चरित्र
चरित्र
डॉ. अभय बंग (जन्म : २३ सप्टेंबर १९५०) हे मराठी वैद्यकीय संशोधक आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. 'सर्च' या संस्थेमार्फत ते गडचिरोली येथील ग्रामीण आणि आदिवासी भागात वैद्यकीय सेवा, संशोधन आणि सामाजिक कार्य करतात. बालमृत्यू नियंत्रणावरील त्यांच्या संशोधनाला जागतिक मान्यता मिळाली असून भारत, पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश आणि अनेक आफ्रिकन देशांत त्यांचे प्रारूप वापरले जाते. त्यांचे शोधलेख 'द लॅन्सेट' या वैद्यकीय नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहेत. 'माझा साक्षात्कारी हृदयरोग' हे त्यांचे पुस्तकही प्रसिद्ध आहे.
समुदायाने जोडले
बंद