- Log in to post comments
मजकूर
मित्रानो,
धन्यवाद!
एका पुस्तकाबद्दल माहिति हवी होती.
एक गुन्हेगार!
पलायन!
विमान प्रवास!
विमानाचे अपहरन!
सुट्का!
गुन्हेगार बनतो स्वामिजी!
rock band members as kidnappers!
swamiji marries lady left by her husband in aeroplane!
फार छान पुस्तक!
नाव आणि प्रकाशक समजतिल का?
धन्यवाद!
चर्चा प्रकार
अभिप्राय
सागर
सागर · Tue, 15 Feb 2011 - 09:37
पुस्तकाचे नाव आहे थरारक
सुहास शिरवळकरांचे हे सुंदर पुस्तक माझ्या संग्रहात आहे :)
शशिदीप प्रकाशनाचे आहे
हे ते पुस्तक - क्लिक करा
देवेन्द्र प्रभुणे
देवेन्द्र प्रभुणे · Wed, 16 Feb 2011 - 14:01
धन्य्अवाद मित्रा!
दिवस सुगिचे सुरु जाहले,
ओला चारा बैल माजले,
शेतकरि मन प्रसन्न झाले,
ही कविता कोणी लिहिली आहे आणी कोणत्या पुस्तकात आहे?
प्लीज,कळवा.
सागर
सागर · Wed, 16 Feb 2011 - 14:05
बालभारतीच्या पुस्तकात मिळेल ही कविता
लेझिम चाले जोरात
दिवस सुगीचे सुरु जाहले, ओला चारा बैल माजले,
शेतकरी मन प्रसन्न जाहले...
छन खळखळ छन ढुमढुम पटढुम्,
लेझिम चाले जोरात!
चौघांनी वर पाय ऊचलले, सिंहासनीं त्या ऊभे राहिले,
शाहिर दोघे ते डफ वाले...
ट्पढुम, ढुमढुम, डफ तो बोले..
लेझिम चाले जोरात!
दिवटी फुरफुर करू लागली, पटक्यांची वर टोंके डूलली,
रांग खेळण्या सज्ज जाहली,
छन खळखळ छन ढुमढुम पटढुम्,
लेझिम चाले जोरात!
भरभर डफ तो बोले घुमुनीं, लेझिम चाले मंड्ल धरुनी,
बाजुस-मागें, पुढे वाकुनी...
छन खळखळ छन ढुमढुम पटढुम्,
लेझिम चाले जोरात!
डफ तो बोले-लेझिम चाले, वेळेचे त्या भान न ऊरले,
नाद भराने धुंध नाचले...,
छन खळखळ छन ढुमढुम पटढुम्,
लेझिम गुंगे नादात्!
सिंहासन ते डुलु लागले, शाहिर वरती नाचू लागले,
गरगर फिरले लेझिमवाले...
छन खळखळ छन ढुमढुम पटढुम्,
लेझिम गुंगे नादात्!
दिनभर शेती श्रमूनी खपले, रात्री साठी लेझीम चाले,
गवई न लगे, सतारवाले...,
छनखळ झुणझिन,रात्र संपली नादात्
लेझिम चाले जोरात् !
पहाट झाली - तारा थकल्या, डफवाला तो चंद्र ऊतरला,
परी न थकला लेझिम मेळां...,
छनखळ झुणझिन, लेझिम खाली...
चला जाऊया शेतात् ! चला जाऊया शेतात् !!
- श्रीधर बाळकृष्ण रानडे
इंद्रराज पवार
इंद्रराज पवार · Wed, 16 Feb 2011 - 16:24
"...बालभारतीच्या पुस्तकात मिळेल ही कविता...."
~ होय....आणि यदाकदाचित हे बालभारतीचे पुस्तक तुम्हाला कुठे मिळाले नाही तर "आठवणीतल्या कविता भाग-१" मध्ये या कवितेचा समावेश केला आहे (पान क्रमांक १३६)....हा संग्रह जवळपास सर्वच पुस्तकविक्रेत्याकडे उपलब्ध असतो....किंमतही केवळ १००/- रुपये आहे.
(अर्थात श्री.सागर यानी टंकण्याचे इतके कष्ट घेऊन सर्व कविताच तुमच्यासमोर आणून ठेवली आहे, त्याबद्दल त्यांचेच तुम्ही आभार माना...मी संग्रहाचे नाव देण्याचे कारण म्हणजे कवितेसोबत असणार्या कुणी अज्ञाताने काढलेल्या 'चांदण्यातील लेझीम' हे चित्र पाहाण्यासाठी....फार सुंदर आहे हे चित्र.)
