आरती प्रभू

इंग्रजी नाव
Arati Prabhu

चरित्र

चरित्र

चिंतामणी त्र्यंबक खानोलकर ऊर्फ आरती प्रभू (८ मार्च १९३० – २६ एप्रिल १९७६) हे मराठी कवी आणि लेखक होते. त्यांचा जन्म वेंगुर्ले तालुक्यातील बागलांची राई (तेंडोली) येथे झाला. त्यांचे शिक्षण वेंगुर्ले, सावंतवाडी, मुंबई आणि कुडाळ येथे झाले. त्यांनी 'आरती प्रभू' या नावाने कविता आणि स्वतःच्या नावाने गद्यलेखन केले. १९५९ मध्ये 'जोगवा' हा त्यांचा कवितासंग्रह प्रकाशित झाला. 'नक्षत्रांचे देणे' (१९७५) या काव्यसंग्रहासाठी त्यांना १९७८ चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. 'रात्र काळी, घागर काळी' (१९६२) आणि 'कोंडुरा' (१९६६) या त्यांच्या कादंबऱ्या आहेत. मुंबई येथे त्यांचे निधन झाले.

समुदायाने जोडले
बंद