- Log in to post comments
मजकूर
सध्या पुण्यात दोन पुस्तक प्रदर्शनं चालू आहेत. बाजीराव रस्त्यावर अत्रे सभागृहात शुभम साहित्यतर्फे प्रदर्शन चालू आहे. ते २८ ऑक्टोबरपर्यंत चालू आहे. त्यात पुस्तकांच्या छापील किमतींवर सरसकट २०% सूट आहे. कालपासून अंबर हॉल, कोथरूड इथं अक्षरधाराचंही प्रदर्शन चालू झालं आहे.
चर्चा प्रकार
अभिप्राय
यशोधरा
यशोधरा · Tue, 12 Oct 2010 - 10:02
तुम्ही ह्या प्रदर्शनांना भेट दिली आहे का? कशी वाटली? पुस्तके कोणत्या प्रकारची आहेत?
चिंतातुर जंतू
चिंतातुर जंतू · Tue, 12 Oct 2010 - 10:14
येत्या २-३ दिवसांत भेट देईन. अक्षरधारा आणि शुभम दर वर्षी अशी प्रदर्शनं भरवतात. त्यात सर्व प्रमुख प्रकाशक (मौज, राजहंस, मॅजेस्टिक, पॉप्युलर, पद्मगंधा वगैरे) आपली पुस्तकं ठेवतात. थोडीफार सवलत असल्यामुळे आणि पुष्कळ पुस्तकं एकत्र पाहायला/हाताळायला मिळतात त्यामुळे वर्षभराची 'स्टँडर्ड' खरेदी, दिवाळीआधीची पुस्तक-भेट खरेदी वगैरेंसाठी ही प्रदर्शनं सोयीची पडतात असा माझा अनुभव आहे.
यशोधरा
यशोधरा · Tue, 12 Oct 2010 - 10:17 · उत्तर
धन्यवाद, अक्षरधाराचे प्रदर्शन कधीपर्यंत आहे? आणि अंबर हॉल कुठे आहे?
चिंतातुर जंतू
चिंतातुर जंतू · Tue, 12 Oct 2010 - 10:41
अक्षरधाराचं प्रदर्शन आठवडाभर तरी सहज असावं. काल सकाळमध्ये उद्घाटनाची बातमी होती त्यात बहुतेक तारीख दिलेली होती. अंबर हॉल कर्वे रस्त्यावर दशभुजा आणि कर्वे पुतळा यांदरम्यान आहे - मारुती मंदिरासमोर. शेजारी देसाई बंधू आंबेवाले यांचं दुकान आहे. गूगल नकाशावर सापडेल.
वल्ली
वल्ली · Tue, 12 Oct 2010 - 10:53
शुभमच्या प्रदर्शनाला भेट दिली. यावेळी सवलत खूपच घसघशीत आहे. आणि १०० रू. वरील कुठल्याही पुस्तकावर किमान १५%सवलत आहेच.
राजहंसच्या पुस्तकांवर २५% सवलत आहे तर युगंधर, संभाजी, मृत्युंजय, राधेय आणि इतरही अनेक अश्या काही बर्याच गाजलेल्या पुस्तकांवर २०% सवलत आहे. जरूर जाउन याच आणि खरेदी कराच.
जवळच मेहता पब्लिशिंग हाउस मध्येही पुस्तक महोत्सव चालू आहे. तिथेही सरसकट २०% व टी-बुक क्लब किंवा ग्रंथजगतचे सभासद असल्यास ३५ ते ४०% पर्यंत मिळते. अर्थात तिथे फक्त मेहताचीच पुस्तके असल्याने बरीच मर्यादा आहे.
