चरित्र
चरित्र
अच्युत गोडबोले हे तंत्रज्ञ, समाजसेवक आणि मराठी लेखक व वक्ते आहेत. त्यांचे बालपण सोलापुरात गेले. १९७२ मध्ये ते आयआयटीमधून केमिकल इंजिनिअर म्हणून उत्तीर्ण झाले. विज्ञान, संगणक तंत्रज्ञान, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, संगीत आणि व्यवसाय अशा विषयांवर त्यांनी प्रामुख्याने लेखन केले. 'मुसाफिर' हे त्यांचे आत्मकथन; 'किमयागार', 'नादवेध', 'अर्थात', 'नॅनोदय', 'मनात' ही त्यांची पुस्तके गाजली. दीपा देशमुख यांच्यासह त्यांनी 'जग बदलणारे १२ जीनियस' हा पुस्तकसंच लिहिला, तर अतुल कहाते यांच्यासह संगणकविषयक पुस्तके लिहिली. निवृत्तीनंतर त्यांनी समाजसेवेत काम केले; भिल्ल आदिवासींच्या हक्कांच्या लढ्यात भाग घेतला आणि 'आशियाना' या ऑटिस्टिक मुलांच्या शाळेच्या स्थापनेत पुढाकार घेतला.
समुदायाने जोडले
बंद