चरित्र
चरित्र
अण्णा भाऊ साठे (मूळ नाव तुकाराम भाऊराव साठे; १ ऑगस्ट १९२० – १८ जुलै १९६९) हे मराठी समाजसुधारक, लोककवी, शाहीर आणि लेखक होते. त्यांचे लेखन सामाजिक आणि राजकीय कृतिशीलतेवर आधारलेले होते; सुरुवातीच्या काळात त्यांच्यावर साम्यवादी विचारसरणीचा प्रभाव होता. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली; शाहीर अमर शेख आणि द. न. गव्हाणकर यांच्यासह 'लालबावटा कलापथका'तून त्यांनी ही चळवळ लोकमानसात रुजवली. 'फकिरा' ही त्यांची कादंबरी विशेष प्रसिद्ध आहे. त्यांचे साहित्य परिवर्तनाला दिशा देणारे मानले जाते आणि आजही अनेक अभ्यासक त्याचा संशोधनात्मक अभ्यास करतात.
समुदायाने जोडले
बंद