीत झालेला ग्रंथ कोणता व त्याचे लेखक कोण?
-कालगणना,मोहन आपटे
५.एका "कलंदर" मराठी अभिनेत्यावर दोन चरित्रे प्रकाशीत झाली.
त्यातील खरे चरित्र कोणते,हा वाद न्यायालयात पोहोचला.कोणती चरित्रे व त्यांचे लेखक कोण?
-सोंगाड्या,वसंत भालेकर(?) व एकटा जीव सदाशिव्,अनिता पाध्ये
६.श्रीरामपूर्(जि.अहमदनगर्)इथल्या एका कविने,एकच दीर्घकविता असलेले पुस्तक
प्रकाशीत केले.कवी व पुस्तकाचे नाव काय?
-शंकर दिघे,या शतकाचा सात्-बाराच कोरा होईल!
७."आठवणींचे रंगीबेरंगी पक्षी" हे आत्मचरित्र कोणाचे?
-मोहन वाघ
८."तीसरी घंटा" हे आत्मचरित्र कोणत्या अभिनेत्याचे?
-मधुकर तोरडमल
९.पुस्तकप्रेमासाठी वयाच्या ४३ व्या वर्षी निव्रुत्ती स्वीकारणारे व आपल्या अनुभांवरती(नोकरीच्या)
पुस्तक लिहिणारे साहित्यप्रेमी लेखक कोण?
-संजय भास्कर जोशी,"आहे कार्पोरेट तरीही".
१०.सु.शि.प्रेमींसाठी खास्-मिथुन चक्रवर्ती च्या आयुष्यावर बेतलेली सु.शिं.ची कादंबरी कोणती?
-क्षितिज्.(आवारा ही फिरोज कथा होती मित्रा!हेलन स्पायलेन)
आपल्या प्रतिक्रियांच्या व प्रतिसादाच्या अपेक्षेत,
-देवेन्द्र प्रभुणे,यवतमाळ.
*पुढील प्रश्नमंजुषा एकदम सोपी व सहज!
भेटूया शनीवारी!
अभिप्राय
वल्ली
वल्ली · गुरुवार, 31 Mar 2011 - 16:56
यावेळची प्रश्नमंजुषा वाकेही अवघड हय.
सागर
सागर · गुरुवार, 31 Mar 2011 - 16:59
त्यातली अनेक उत्तरे बरोबर आहेत असा कयास आहे. पाहूयात गुरुजी किती मार्क देतात ते ;)
सुशिंचे ते पुस्तक वाचले आहे. पण नेमके आत्ता आठवत नाही. गेल्या आठवड्यात सहज मी माझ्या संग्रहातली पुस्तके मोजली तर ५२ पुस्तके आहेत सुशिंची माझ्याकडे :)
पण मिथुनच्या जीवनावरचे पुस्तक (जे अंदाजवले आहे) ते नाहिये माझ्याकडे. नाव कन्फर्म झाले की घेणारच आहे :)
चित्रा राजेन्द्र जोशी
चित्रा राजेन्द… · गुरुवार, 31 Mar 2011 - 17:53
देवेन्द्र,
बाप रे! ह्यावेळी थेट उत्तरपत्रिकाच वाचीन म्हणते!!!!!
ऋषिकेश
ऋषिकेश · Fri, 1 Apr 2011 - 10:51 · उत्तर
+१
(खरं म्हंजे मी नेहमीच फक्त उत्तरपत्रिका वाचतो :प )
मणिकर्णिका
मणिकर्णिका · Sun, 3 Apr 2011 - 13:37
देवेंद्र,
'आठवणींचे रंगीबेरंगी पक्षी आहे का 'आठवणींचे पक्षी'? कृपया खुलासा व्हावा.
देवेन्द्र प्रभुणे
देवेन्द्र प्रभुणे · Sun, 3 Apr 2011 - 14:16 · उत्तर
आठवणींचे रंगीबेरंगी पक्षी!
उत्तरे उद्या पर्यंत पाठवली तरी चालतील!
-देवेन्द्र प्रभुणे,यवतमाळ.
वल्ली
वल्ली · Mon, 4 Apr 2011 - 17:03
दोन गोष्टी थोड्या अधिक स्पष्ट करशील का?
याबद्दल थोडी अधिक माहिती हवी आहे.
याला नेमका कुठला क्रायटेरीया(मराठी प्रतिशब्द?) लावलास?
म्हणजे ही राज्य सरकारची निवड, साहित्य महामंडळाची, का इतर कुठल्या संस्थेची निवड.