यशोधरा
यशोधरा · Fri, 15 Oct 2010 - 14:43 · उत्तर
>>ग्रंथजगतचे सभासद असल्यास ३५ ते ४०% पर्यंत मिळते >> मी हे प्रदर्शन बघायला गेले तेह्वा सभासदत्व घेतले आणि मला ३३% ट्क्के सूट मिळाली. वर एक शिवणकामाचे पुस्तक फुकट! :D त्यांना म्हटले की निदान भरतकाम वा विणकामाचे तरी द्या, जे निदान मला जमते आणि कळते! पण म्हणे नाही, हेच मिळेल! मग तेच घेऊन आले! :D कोणाला हवे असल्यास सांगणे. (फक्त शिवणकामाचे पुस्तक म्हणतेय मी)
कैवल्य
कैवल्य · Tue, 12 Oct 2010 - 11:54
चिंतातूरजंतू,
माहितीबद्दल धन्यवाद.
अत्रे सभागृहात चक्कर मारेनच. अक्षरधाराचं प्रदर्शन अंबर हॉलमध्ये कधीपर्यंत आहे?
एक निवांत शनिवार/रविवार आख्खा राखून ठेवायला हवा.
चिंतातुर जंतू
चिंतातुर जंतू · Tue, 12 Oct 2010 - 12:56 · उत्तर
२८ ऑक्टोबरपर्यंत आहे. हा पाहा दुवा.
ऋषिकेश
ऋषिकेश · Tue, 12 Oct 2010 - 12:42
अंबर हॉल जवळ आहे.. बघतो विकांताला जमतंय का!
यशोधरा
यशोधरा · Wed, 13 Oct 2010 - 08:00
कैवल्य आणि ऋ, चककर मारुन आल्यावर वृ जरुर द्या.
चिंजं, धन्यवाद.
वेदश्री
वेदश्री · Wed, 13 Oct 2010 - 07:09
माहितीबद्दल १०क्स! या शनिवारी मिशन बाजीराव रोड नक्की.. अत्रेत आणि मेहताच्या हापिसात जायला.
मेघना भुस्कुटे
मेघना भुस्कुटे · गुरुवार, 14 Oct 2010 - 17:34
सेनापती बापट मार्गावर २० - २४ ऑक्टोबर असं एक बुक-फेअर आहे असं आत्ताच एका प्रकाशकांकडून कळलं. अधिक माहिती मिळाली की पत्ताबित्ता नीट लिहितेच.
तोवर तुम्हांला याबद्दल काही माहिती असली तर सांगा..
चिंतातुर जंतू
चिंतातुर जंतू · Tue, 19 Oct 2010 - 07:36 · उत्तर
हे प्रदर्शन कामायनी संस्थेच्या आवारात भरतं आहे. (पत्रकार नगरच्या पुढे, सेनापती बापट रस्त्यावर शेती महामंडळ / पासपोर्ट ऑफिसपासून आत जाणे). त्यात नॅशनल बुक ट्रस्ट, काही इराणी प्रकाशक आणि काही छोटे प्रकाशक अशा थोड्या वेगळ्या प्रकाशकांची पुस्तकं असतील. उद्या (२० ऑक्टोबरला) सकाळी १०:३० वाजता प्रदर्शनाचं उद्घाटन आहे.
सकाळमधल्या बातमीचा हा दुवा पहा.
मेघना भुस्कुटे
मेघना भुस्कुटे · Tue, 19 Oct 2010 - 10:27 · उत्तर
माहितीकरता धन्यवाद. नॅशनल बुक ट्रस्टची पुस्तकं सहसा मिळत नाहीत. ती एकत्र पाहायला मिळतील..
आनंदयात्री
आनंदयात्री · Wed, 20 Oct 2010 - 06:23 · उत्तर
होय. मला तर नॅशनल बुक ट्रस्टच्या पुस्तकांबद्दल फार उत्सुकता आहे. पहिल्यांदा पहायला मिळणार. एक तरी घेईन म्हणतो.
