- Log in to post comments
मित्रांनो,
परत एकदा स्वागत!
उत्तरे बुधवारी रात्रीपर्यंत!
जरा हटके व घुमावदार!!!!!!
१.मराठीतील पहिले पुस्तक कोठे छापल्या गेले?(जागेचे नाव)
२.ठणठणपाळ व्यतीरिक्त जयवंत दळवी ह्यांनी आण़खी कोणत्या टोपणनावांनी लेखन
केले आहे?
३.पुरुष असुनही स्त्रीटोपणनावाने लेखन करणारे लेखक कोण?(ह्यांनी आपले संपूर्ण लिखाण स्त्रीटोपण नावाने केले).
४.बाबुराव अर्नाळ्करांचे मूळ नाव काय?
५.कोणत्या मराठी साहीत्यकाला "दो रास्ते" ह्या चित्रपटासाठी कथेचे filmfare
पारितोषीक मिळाले होते?
६."सुर्य"ह्या श्री.दा.पानवलकरांच्या कथेवर कोणता विख्यात हिंदी चित्रपट
बनवलेला आहे?
७.अठरा धान्यांचे कडबोळे हे कोणत्या विनोदी कथासंग्रहाचे मूळ नाव आहे?
८.मुक्काम:गौरी देशपांडे,मुक्कामः?(दुसर्या लेखकाचे"मुक्काम" नावाचे पुस्तक!)
९.कोणत्या विख्यात कवीच्या विनोदी कथा संग्रह् रुपात प्रसिद्ध झाल्या आहेत?(गडकरी मुद्दलात नाटककार्.मला
अपेक्षित आहेत ते,मुद्दलात कवी,नंतर नाट़ककार असे साहित्यिक!)
१०.रुपक कथा मराठीत आणणारे साहित्यिक कोण?
चला तर्,पाठवा उत्तरे!
आपल्या सूचना/समिक्षेचे हार्दिक स्वागत!
-देवेन्द्र प्रभुणे,यवतमाळ.
अभिप्राय
सागर
सागर · Sun, 17 Apr 2011 - 18:03
मित्रवर्य देवेन्द्र,
उजळणी करणे सोप्पे नसते याचा प्रत्यय तुझ्या प्रश्नमंजुषेनिमित्त नक्की येतो आहे
तुझी प्रश्नमंजुषा दिवसेंदिवस माझ्या ज्ञानात भर टाकते आहे एवढे नक्की :)
प्रयत्न विरोपवला आहे
प्रश्न क्र. ८ - वर नक्की काय उत्तर अपेक्षित आहे याचा थोडा खुलासा करशील तर आपल्या इतर मित्र-मैत्रीणींनाही मदत होईन
देवेन्द्र प्रभुणे
देवेन्द्र प्रभुणे · Mon, 18 Apr 2011 - 03:45
मित्रांनो,
प्र्.८-मला "मुक्काम्"ह्याच नावाचे,पण वेगळ्या लेखकाने लिहिलेले पुस्तक
अपेक्षित आहे.(म्हणजे,दुसरया पुस्तकाचे लेखक ओळखा).
-देवेन्द्र प्रभुणे,यवतमाळ.
वल्ली
वल्ली · Mon, 18 Apr 2011 - 06:13
पण प्रत्येक प्रश्नमंजुषेच्या निमित्ताने माझे साहित्यविषयक ज्ञान खूपच तोकडे आहे याचीच जाणीव होतेय. देवेंद्रमुळे अर्थात बरीच नवनवी माहिती समजतेय.
ऋषिकेश
ऋषिकेश · Wed, 20 Apr 2011 - 05:35
तोकड्या ज्ञानामुळे (म्हंजे घोर अज्ञानामुळे) अजून एकाही प्रश्नमंजुषेच्या उत्तराचा व्यनी केलेला नाही.. ही मंजुषा काहि वेगळी नाही :(
चित्रा राजेन्द्र जोशी
चित्रा राजेन्द… · Wed, 20 Apr 2011 - 16:48
मणिकर्णिका आणि सागर.... दोघांचेही हार्दिक अभिनंदन!!!
