चरित्र
चरित्र
अरुण मार्तंडराव साधू (१७ जून १९४१ – २५ सप्टेंबर २०१७) हे मराठी लेखक, पत्रकार आणि सामाजिक निरीक्षक होते. रशिया आणि भारतातील सामाजिक व्यवस्थांवर त्यांनी विवेचक लेखन केले. 'मुंबई दिनांक', 'सिंहासन', 'झिपऱ्या', 'त्रिशंकू', 'मुखवटा', 'विप्लवा', 'शोधयात्रा', 'स्फोट' या त्यांच्या कादंबऱ्या आहेत. 'मंत्रजागर', 'मुक्ती', 'बिनपावसाचा दिवस' हे त्यांचे कथासंग्रह आणि 'पडघम' हे नाटक आहे. 'आणि ड्रॅगन जागा झाला', 'फिडेल, चे आणि क्रांती' ही समकालीन इतिहासावरची पुस्तके त्यांनी लिहिली. नागपूर येथे झालेल्या ८०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. २०१५ मध्ये त्यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार मिळाला.
समुदायाने जोडले
बंद