आर. के. लक्ष्मण

इंग्रजी नाव
R. K. Laxman

चरित्र

चरित्र

रासीपुरम कृष्णस्वामी लक्ष्मण तथा आर. के. लक्ष्मण (२४ ऑक्टोबर १९२१ – २६ जानेवारी २०१५) हे भारतीय व्यंगचित्रकार, चित्रकार आणि विनोदी लेखक होते. 'द कॉमन मॅन' या पात्रासाठी आणि १९५१ पासून 'टाइम्स ऑफ इंडिया'त प्रसिद्ध होणाऱ्या 'यू सेड इट' या दैनिक व्यंगचित्रमालिकेसाठी ते प्रसिद्ध आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थी असताना त्यांनी थोरले बंधू आर. के. नारायण यांच्या 'द हिंदू'मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या कथांसाठी चित्रे काढली. मुंबईतील 'फ्री प्रेस जर्नल'मध्ये राजकीय व्यंगचित्रकार म्हणून त्यांनी पहिली पूर्णवेळ नोकरी केली. त्यानंतर ते 'टाइम्स ऑफ इंडिया'त रुजू झाले.

समुदायाने जोडले
बंद