देवेन्द्र, ह्या अशा प्रश्नपत्रिका तयार करणे, तपासणे आणि निकाल लावणे, माफ करा, जाहीर करणे हे अभ्यासाचे काम करण्याबद्दल तुमचेही हार्दिक अभिनंदन!!!!
आपल्या रोजच्या व्यापातून ह्यासाठी वेळ देणार्या समस्त `पुवि'करांचे देखील हार्दिक अभिनंदन!!!!
देवेन्द्र प्रभुणे
देवेन्द्र प्रभुणे · Wed, 20 Apr 2011 - 17:31
मित्रांनो,
आवडीचे काम करण्यात श्रम कसले!
उलट्पक्षी,ह्या विरंगुळया मुळे बाकी काम करायला हुरुप येतो!
संपादन करुन उत्तरे जाहीर करण्याचे दोन्ही प्रयत्न फसले(पुवि गंडले!)
असो,
मणिकर्णिका ताई-जबरदस्त!
सागरभाऊ-पुढची प्र.मं.तोडणार,ह्याची खात्री!
वल्लीभऊ व चित्राताई-तुमचे ज्ञान व आवड बघता कमी गुणांचे रहस्य उलगडत नाही.थोडा अधिक जोमाने प्रतिसाद अपेक्षीत!
उत्तरे-१.श्रीराम्पूर्,प्.बंगाल,१८०५
२.अलाणे फलाणे
३.प्रश्न नीट वाचा,मित्रांनो!संपुर्ण लेखन स्त्रीटोपण नावाने!
ग्रेस्,दया पवार्,चारुता सागर
४.चंद्रकांत सखाराम चव्हाण
५.चंद्रकांत काकोडकर
६.अर्धसत्य
७.सुदाम्याचे पोहे-श्रीपाद क्रू.कोल्हट्कर्(वल्लीभौ-मस्त उत्तर!)
८.सुधिर गाड्गीळ
९.वि.वा.शिरवाड्कर
१०.वि.स्.खांडेकर्(रुपक कथा म्हणजे परिच्छेद भर कथेला दोन पानी स्पष्टीकरण!!!)
प्रतिसादाबद्दल आभार!
पुढील प्रश्नमंजुषा-एकदम दोन!
एक्,नेहेमीची व दुसरी-सु.शि.स्पेशल!
धीर धरा,शुक्रवार पावेतो!
चला मंडळी,परत भेटु या!
-देवेन्द्र प्रभुणे,यवतमाळ.
सागर
सागर · गुरुवार, 21 Apr 2011 - 08:43 · उत्तर
म्हणजे संग्रहातील सुशिंची पुस्तके वेगळी करुन ठेवणे आले :)
छान उजळणी होईन या निमित्ताने सुशिंच्या पुस्तकांची
उत्सुकतेने वाट बघतो आहे पुढच्या प्रश्नमंजुषेची देवेन्द्र भाऊ :)
चित्रा राजेन्द्र जोशी
चित्रा राजेन्द… · Sun, 24 Apr 2011 - 08:16
देवेंद्र,
‘सुशि’ प्रेमींसाठी वेगळी प्रश्नमंजुषा ..... व्वा! आता तर दोन-दोन प्रश्नपत्रिका!
ह्यावरूनच तुमच्या ‘पुपुवि’प्रेमाची (पुस्तकवेड्यांचे पुस्तकविश्व.... काय सागर बरोबर ना?) कल्पना येते.
सागर
सागर · Mon, 25 Apr 2011 - 10:56 · उत्तर
चित्रा,
अगदी अगदी सही बोललीस. :D
मी तर आहेच पुस्तकवेडा पण पुवि डाऊन होते त्यानिमित्ताने आपल्या सर्वांच्या पुविप्रेमाची कल्पना आली.
देवेन्द्र तो बात ही कुछ खास है. पक्का पुस्तकप्रेमी शोभतो. :)
चित्रा राजेन्द्र जोशी
चित्रा राजेन्द… · Sun, 24 Apr 2011 - 10:55
...