वेदश्री
वेदश्री · Wed, 20 Oct 2010 - 06:48 · उत्तर
नॅशनल बुक ट्रस्टबद्दल टण्याने प्रतिसादात सांगण्यापुर्वी मला माहितीदेखील नव्हती. टण्याच्या सुचवणीनुसार राग दरबारी वाचून अत्यंत आवडलेले असल्याने आता एनबीटीची बाकीची पुस्तकं कोणकोणती आणि कशी आहेत याबद्दल एक कुतूहल निर्माण झालेच होते मनात. आता जमवावेच असे वाटतेय हे प्रदर्शन बघणे. शिवाय हे इराणी प्रकाशक काय प्रकार आहे तेही कळेल.
ऋषिकेश
ऋषिकेश · Tue, 19 Oct 2010 - 11:21 · उत्तर
अरे वा.. नॅशनल बुक ट्रस्टची पुस्तके बर्याचदा चांगली आणि स्वस्त असतात.. दुर्दैवाने या काळात पुण्यात नसेन.
एका संध्याकाळी मिरासदारांची मुलाखत दिसते आहे. कोणी जाणार असेल तर वृत्तांत ऐकायला आवडेल
टण्या
टण्या · Sat, 16 Oct 2010 - 16:37
आज सकाळी इथे गेलो होतो. मौज आणि राजहंस ह्या दोनच उल्लेख करण्याजोग्या प्रकाशनांची पुस्तके होती (तरीही खिसा हलका झालाच :) ). बाकी सगळं मग देव-लहान मुले-खादाडी इत्यादी जंत्री होती.
ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात अत्रे सभागृहात लागलेले प्रदर्शन मी पाहिलेल्या प्रदर्शनांमध्ये सर्वात उत्तम होते.
यशोधरा
यशोधरा · Mon, 18 Oct 2010 - 07:35
शुभमचे प्रदर्शन पाहिले. खूप उत्तम नसले तरी चांगले होते. काही पुस्तके उचलली. अंबर हॉलमधले पहायचे राहून गेले.
वेदश्री
वेदश्री · Mon, 18 Oct 2010 - 07:37
मी या शनिवारी मेहता आणि शुभमला जाऊन आले. एकाच दिवशी या दोन ठिकाणी गेल्याने ग्राहकाला देण्यात येणार्या वागणूकीतला फरक अगदी नजरेत भरण्याइतपत जाणवला.
मेहतावाल्यांनी सांगितले की प्रदर्शन कालच संपले त्यामुळे आता नेहमीच्या सदस्याला मिळते तितकीच सूट मिळेल (विकेंड समोर असताना प्रदर्शन शुक्रवारी संपवणारे लोक पाहिल्यावर मला खूप आश्चर्य वाटले पण ते असो.). माझ्या यादीनुसार पुस्तकं घेऊन आणि आउट ऑफ प्रिंट पुस्तकांची डोक्यात नोंद करून घेत मी तिथून बाहेर पडले. मग तिथून अत्रेला लागलेल्या शुभमच्या प्रदर्शनात गेले. हवी असलेली पुस्तके तर उचललीच मी तिथे पण बघून पटली म्हणूनदेखील घेतली काही पुस्तकं. खुद्द मेहतावाल्यांकडे नसलेली पुस्तकं मला तिथे मिळाल्याने मला खूप आनंद झाला. माझ्याकडच्या यादीतली तिथे माझ्या दृष्टीला न सापडलेल्या पुस्तकांची यादी मी कुणालकडे (शुभमचा प्रोप्रा बहुतेक) दिली आणि त्याला पुस्तकं शोधून द्यायला सांगितली. नेहमी देतो तो शोधून पुस्तकं पण परवा जरा गडबडीत दिसत होता.. कारण विचारल्यावर कळलं की त्याच्या आजेसासर्यांची तब्येत खूपच खराब असल्याने त्याला नगरच्या हॉस्पिटलात जायला हवे आहे. 