अगाथा ख्रिस्ती

चरित्र

चरित्र

अगाथा ख्रिस्ती (१५ सप्टेंबर १८९० – १२ जानेवारी १९७६) या इंग्रजी रहस्यकथालेखिका होत्या. त्यांचा जन्म इंग्लंडमधील टॉर्की येथे झाला. त्यांनी ६६ रहस्यकादंबऱ्या आणि १४ कथासंग्रह लिहिले. हर्क्युल पॉयरो, मिस मार्पल आणि टॉमी-टपेन्स ही त्यांची सत्यान्वेषी पात्रे प्रसिद्ध आहेत; पॉयरोची पहिली कादंबरी 'द मिस्टिरियस अफेअर ॲट स्टाइल्स' (१९२०) होती. त्यांना 'क्वीन ऑफ क्राइम' म्हटले जाते. त्यांचे 'द माउसट्रॅप' हे नाटक १९५२ पासून लंडनच्या वेस्ट एंडमध्ये सादर होत असून ते जगातील सर्वाधिक काळ चाललेले नाटक आहे. 'मेरी वेस्टमॅकॉट' या टोपणनावानेही त्यांनी सहा कादंबऱ्या लिहिल्या. त्या सर्वाधिक खपाच्या कादंबरीकार असून त्यांच्या पुस्तकांच्या दोनशे कोटींहून अधिक प्रती खपल्या आहेत. मधुकर तोरडमल, रेखा देशपांडे आदींनी त्यांच्या कादंबऱ्यांचे मराठी अनुवाद केले आहेत.

समुदायाने जोडले
बंद