सागर
सागर · Mon, 4 Apr 2011 - 17:50 · उत्तर
नेमका कुठला क्रायटेरीया(मराठी प्रतिशब्द?) लावलास?
याला निकष लावणे म्हणत्यात मित्रा :)
वल्ली
वल्ली · Mon, 4 Apr 2011 - 18:16 · उत्तर
बरोबर आहे. पण तेव्हा नेमका मराठी प्रतिशब्द आठवला नाही. धन्स.:)
सागर
सागर · Mon, 4 Apr 2011 - 19:28 · उत्तर
मित्रा,
या दुव्यावर तुला परिक्षण वाचावयास मिळेल कलेचे कातडे या कादंबरीवरचे
चित्रा राजेन्द्र जोशी
चित्रा राजेन्द… · Mon, 4 Apr 2011 - 20:53 · उत्तर
देवेन्द्र आणि सागर,
`कलेचे कातडे' हे नाव व त्या कादंबरीविषयी कधीही ऐकले नव्हते ते ह्या प्रश्नमंजुषेमुळे आणि त्यावरील दुव्यामुळे नीटच समजले. लेखकाच्या लिखाणाने वाचक भारावून जातो आणि लेखकाचे माणूसपण ध्यानात न घेताच त्याच्यावर आपला जीव जडवतो. पण हे जीव जडवणं त्या लेखनामुळे घडलेलं असतं, प्रत्यक्षात त्या `माणसा'चे पाय मातीचेच असतात. `दुरून डोंगर साजरे' तद्वत `दुरून लेखक साजरा.....' त्याच्या जास्त जवळ जाण्याने भ्रमनिरास होण्याचीच शक्यता अधिक असणार. आपण आपला वाचनानंद घ्यावा, आपली समज-आकलनशक्ती वाढवावी हेच इष्ट आणि बेष्ट!!!!!!!! नियमाला अपवाद असतात म्हणा...
नक्की कुठे वाचलं होतं ते आठवत नाहीए ...... कलाकार केवळ कलानिर्मितीपुरता आणि त्यानंतर रिता.....
वल्ली
वल्ली · Tue, 5 Apr 2011 - 05:06 · उत्तर
लेखकाविषयीचे वास्तव हे धक्कादायकच आहे. चित्राशी सहमत. आपण आपला वाचनानंदच घ्यावा हेच खरे.
चित्रा राजेन्द्र जोशी
चित्रा राजेन्द… · Mon, 4 Apr 2011 - 17:43
देवेन्द्र,
छान होती ही प्रश्नपत्रिका. खूप नवीन माहिती मिळाली.
सागर
सागर · Mon, 4 Apr 2011 - 18:01
सर्व प्रश्नांची अगदी अचूक उत्तरे देता नाही आली त्यामुळे जिथे अडलो होतो त्याचा खुलासा करणे आवश्यक आहे असे वाटल्याने देतो आहे. ५ प्रश्नांची उत्तरे लगेच आली. पण बाकीच्या उत्तरांसाठी थोडे जास्त डोके खाजवावे लागले. दोलायमान अवस्थेत मात्र थोडी गूगलबाबाचीही मदत झाली, पण ती फक्त संदर्भ शोधून खात्री पटवण्यासाठीच मर्यादित होती...
३.सातत्याने नावीक जीवनावर लेखन करणारे दोन मराठी लेखक कोण?
-श्रीकांत लागू व अनंत सामंत
या प्रश्नाने विकेट उडवली. दोन्ही लेखक माहितीचे पण हे असतील असे वाटलेच नाही :(
अनंत सामंतांचे एमटी आयवा मारु पडले आहे. अगदी ३ महिन्यांपूर्वीचीच खरेदी. पण पुन्हा वाचन झालेच नाही, नाहीतर थोडाफार अंदाज करता आला असता.
७."आठवणींचे रंगीबेरंगी पक्षी" हे आत्मचरित्र कोणाचे?
-मोहन वाघ
या पुस्तकाबद्दल कधीच ऐकले नव्हते. माहिती करुन घ्यायला नक्की आवडेल
९.पुस्तकप्रेमासाठी वयाच्या ४३ व्या वर्षी निव्रुत्ती स्वीकारणारे व आपल्या अनुभांवरती(नोकरीच्या)
पुस्तक लिहिणारे साहित्यप्रेमी लेखक कोण?
-संजय भास्कर जोशी,"आहे कार्पोरेट तरीही".