इन्द्रा
सागर
सागर · Wed, 16 Feb 2011 - 18:33 · उत्तर
(अर्थात श्री.सागर यानी टंकण्याचे इतके कष्ट घेऊन
इंद्रराज,
ही सुंदर कविता संग्रहात होतीच. फक्त कॉपी पेस्ट करण्याचे कष्ट घेतले एवढेच ;)
त्यामुळे टंकनकष्ट अजिबात नाही झाले .... हा हा हा
देवेन्द्र प्रभुणे
देवेन्द्र प्रभुणे · Wed, 16 Feb 2011 - 17:26
dear friends,
a big thank you!
Sagar saheb,you took great pains!
Indra bandhu,superb information!
booked both"THARARAK" & "ATHAVANITALYA KAVITA"(entire set) on erasik.com.
देवेन्द्र प्रभुणे
देवेन्द्र प्रभुणे · गुरुवार, 17 Feb 2011 - 15:05
मित्रानो,
सुहास शिरवळकरान्चि एक अप्रतिम त्रिधारा वाचलि होति.
१.एक मनस्विनि मुलगी,नायक एक महविद्यआलयिन तरुण,अॅ़ श्रीमन्त तरुण्,जो कन्सर पीडीत मुली सोबत लग्न करतो.
२.प्रेताला साम्भाळून असलेले कुटूम्ब
३.प्रेम विवाहा वर आधारीत एक मस्त लघु कादम्बरी!
पुस्तकाचे नाव व प्रकाशक समजतील का?
धन्यवाद
वल्ली
वल्ली · गुरुवार, 17 Feb 2011 - 15:39 · उत्तर
ते पुस्तक 'निमित्तमात्र' असावे.
>>१.एक मनस्विनि मुलगी,नायक एक महविद्यआलयिन तरुण,अॅ़ श्रीमन्त तरुण्,जो कन्सर पीडीत मुली सोबत लग्न करतो.
कथा: निमित्तमात्र
>>२.प्रेताला साम्भाळून असलेले कुटूम्ब
कथा: जन पळभर..
>>३.प्रेम विवाहा वर आधारीत एक मस्त लघु कादम्बरी!
कथा: <नाव नेमकेसे आठवत नाही.>
सागर सांगेलच.
सागर
सागर · गुरुवार, 17 Feb 2011 - 15:49 · उत्तर
निमित्तमात्र मधीलच आहे या तिन्ही कथा
शशीदीप प्रकाशनाच्याच आहेत.
शिरवळकरांची बहुतेक पुस्तके पुढील प्रकाशकांची आहेत.
शशीदीप प्रकाशन
दिलिपराज प्रकाशन
बाकीचेही आहेत. पण यांची जास्त प्रकाशने आहेत
प्रेमविवाहावर सुशिंच्या अनेक कथा आहेत त्यामुळे तिसर्या कथेचे नाव मला आत्ता नाही आठवत. घरी पुस्तकात बघावे लागेल. पहिले २ मलाही आठवले होते.
त्यातली जन पळभर म्हणतील धमालच होती.
वल्ली
वल्ली · गुरुवार, 17 Feb 2011 - 15:56 · उत्तर
त्यातली निमित्तमात्र कथा शेवटची आहे. आणि प्रेमविवाहाची पहिली एव्हढे तर नक्कीच.
सागर
सागर · गुरुवार, 17 Feb 2011 - 16:03 · उत्तर
मलाही उत्सुकता लागली आहे
देवेन्द्र प्रभुणे
देवेन्द्र प्रभुणे · गुरुवार, 17 Feb 2011 - 16:04
राव्,मैत्री परवडत नाही तुमची!
खिसा लै भराभर हलका होतोय की!
erasik.com ला बहुतेक आता स्वताला गहाण टाकावे लागणार!
(बहुतेक्,नाही म्हणतील)
धन्यवाद मित्रानो!
वल्ली
वल्ली · Fri, 18 Feb 2011 - 04:05
निमित्तमात्र मधली पहिली कथा आहे - सावधान
काल रात्रीच सागर ने एसएमएस करून सांगितले पण टंकायला उशीर झाला.
धन्यवाद सागर. :)
सागर
सागर · Fri, 18 Feb 2011 - 05:37 · उत्तर
:)