'तुमची सगळी पुस्तकं मी काढून ठेवतो, कधीही येऊन घेऊन जा' असं म्हणाला. मग मीही जास्त लावून धरला नाही 'मला आत्ताच द्या ना पुस्तकं' मुद्दा. २३% डिस्काउंटनुसार पैसे देऊन पुस्तकं सॅकमध्ये ठेवत होते मी तर म्हणाला,'अब चौकातल्या दुकानात या ना कधी. आता आपण दुकानाशेजारची बिल्डींगच घेतली आहे. १३ डिसेंबरला उद्घाटन आहे.' 'मला हवी असलेली पुस्तकं दाखवणार/देणार असशील तर येईन.' असे म्हटल्यावर 'नक्कीच. नविन पुस्तकं आली की मी तुम्हाला अपडेट करत जाईन हवे तर.' म्हणाला. 'तिथे मग १२ महिने प्रदर्शन राहील का?' असे मी विचारल्यावर 'हो' म्हणाला. 'मग औबादला नाही यायचे तुमचे प्रदर्शन?' असे मी विचारल्यावर म्हणाला, 'काळजी नका करू. इथून निघालो की तिकडेच येतोय आम्ही तुमच्या बलवंतला.. दिवाळीनंतर. हवी असल्यास तुमच्या यादीतली पुस्तकं सरळ तिकडेच देतो आणून.' :) दिवाळीनंतर बलवंतमध्ये गाठणे शक्य नसल्याने आता या शनिवारी किंवा रविवारी परत जाईन मी अत्रेमध्ये उरलेली पुस्तके आणायला.
कार्डने पेमेंट केले तर चालेल का? या प्रश्नाला दिलेली उत्तरे पुरेशी बोलकी आहेत -
मेहता - '२% जास्त लागतील.'
शुभम - 'कशाला उगाच २% जास्त भरता? इथे शेजारच्याच बिल्डिंगमध्ये एटीएम आहे की. तुम्हालाही सोपे आणि आम्हालाही!'
ऋषिकेश
ऋषिकेश · Mon, 18 Oct 2010 - 12:38
जवळ असूनही अंबर हॉलला जाणे झाले नाही. रविवारी संध्याकाळी जाणार होतो पण पाऊस पडला आणि तिथे अजून साधी छत्रीही नाही :(
स्वाती
स्वाती · Wed, 20 Oct 2010 - 06:52
नॅशनल बुक ट्रस्टची पुस्तकं सहसा मिळत नाहीत.>> वर टण्याने सांगीतलेले "राग दरबारी" व्यतिरीक्त यांची कुठली पुस्तके चांगली आहेत त्याची यादी कोणी सांगेल काय?
ऋषिकेश
ऋषिकेश · Wed, 20 Oct 2010 - 06:56 · उत्तर
+१
पुस्तकविश्वमुळे [ ही यादी ] मिळाली.
मात्र यात थोडीच पुस्तके आहेत. त्यात फडक्यांचे "सेनापती बापट" व सलीम अलींचे "भारतीय पक्षी" ही दोनच ओळखीची दिसताहेत.. कोणी एन्बीटीची आवर्जून घेण्यासारख्या ५-७ पुस्तकांची नावे देईल काय?
वेदश्री
वेदश्री · Wed, 20 Oct 2010 - 07:37 · उत्तर
एनबीटीच्या साईटवरून ही माहिती मिळाली. या यादीतली आवर्जून वाचण्यासारखी पुस्तके कोणती ते कोणी सांगितल्यास उत्तमच!
माझ्या माहितीनुसार - राग दरबारी (सौजन्य: टण्या), आता आमोद सुनासि आले (सौजन्यः नंदन) आणि तोत्तोचान ही पुस्तके उत्तम आहेत एन्बीटीची.
चिंतातुर जंतू
चिंतातुर जंतू · Wed, 20 Oct 2010 - 07:23 · उत्तर
श्रीपाद जोशी यांनी अनुवादित केलेली कोणतीही पुस्तकं घ्यायला हरकत नाही.
