- Log in to post comments
मजकूर
मित्रांनो,
चला!
खेळुया!
१. मोटेल दिलखुलास चे प्रस्तावीत मुळ नाव काय?
२."''बोगम" हे पात्र कोणत्या कादंबरीत आहे?
३."फ्रिस्टी" हा उल्लेख कोणत्या कादंबरीत आहे?
४.दुनियादारी कादंबरीत प्रितम व श्रेयस रुपाली होटेल मध्ये कोणती दोन गीते ऐकतात?
व त्यांचे गायक कोण?
५."पद्या" नावाचे निखालस रिकामटेकडे पात्र कोणत्या पुस्तकात आहे?
६ न्यायाधीश खुनी असलेली कादंबरी कोणती?
७.दारा व अस्लम एक अतिशय जहाल मादक पेय पितात्,त्याचे नाव काय?
८.अम्र विश्वास ची सचिव मोहिनि हीचे मुळ नाव काय?
९ सु.शिं.च्या पुस्तकांमध्ये दोन सुप्रसिध्द हिंदी चित्रपट दिग्दर्श़कांच्या नावावर बेतलेली
पात्रे येतात्.ती कोणती?(एक दिगदर्शकाचे टोपण नाव)
१०.पीटर गायकवाड हा कोणत्या कादंबरीत नायक आहे?
-उत्तरे,बुधवार पर्यंत(३१/०५/२०११)
पहीलाच प्रयत्न आहे!सांभाळुन घ्या!
-देवेन्द्र प्रभुणे,यवतमाळ.
चर्चा प्रकार
अभिप्राय
सागर
सागर · Mon, 6 Jun 2011 - 09:09
देवेन्द्र मित्रा
या प्रश्नमंजुषेने मी सुहास शिरवळकरांचा पंखा असल्याचा अभिमान गळून पडला :(
एकसे बढकर एक प्रश्न आहेत.
किंबहुना वाचन कसे करावे याचे धडेच तुझ्या प्रश्नमंजुषेतून मिळत आहेत :)
काही उत्तरे पाठवली आहेत.
वल्ली
वल्ली · Tue, 7 Jun 2011 - 05:25 · उत्तर
अगदी २ ते ३ च प्रश्नांची उत्तरे येत आहेत. तरी आज संध्याकाळपर्यंत व्यनी करण्याचा प्रयत्न करतो.