अॅन फ्रँक

इंग्रजी नाव
Anne Frank

चरित्र

चरित्र

ॲन फ्रँक (आनेलीस मारी फ्रांक; १२ जून १९२९ – मार्च १९४५) ही ज्यूंच्या शिरकाणात बळी गेलेली ज्यू मुलगी होती. तिचा जन्म जर्मनीतील फ्रांकफुर्ट येथे झाला; १९३३ मध्ये नाझी सत्तेवर आल्यानंतर तिचे कुटुंब ॲम्स्टरडॅमला स्थलांतरित झाले. जुलै १९४२ पासून सुमारे दोन वर्षे हे कुटुंब वडिलांच्या कार्यालयाच्या इमारतीतील गुप्त खोल्यांत लपून राहिले; त्या काळात तिने १२ जून १९४२ ते १ ऑगस्ट १९४४ या काळातील दैनंदिनी लिहिली. पकडले गेल्यानंतर तिला छळछावणीत पाठवण्यात आले आणि मार्च १९४५ मध्ये बर्गन-बेल्सन छावणीत तिचा मृत्यू झाला. वडील ऑटो फ्रँक यांच्या प्रयत्नांमुळे ही दैनंदिनी १९४७ मध्ये 'द डायरी ऑफ अ यंग गर्ल' म्हणून प्रसिद्ध झाली; मंगला निगुडकर यांनी तिचा मराठी अनुवाद केला आहे.

समुदायाने जोडले
बंद