आनंदयात्री
आनंदयात्री · Wed, 20 Oct 2010 - 07:29 · उत्तर
आणि कोणते कानडी लेखक भारी आहेत (ज्यांचे मराठी अनुवाद उपलब्ध आहेत)
प्रभाकर नानावटी
प्रभाकर नानावटी · Mon, 25 Oct 2010 - 04:20 · उत्तर
NBT च्या यादीतील कन्नड लेखकांचे अनुवदित केलेली खालील पुस्तकं वाचनीय आहेत. (मूळ कन्नड पुस्तकं मी वाचलेली आहेत; अनुवाद कितपत उतरला आहे याची खात्री देता येत नाही. काही वेळा फार सरधोपटपणे अनुवाद केलेला असतो असा माझा अनुभव आहे)
(खालील पुस्तकं उपलब्ध असली तरी मूळ पुस्तकं विशेष आवडलेली नाहीत. कदाचित हे माझी वैयक्तिक मत असावे)
स्वाती
स्वाती · Wed, 20 Oct 2010 - 09:36
माझ्या माहितीनुसार - राग दरबारी (सौजन्य: टण्या), आता आमोद सुनासि आले (सौजन्यः नंदन) आणि तोत्तोचान ही पुस्तके उत्तम आहेत एन्बीटीची.>> तोत्तोचान त्यांचे आहे होय. माझे आवडते. आता पाहिले पाहिजे परत.
ऋषिकेश,वेदश्री, चिंतातुर जंतू धन्यवाद. :-)
स्वाती
स्वाती · Wed, 20 Oct 2010 - 09:44
आनंदयात्री, तुम्ही भैरप्पांबद्दल म्हणतायत का?
टण्या
टण्या · Wed, 20 Oct 2010 - 10:28
कारंथांची काही पुस्तके एन.बी.टी. ने मराठीत अनुवादित केली आहेत. त्यातले 'मरणानंतर' हा अनुवाद अगदी बाद आहे. बाकी बरी आहेत पण. तसेच यशवंत चित्ताल ह्यांचे 'शिकार' नावाचे मूळ कानडी (मराठीत अनुवाद उपलब्ध) पुस्तक नक्कीच विकत घेण्याजोगे.
८-१० वर्षांपुर्वी मी एन.बी.टी.ची विविध भारतीय भाषांतील लघुकथांचे अनुवाद विकत घेतले होते. गुजराती, पंजाबी, मल्याळी, बंगाली वगैरे वगैरे आठवतात आता. ती पुस्तके पण वाचनीय होती.
मराठीतील गेल्या पन्नास वर्षातील लघुकथांचे संकलनदेखील आहे त्यांचे. त्यात अनेक उत्तमोत्तम कथा आढळल्या होत्या.
एन.बी.टी.ची पुस्तके साधारण अंदाज करुन घेउन टाकायची. एकतर किंमत तुलनेत फारच कमी असते. आणि इतर भारतीय भाषांतील साहित्य वाचण्याची अतिशय उत्तम संधी असते.
मंटोच्या कथांचे अनुवादक/मराठी-उर्दू शब्दकोष बनवणारे पण श्रीपाद जोशीच ना? की ते श्री.ज.जोशी? आणि रघुनाथाची बखरचे लेखक कोण?
चिंतातुर जंतू
चिंतातुर जंतू · गुरुवार, 21 Oct 2010 - 11:29 · उत्तर
हो.
'रघुनाथाची बखर'चे लेखक श्री.ज. जोशी. याशिवाय एक आहेत, ते म्हणजे 'गंगाजळी'चे लेखक श्री. बा. जोशी.
दिगम्भा
दिगम्भा · गुरुवार, 21 Oct 2010 - 14:08 · उत्तर
आणखी
वेगळी प्रवासवर्णने लिहिणारे रा. भि. जोशी;
शिवाय प्रा. प्र. न. जोशी - यांनी काय लिहिले ते आठवत नाही.
