वाचन आणि वेचे

श्रावण मोडक

मजकूर

ही रूढ अर्थाने चर्चा म्हणता येणार नाही. ही फक्त एकमेकांशी देवाणघेवाण आहे. काय करायचे?
आपण सध्या काय वाचतो आहे हे इथं लिहायचं. जे वाचतो आहे, त्याविषयी लिहित जायचं. मग या वाचनाविषयी तुम्हाला भावलेलं एखादं वाक्य किंवा काही वाक्यं असतील, त्यात आलेला एखादा जुना आठवणीचा संदर्भ असेल, त्यात गवसलेली नवी माहिती असेल किंवा तत्सम काहीही नोंद घेण्याजोगा अनुभव. पुस्तकाचं नाव आणि त्याच्याशी संबंधित हे वेचे असा हा धागा.

सर्वांना एक विनंती. कृपया येथे केवळ मी अमूक-अमूक पुस्तक वाचतो/ते आहे इतकेच लिहू नका. त्या पुस्तकाविषयी काही लिहा. वाचनाविषयी काही लिहा.

नीलकांत आणि मंडळींनो, या आणि अशा धाग्यांवर प्रतिसाद पुढच्या पानावर गेले की (या धाग्यावर ही माझी उगाचच आशा ठरू नये) मग नवे प्रतिसाद नेमके कळत नाहीत. धागा उघडला की फक्त पहिलेच पान उघडते. थेट पुढच्या पानावरील नव्या प्रतिसादावर जाण्यासाठी काही करता येईल का? मायबोलीवर तसे होते.

अभिप्राय

श्रावण मोडक

श्रावण मोडक · Sun, 23 May 2010 - 08:33

सध्या वाचतोय ऑर्थर कोसलर यांचं द स्लीपवॉकर्स. एका वाक्यात पुस्तकाचं सार सांगण्यासाठी मुखपृष्ठाचाच आधार घेतो
"द क्लासिक अकाऊंट ऑफ द ग्रेट अस्ट्रॉनॉमर्स - फ्रॉम द अर्ली ग्रीक्स थ्रू कोपर्निकस अँड गॅलिलिओ - अँड ऑफ द डिस्कव्हरीज दॅट चेंज्ड मॅन्स व्हिजन ऑफ द युनिव्हर्स."
साध्या ओघवत्या इंग्रजीत विज्ञानाची जन्म-आणि-कूळकथा.
'डॉन' या पहिल्याच प्रकरणाचं पहिलं वाक्य - आपल्या ज्ञानात आपण भर टाकू शकतो, पण या ज्ञानसंचितातून काहीही काढून घेता येत नाही. - We can add to our knowledge, but we cannot subtract from it.
वाचन सुरू होतं. गंती संथ होत जाते. ज्या दिवशी वाचतोय त्या दिवशी फार तर दोन-तीन पानं.
मी अजूनही पायथागोरियन धारेच्या आसपास रेंगाळतो आहे. एक नोंद आहे. संगीत आणि विज्ञानासंदर्भात. पूर्ण मराठीत लिहिणं मुश्कील आहे. कारण सारंच काही कळलेलं नाहीये. देवनागरी इंग्रजीतच लिहितो - द पायथागोरियन डिस्कव्हरी दॅट द पिच ऑफ अ नोट डिपेण्ड्स ऑन द लेन्ग्थ ऑप द स्ट्रिंग दॅट प्रोड्यूसेस इट, अँड द कंकॉर्डण्ट इंटरव्हल्स इन द स्केल आर प्रोड्यूस्ड बाय सिंपल न्यूमरिकल रेश्योज (2 : 1 ऑक्टेव्ह, 3 : 2 फिफ्थ, 4 : 3 फोर्थ, एट्सेट्रा) वॉज एपो-मेकिंग: इट वॉज द फर्स्ट सक्सेसफुल रिडक्शन ऑफ क्वालिटी टू क्वाण्टिटी, द फर्स्ट स्टेप टुवार्ड्स द मॅथेमॅटायझेशन ऑफ ह्यूमन एक्स्पिरिअन्स - अँड देअरफर द बिगिनिंग ऑफ सायन्स.
हे मत आहे, तथ्य नाही असे काहींचे म्हणणे असेल. मला यातील पहिला भाग (सूर आणि त्याचा पिच व त्या तारेची लांबी) समजून घ्यायचा आहे. कोणी सांगेल?

