अनंत काणेकर

इंग्रजी नाव
Anant Kanekar

चरित्र

चरित्र

अनंत आत्माराम काणेकर (२ डिसेंबर १९०५ – ४ मे १९८०) हे मराठी कवी, लेखक आणि पत्रकार होते. मुंबई विद्यापीठातून बी.ए. (१९२७) आणि एलएल.बी. (१९२९) झाल्यानंतर त्यांनी वकिली केली. १९३३ मध्ये 'चांदरात' हा पहिला काव्यसंग्रह आणि पुढील वर्षी 'पिकली पाने' हा लघुनिबंधसंग्रह प्रकाशित झाल्यावर १९३५ मध्ये त्यांनी वकिली सोडून साहित्याला वाहून घेतले. १९३५ ते १९३९ या काळात ते 'चित्रा' आणि 'आशा' या साप्ताहिकांचे संपादक होते. नंतर खालसा आणि सिद्धार्थ महाविद्यालयांत त्यांनी अध्यापन केले. प्रभातच्या 'माणूस' चित्रपटाचे ते संवादलेखक आणि 'नाट्यमन्वंतर' संस्थेचे संस्थापक सदस्य होते. 'धुक्यातून लाल ताऱ्याकडे' (१९३७) हे त्यांचे प्रवासवर्णन आहे. १९५७ मध्ये औरंगाबाद येथील साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते आणि १९६५ मध्ये त्यांना पद्मश्री मिळाली.

समुदायाने जोडले
बंद