अर्नेस्ट हेमिंग्वे

इंग्रजी नाव
Ernest Hemingway

चरित्र

चरित्र

अर्नेस्ट हेमिंग्वे हे अमेरिकन साहित्यिक होते आणि त्यांना विसाव्या शतकातील श्रेष्ठ अमेरिकन कथा-कादंबरीकार मानले जाते. त्यांचा जन्म १८९९ मध्ये अमेरिकेतील इलिनॉय राज्यातील ओक पार्क येथे झाला; डॉक्टर असलेल्या वडिलांकडून त्यांना शिकार आणि मासेमारीचे छंद मिळाले. वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी 'कॅन्सस सिटी स्टार' या वृत्तपत्रात वार्ताहर म्हणून काम सुरू केले. डोळ्यातील दोषामुळे पहिल्या महायुद्धात सैन्यात त्यांची निवड झाली नाही, तेव्हा त्यांनी रेडक्रॉसच्या रुग्णवाहिकेचे चालक म्हणून काम केले. शिकार, मासेमारी, मुष्टियुद्ध आणि बैलांच्या झुंजी हे छंद त्यांनी आयुष्यभर जोपासले.

समुदायाने जोडले
बंद