आनंद यादव

इंग्रजी नाव
Anand Yadav

चरित्र

चरित्र

आनंद यादव (३० नोव्हेंबर १९३५ – २७ नोव्हेंबर २०१६) हे मराठी लेखक होते. काव्य, कथा, कादंबरी, समीक्षा आणि ललित अशा विविध प्रकारांत त्यांनी लेखन केले; ते मराठीतील महत्त्वाचे ग्रामीण कादंबरीकार होते. त्यांचे शिक्षण कोल्हापूर आणि पुणे येथे झाले. काही काळ आकाशवाणीत नोकरी केल्यानंतर ते पुणे विद्यापीठात प्रपाठक झाले आणि मराठी विभागप्रमुख म्हणून निवृत्त झाले. 'झोंबी' या आत्मचरित्रासाठी त्यांना १९९० मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. 'खळाळ' (१९६७), 'गोतावळा' (१९७१), 'नांगरणी' (१९९०) ही त्यांची पुस्तके आहेत. ग्रामीण साहित्य संमेलन, समरसता साहित्य संमेलन आदींचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले. 'संतसूर्य तुकाराम' या कादंबरीवरील आक्षेपांमुळे २००९ च्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांना स्वीकारता आले नाही.

समुदायाने जोडले
बंद