यादी एवढ्यावर संपेल असे वाटत नाही ............
(बाय द वे, ती प्रसिद्ध "दळण" नावाची कथा (बहुधा मिरासदारांची?)आधी श्रीपाद जोशीं अनुवादित उर्दू कथांतही वाचल्याचे स्मरते.)
टण्या
टण्या · Fri, 22 Oct 2010 - 18:03
पत्रकार नगरमधील कामायनी मैदानावरील प्रदर्शनात जाऊन आलो. मला नॅशनल बूक ट्रस्टचा स्टॉल दिसला नाही. नॅशनल बूक हाउसचा होता. पॉप्युलरचा स्टॉल चांगला आहे. साहित्य अकादमीचा पण उत्तम आहे.
आनंदयात्री
आनंदयात्री · Sun, 24 Oct 2010 - 05:04 · उत्तर
डिएनए च्या बातमीनुसार अर्धाधिक प्रकाशकांनी या प्रदर्शनातुन लवकर गाशा गुंडाळला. प्रदर्शनाला अत्यंत कमी प्रतिसाद मिळाल्याने असे झाल्याचे कळते. कमी प्रतिसाद मिळण्याचे मुख्य कारण प्रदर्शनाची नवीन जागा असे असावे.
रोचीन
रोचीन · Sat, 23 Oct 2010 - 07:27
ची कोणती पुस्तकं होती?? मुंबईत येण्याची काही शक्यता??
यशोधरा
यशोधरा · Mon, 25 Oct 2010 - 07:56
शनिवारी प्रदर्शनाला भेट दिली. जरी बरेच जणांनी गाशा गुंडाळलेला होती, तरीही लोकायत, पॉप्युलर आणि साहित्य अकादमीच्या स्टॉल्स वर चांगली पुस्तके मिळाली. कदाचित लवकर जाऊ शकले असते तर, अजूनही पुस्तके निवडता आली असती. जुनी पुस्तके निम्म्य्या किमतीला देण्याचा पॉप्युलरचा पायंडा खूपच पथ्यावर पडला! :)
ऋषिकेश
ऋषिकेश · गुरुवार, 28 Oct 2010 - 18:19
अंबर हॉलच्या प्रदर्शनाला शेवटाच्या दिवशीच्या शेवटाच्या तासांत एकदाची भेट ददिली :)
[खरेदीही केली]
काहि पुस्तकांवर अजून एक पुस्तक फुकट होते शिवाय १० ते २०% सूटही होती.. बरीच वेगवेगळ्या विषयावरची पुस्तकेही होती.
यशोधरा
यशोधरा · Sun, 14 Nov 2010 - 04:25
पुण्यात आचार्य अत्रे सभागृहात पुप्र. बहुतेक आजपासून, कारण कुठे तारखा दिलेल्या नाहीत.
मौज + राजहंस + अक्षरधारा ह्यांची पुस्तके.
मौजच्या काही पुस्तकांवर सवलत.
अक्षरधाराची एक पुस्तक विकत + एक मोफत ही योजना.
राजहंसचं माहित नाही.
क्रेडीट कार्ड स्वीकारतील. :D
सागर
सागर · Sun, 14 Nov 2010 - 09:59 · उत्तर
अरे वा छान माहिती दिलीस यशोधरा... थेंकू...थेंकू :)
पुण्यात येईल तोपर्यंत असेलच हे प्रदर्शन. जास्त वेळ नाही मिळाला तरी एक धावती भेट नक्की द्यायचा विचार आहे
वेळ मिळाला तर प्रश्नच नाही. थोडी खरेदी नक्की
यशोधरा
यशोधरा · Sun, 14 Nov 2010 - 13:31 · उत्तर
आज ह्या पुप्रला जाता आलं नाही, पण हरकत नाही, ८ डिसेंबरपर्यंन्त आहे प्रदर्शन. मला वाटतं, तुला भेट द्यायला जमेल सागर. :)