यातही स्मरणशक्तीने दगा दिला. संजय जोशी आणि बापू करंदीकर या दोघांची नावे दिली होती. त्यातलेही १ बरोबर आले. तरी नक्की उत्तर ठामपणे आठवले नव्हते.
१०.सु.शि.प्रेमींसाठी खास्-मिथुन चक्रवर्ती च्या आयुष्यावर बेतलेली सु.शिं.ची कादंबरी कोणती?
नीटसे आठवत नव्हते त्यामुळे आवारा आणि क्षितिज अशी दोन्ही नावे दिली होती. १ बरोबर आले यातच समाधान :)
होय मित्रा. हेलन स्पायलेन च्या उल्लेखानेच आवारा आठवली लगेच. आवारा ही फिरोजची आहे असे वाटत होते, पण काहीच आठवत नव्हते. हेलन स्पायलेन आठवली असती तर कदाचित आवारा टंकले नसते :)
यशोधरा
यशोधरा · Tue, 5 Apr 2011 - 08:25
प्रश्नमंजुषा बघितली आणि पुन्हा एकदा अज्ञानाची जाणीव झाली :(
अर्थात, काही प्रश्नांची उत्तरे अजिबातच ठाऊक नव्हती.
सागर, अभिनंदन! :)
देवेन्द्र प्रभुणे
देवेन्द्र प्रभुणे · Tue, 5 Apr 2011 - 14:03
मित्रांनो,
एक छोटीशी चूक झाली आहे.
नावीक जीवनावर सातत्याने लिखाण करणारे
चिंतामणी लागू(श्रीकांत चुकून टंकले गेले)
"सागरपुत्र" ही ह्यांची बरयापैकी वाचनीय कादंबरी आहे.
"मौनराग" ला म्.सा.प. ने सर्वोत्तम म्हणुन गौरवले आहे.
आपला अधिक प्रतिसाद अपेक्षीत आहे.
धन्यवाद,
-देवेन्द्र प्रभुणे,यवतमाळ.
सागर
सागर · Tue, 5 Apr 2011 - 14:13 · उत्तर
सागरपुत्र वाचली आहे ( मी नाही वाचणार तर कोण वाचणार ;) ) सुंदरच कादंबरी आहे ती.
श्रीकांत लागू यांचे नाव वाचून मी चक्रावलो होतो खरे तर.
कारण श्रीकांत लागू यांनी "शिखरावरून" हा एडमंड हिलरी यांच्या पुस्तकाचा अनुवाद मराठीत केला आहे.
गिरीशिखरावरुन सागराकडे मला अचंभित करणारे होते.
वाटले होते की एकच पुस्तक वाचले आहे त्यामुळे माहिती नसेन. त्यावेळी घोर अज्ञानाचा साक्षात्कार झाला होता :(
माऊंट एव्हरेस्ट सर्वप्रथम सर करणारे सर एडमंड हिलरी यांचे अनुभवकथन सुरेखरित्या मराठीत श्रीकांत लागूंनी आणले आहे. नक्की वाचावे असे आहे.
मणिकर्णिका
मणिकर्णिका · Tue, 5 Apr 2011 - 15:06
माझ्याकरता थांबलात म्हणून मला हाऊ स्वीट म्हणावेसे वाटले.
देवेंद्र, नजर टाकल्यासरशी अर्ध्याहून अधिक उत्तरं येत असतील तर बाकीची उत्तरं शोधण्यात मजा. गेल्या प्रश्नमंजुषेचं असंच झालं होतं.
यात मात्र मला फक्त दोन उत्तरं येत होती म्हणून...
पुढच्या प्रश्नमंजुषेत नक्की भाग घेईन.
देवेन्द्र प्रभुणे
देवेन्द्र प्रभुणे · Tue, 5 Apr 2011 - 17:58
मित्रा सागर,
"सागरपुत्र" मी वाचणार नाही तर कोण?
हे तुझ्या मुलाने म्हंटले तर अधीक मजा येइल,नाही का?
(गंमत्,मित्रा!).तुझ्या कौटुंबीक स्थिती ची कल्पना नाही,मित्रा!
-देवेन्द्र प्रभुणॅ,यवतमाळ.
नंदन
नंदन · Wed, 6 Apr 2011 - 09:19
अभिनंदन सागर!
सागर
सागर · Wed, 6 Apr 2011 - 09:58 · उत्तर
नंदन मित्रा,
तुझी अनुपस्थिती चांगलीच जाणवते आहे
तू या प्रश्नावलीत भाग घेतला असतास तर विजेता तूच असतास याची खात्री आहे :)
येत जा रे इथे मित्रा