- Log in to post comments
मागे काही दिवसा पूर्वी मी पुस्तकविश्व वरील मित्रांना मदत मागीतली होती तेव्हा तोत्तोचान या पुस्तका विषयी पुन्हा एकदा कळले व ते खरेदी करण्या साठी http://www.nbtindia.org/AdvanceSearch.asp इथे शोधाशोध केली असता अनेक पुस्तके आढळली जी फारच स्वस्त होती. यातील काही लघुकथांचे अनुवाद मी फार पूर्वी खरेदी केले होते. त्यातील काही फार छान होते वाचून बरीच वर्षे झाल्यामुळे व ती पुस्तके माझ्या भारतातील घरी असल्याने नेमके त्या विषयी लिहिता येत नाही.
अजून मराठी पुस्तकांसाठी च्या सर्च रिझल्ट च्या ५३ पानांपैकी सगळी पाने मी पाहीली नाहीत. वेब साईटचे डिझाईन व काम ही नीट नाही व त्या मुळे मी अजुन तोत्तोचान मिळवू शकलो नाही :(
या पुस्तकांमधील कोणती पुस्तके विख्यात आहेत, चांगली आहेत याविषयी जाणकार मंडळींनी प्रतिसादात लिहावे ही विनंती म्हणजे माझ्या सारख्यांना पुस्तके निवडायला मदत होईल.
वेळ मिळेल तसा हिंदी- इंग्रजी भाषेतील ही पुस्तके शोधण्याचा विचार आहे. पण तोवर आपणा सर्वांना या बद्दल सांगावेसे वाटले म्हणून लिहून मोकळा झालो.
अभिप्राय
यशोधरा
यशोधरा · Wed, 19 Jan 2011 - 08:01
मस्त लिंक. पाह्ते. धन्यवाद. मागे एकदा ह्या लिंक वर गेले होते. आज तुमच्या लेखाच्या निमित्ताने पुन्हा एकदा. एनबीटीची काही पुस्तके माझ्याकडे आहेत, तुम्हांला हवी असल्यास नावे सांगेन.
श्रीकांत बोरवणकर
श्रीकांत बोरवणकर · Wed, 19 Jan 2011 - 09:39 · उत्तर
त्या साठी तर हे लिहिलेय. पुस्तके तर खूप आहेत चांगली कोणती, सरस अनुवाद कोणते, तुम्हाला आवडलेली कोणती सारे सारे लिहा. पुस्तकविश्व आपलोच असा.. होल वावर इज अवर्स!! :)
यशोधरा
यशोधरा · Fri, 21 Jan 2011 - 07:09 · उत्तर
नक्की. २ एक दिवस द्या. :)
माझी लिस्ट -
मराठी लघुकथा - संपादक भालचंद्र पडके
पंजाबी लघुकथा - अनुवाद प्रभाकर माचवे
कथा भारती तेलुगू लघुकथा - अनुवाद नरेन्द्र बल्लाळ
शिकार - यशवंत चिल्लाल - अनुवाद केशव महागावकर
तमस - भीषम साहनी - अनुवाद चंद्रकांत पाटील
लोकमान्य टिळकांचे निबंध - संपादक राम शेवाळकर
आणि
छत्रपती शिवाजी- सेतुमाधवराव पगडी
कबीर - अनुवाद अशोक कामत
डॉ बाबासाहेब आंबेडकर - वसंत मून
नागार्जून - के सच्चिदानंद मूर्ती
सयाजीराव गायकवाड - अनुवाद स गं मालशे
विठ्ठल रामजी शिंदे - गो मा पवार
सूरदास. (लेखक विसरले :( )
टण्या
टण्या · Wed, 19 Jan 2011 - 14:10
मागेही मला वाटते एनबीटीच्या पुस्तकांवरुन चर्चा झाली होती.. फार सुरेख पुस्तके मिळतात.. साइट फारच सरकारी आहे.. मला लगेच आठवणारी काही:
विविध भारतीय भाषांतील लघुकथांची भाषांतरे
शिकार - यशवंत चित्ताल
राग दरबारी- श्रीलाल शुक्ल