नंदन

नंदन · Mon, 24 May 2010 - 06:39 · उत्तर

निवडक वेच्यांचा हा उपक्रम उत्तम आहे. आर्थर कोस्लरचं 'डार्कनेस अ‍ॅट नून' वाचलं होतं, पण ह्या पुस्तकाबद्दल ठाऊक नव्हतं. सोव्हिएट रशियातल्या साम्यवादी राजवटीची काळी बाजू प्रभावीपणे सर्वप्रथम जगासमोर आणणार्‍या पहिल्या काही लेखकांपैकी एक असणार्‍या कोस्लरचं, सर्वस्वी वेगळ्या विषयावरचं हे पुस्तक; एक लेखक म्हणून त्याचा आवाका किती प्रचंड होता ह्याचंच निदर्शक आहे.

श्रावण मोडक

श्रावण मोडक · Mon, 24 May 2010 - 07:36 · उत्तर

आहे, डार्कनेस अॅट नून हेही आहे. याच स्वरूपाचे त्याचेच आणखी एक पुस्तक आहे - थीव्ज इन द नाईट. ही दोन्ही वाचणार आहे.

Nile

Nile · Sun, 23 May 2010 - 11:57

कालच रात्रभर बसुन हे पुस्तक वाचुन काढ्ले पाच सात पानं आधी वाचली होती पण सुरुवातीला का कोण जाणे पुढे वाचावसं वाटलं नाही. मात्र काल वाचायला घेतलं ५०-६० पानं वाचुन झाल्यावर हे पुस्तक माझ्याच शाळेबद्दल असल्यासारखं वाचलं. जोश्यामध्ये स्वतःलाच पहात होतो, शिरोडकरमध्ये कोणीतरी दिसत होतं. 'अनुशासनपर्व' वाचल्यावर आमच्या अतीकडक मुख्याध्यापकाला काय-काय म्हणालो होतो आणी कर्मधर्मसंयोगाने खुद्द मुख्याध्यापकानेच ते खिडकीतुन ऐकल्यामुळे आम्हा चौघांना काय काय करावं लागलं होतं ते आठवलं. वर्गातल्या मुलींवर लाईनमारणार्‍या दुसर्‍या वर्गातील मुलांबरोबर केलेल्या मारामार्‍या, वर्गात पुढे जाउन शिक्षकांची मिमिक्रीकरताना पकडले जाणे, मागच्या बेंचावर बसुन मासिके (कसली म्हणुन प्रश्न पडला असेल तर तुम्ही शाळेत गेलाच नाहीत) वाचणे,तास बुडवुन चिंचापाडणे, सगळंच आठवलं. पुन्हा वेळ मागे नेउन शाळेत जाता येईल तर काय मजा येईल हा विचारही येउन गेला.

पुस्तक इतकं आवडलं की आता वाचायला काय घेउ असा प्रश्न पडला आहे.

धाग्याची कल्पना आवडली.

श्रावण मोडक

श्रावण मोडक · Sun, 23 May 2010 - 13:36 · उत्तर

खरं आहे. मला वाटतं, 'शाळा' वाचताना हे आपल्या अनुभवांविषयीचंच आहे असं ज्या मुलाला वाटत नसेल तो बहुदा शाळेत गेलाच नसावा.

वेदश्री

वेदश्री · गुरुवार, 3 Jun 2010 - 18:51

श्रावण,

तुझी कल्पना खूप आवडली पण इथे प्रतिसादात लिहिण्यापेक्षा कोड्यांची मालिकाच काढावी असे वाटले म्हणून 'ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे ते...' ही मालिका सुरु केली आहे. यात सर्वजण भाग घेऊन आपापली कोडी विचारू शकतात. मी सुरुवातीची ३ विचारली आहेत.. पुढेही विचारत राहीनच. ती अख्खी मालिका तुझ्या या धाग्याचा प्रतिसाद आहे असं समज. :)

श्रावण मोडक

श्रावण मोडक · गुरुवार, 3 Jun 2010 - 21:55 · उत्तर

कोड्यांचा धागा स्वतंत्र हे उत्तम केलेस. कारण इथे या धाग्यात कोड्याची कल्पना नाहीये. काय वाचतो आहे त्याविषयी इथे बोलायचे आहे. जे वाचतो आहे त्यातले वेचे द्यावयाचे आहेत. ते वेचे त्या-त्या क्षणी भावलेले असतील इतकेच.

प्रभो

प्रभो · Sat, 5 Jun 2010 - 07:17

इकडे आल्यापासून वाचन शून्य झालंय जवळजवळ....जसं वाचीन तशी भर घालेन म्हणतो.

चर्चा प्रकार